Tuesday, February 16, 2021

 

मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ.दिपक 
म्हैसेकर यांची

रयत बाजार विक्री केंद्रास भेट

नांदेड, (जिमाका) दि. 16:-  कृषि विभागामार्फत विकेल ते पिकेल या अभियानातर्गंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरु असलेले संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान विक्री केंद्रास आज राज्याचे मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी भेट देवून पाहणी केली.

 

 यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, कृषि उपसंचालक श्रीमती माधुरी सोनवणे, उपविभागीय कृषि अधिकारी एम. के. सोनटक्के, तालुका कृषि अधिकारी एस. बी. मोकळे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, संगणक अज्ञावली रुपरेषक यावेळी उपस्थित होते.

 26 जानेवारी ते 29 जानेवारी 2021 या काळात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले आहे.  या ठिकाणी कायमस्वरुपी विक्री केंद्र सुरु करण्याबाबतच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार या ठिकाणी सात ते आठ स्टॉल कायमस्वरुपी सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला, ताजी फळे, सेंद्रीय शेतमाल, डाळी, धान्य, हळद ई. विक्रीसाठी ठेवला आहे. शहरातील ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सदरील विक्री केंद्र हे सोमवार ते रविवार या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहाणार आहे. तरी शहरातील ग्राहकांनी मोठया संख्येने शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात खरेदी करावा असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. तसेच शेतकरी व आत्माचे शेतकरी गट यांनी त्यांचा माल मोठया प्रमाणावर विक्रीसाठी आणावा असे देखील आवाहन केले आहे.

00000

 

पहिल्या टप्प्यातील लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी

-- मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर

 

नांदेड, दि. 16:- जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून याबाबत लोकांनी अधिक जागरुकता बाळगून तपासणीसाठी विश्वासाने पुढे सरसावणे आवश्यक आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही चिंतेची बाब असून आरोग्य विभागानेही कोरोना तपासणीचा वेग अधिकाधिक कसा वाढेल याबाबत योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले. नांदेड जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, आरोग्य विभागाची यंत्रणा आणि प्रशासनातर्फे केले जाणारे नियोजन याची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात डॉ दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, अधिष्ठाता सुधीर देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे,  मनपा उपायुक्त अजितपाल संधू, आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार कापसे, डॉ. संजय मोरे, डॉ. शितल राठोड, डॉ. सचिन तोटावार, डॉ. गाडेकर,
डॉ. शंकर अन्नपुर यांची उपस्थिती होती.

 

नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींचा मृत्यूचा दर हा ३.०८ टक्के इतका झाला आहे. सद्य स्थितीत दर दिवशी पाचशे तपासण्या होत आहेत. हा तपासणी दर वाढवून 2 हजार 800 तपासण्या झाल्या पाहिजेत असेही मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनातर्फे वेळोवेळी कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जे निर्देश दिले जात आहेत त्या निर्देशांचे पालन झाले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त करून कोरोना लसीकरण माहिमेला अधिक गती देण्याबाबतही सांगितले.

 

लसीकरण मोहिमेच्या पहिल्या फेरीत आरोग्य क्षेत्रात काम करणारे व कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कार्यरत असलेल्या फ्रंट लाईन वर्कर यांच्यासाठी असलेली लसीकरणाची मोहिम अधिक गतीने वाढविण्याबाबत स्पष्ट सुचनाही त्यांनी दिल्या.

 

जिल्ह्यात होणारे सांस्कृतिक, वैयक्तिक समारंभ येथे अमाप गर्दी जमा होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव अचानकपणे वाढविण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मार्गदर्शक सुचनाप्रमाणे नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थींना सोशल डिस्टन्सींग, मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करण्याबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती, याबाबत प्राथमिक स्वरूपाची माहिती व छायाचित्र लावण्यात यावीत असे त्यांनी स्पष्ट केले.  कोविड-१९ व्यतिरिक्त इतर आजारावर देखील लक्ष देणे गरजेचे आहे.  क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याचे काम हे ६० टक्के झाले आहे. हे काम अत्यल्प आहे, हे काम  वाढविण्यात यावेत अशा सुचना जिल्हा आरोग्य विभागास डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. मोतीबिंदू, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया  आणि  लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावे. जिल्ह्यातील गठीत कोविड-१९ टास्कफोर्सच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून जिल्ह्यातील संभाव्य वाढीव कोविड प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वेळोवेळी उपाययोजना करण्याबाबत सुचना देण्यात दिल्या.

 

0000



 *शालेय वाहनांच्या चालक व मालक यांच्यासाठी प्रबोधन* ▪️प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम


नांदेड, (जिमाका) दि. 16:-  रस्ते वाहतूक नियमांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने  राबविण्यात येणाऱ्या अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालक व मालक यांच्यासाठी प्रबोधन पर शिबिर 10  फेब्रुवारी 2021 रोजी संपन्न झाले. 
यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या दृष्टीने स्कूल बस चालकांना वाहतूकविषयक नियमांचे व परिवहन विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याबाबत व विद्यार्थ्यांची आसनक्षमतेपेक्षा जास्त वाहतूक न करण्याविषयी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 32 वे रस्ते सुरक्षा अभियान 2021 हे 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत जिल्हाभर राबविले जात आहे. 
या उपक्रमांतर्गत एक भाग असलेल्या
या प्रबोधन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव हे उपस्थित होते. या कार्यक्रमास स्कूलबस संघटनेचे  निखिल लातूरकर, ऑटो रिक्षा संघटनेचे अहमद बाबा व जिल्ह्यातील स्कूल बस, व्हॅनचालक व मालक यांची उपस्थिती होती.
यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टीने सर्व वाहनचालकांनी आपली जबाबदारी ओळखून रस्त्यांवर वाहन चालवताना काळजी घेण्याचे व रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्याविषयी उपस्थितांना आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच बोंढारे पीयूसी सेंटरचे ओम बोंढारे यांनी परिश्रम घेतले.

0000

21 कोरोना बाधितांची भर तर

25 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- मंगळवार 16 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 21  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 8 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  25 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

 

आजच्या 378 अहवालापैकी 354 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 906 एवढी झाली असून यातील 21 हजार 849 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 256 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील  10 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 590 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 14,  देगलूर कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 3, हदगाव कोविड रुग्णालय 1, किनवट रुग्णालय 2, लोहा तालुक्यातर्गंत 1 असे एकूण 25 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.38 टक्के आहे.  

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 6,  परभणी 1,  हदगाव तालुक्यात 1 असे एकुण 8 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 6हदगाव तालुक्यात 1, यवतमाळ 1, भोकर तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 4 असे एकूण 13 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 256 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 16, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 16,  किनवट कोविड रुग्णालय 15, हदगाव कोविड रुग्णालय 1,  देगलूर कोविड रुग्णालय 2,  नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 141, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 33,  हैदराबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 31 आहेत.  

 

मंगळवार 16 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 170, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 96 एवढी आहे.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 18 हजार 637

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 91 हजार 321

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 906

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 849

एकुण मृत्यू संख्या-590

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00 

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-256

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-10.    

0000

 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...