Saturday, September 3, 2016

सरकारच्या उपक्रमांच्या यशस्वीतेत
लोकसहभागाचे योगदान मोलाचे - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे
मरडगातील गटारमुक्तीचे कौतूक, तळणीत डिजीटल क्लासरुमचे उद्घाटन

नांदेड, दि. 3 :-  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी मरडगा येथील गटारमुक्त, डासमुक्त आणि टँकरमुक्त उपक्रमातील लोकसहभागाबाबत कौतुकोद्गार काढले. राज्य सरकारच्या उपक्रमात लोकसहभाग असेल, तर परिसराचा कायापालट होऊ शकतो, त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ठरतो, असे श्री. शिंदे म्हणाले. श्री. शिंदे यांच्यासोबत आमदार नागेश पाटील-आष्टीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, शिवसेनेचे पदाधिकारी भुजंग पाटील, मिलिंद देशमुख आदींचीही उपस्थिती होती.
श्री. शिंदे दोन दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये त्यांनी आज हदगाव तालुक्यातील मडरगा येथील शोषखड्ड्याच्या उपक्रमशीलतेची पाहणी केली. तसेच गटारमुक्तीमुळे डासमुक्त वातावरण निर्माण केल्याबद्दल नागरिकांचे कौतूक केले. यावेळी श्री. शिंदे यांच्या हस्ते मरडगा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचेही उद्घाटन संपन्न झाले. तसेच जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील डिजिटल क्लासरुमचेही उद्घाटनही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. मडरगा येथील नागरिकांशीही त्यांनी संवाद साधताना त्यांनी लोकवर्गणीतून डिजीटल शाळा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल तसेच हदगाव तालुक्यात 120 तर हिमायतनगर तालुक्यामध्ये 40 शाळांमध्ये डिजिटल शाळा उपक्रम यशस्वी केल्याबद्दलही कौतुकोद्गार काढले. परिसरातील जलयुक्त शिवार कामांबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांचेही भाषण झाले. यावेळी मरडगाचे सरपंच बाबुराव काळे, ग्रामपंचायत सदस्य आदींचीही उपस्थिती होती.
या दौऱ्यात श्री. शिंदे यांनी तळणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील डिजीटल क्लासरूम्सचे उद्गाटनही केले. तत्पुर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनही केले. तळणी येथील नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, पुलांचे बांधकाम तसेच साखळी बंधारे यांचे बांधकाम याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील , व त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्धतेबाबत प्रयत्न केले जातील, असेही सांगितले.
त्यांनतर धानोरा ग्रामपंचायतीमधील कयाधू जलशुद्धीकरण यंत्रणेचेही मंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते उद्गाटन करण्यात आले. मडरगा, तळणी आणि धानारो येथील कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

000000
राज्याला समृद्धीच्या दिशेने नेण्यात
सहकारी संस्थाचे योगदान मोलाचे - शिंदे
गोदावरी अर्बनच्या 12 व्या शाखेचे अर्धापुरात उद्घाटन
नांदेड, दि. 3 :- राज्याला समृद्धीच्या दिशेने नेण्यामध्ये सहकारी संस्थांचे मोलाचे योगदान असल्याने या संस्था अधिक सक्षम करण्याचे काम राज्य शासन करीत आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.    
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या 12 व्या अर्धापूर शाखेचे उद्घाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सर्वश्री डॉ. बालाजी किन्हीकर, शांतराम मोरे, अमित घोडा, प्रतापराव पाटील चिखलीकर, नागेश पाटील आष्टीकर, सोसायटीचे संस्थापक तथा आमदार हेमंत पाटील, अध्यक्षा सौ. राजश्री पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी व सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देवून स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम सहकारी संस्था करीत असतात, म्हणून अशा सहकारी संस्था आर्थिक पायावर सक्षमपणे  उभे राहण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी सर्वसामान्याच्या विश्वासास पात्र ठरल्याने तिची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. तिचे लवकरच बँकेत रुपांतर होईल असा विश्वासही श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
अर्धापूर भागातील कष्टकरी शेतकऱ्यांना आर्थिक ताकद मिळावी म्हणून ही सोसायटी काम करीत आहे, असे आमदार हेमंत पाटील यांनी सांगितले. तर आमदार नागेश पाटील आष्टीकर व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचीही समयोचित भाषणे झाली.
सोसायटीच्या अध्यक्षा सौ. राजश्री पाटील यांनी सोसायटीच्या प्रगतीचा आढावा घेतांना जनतेच्या विश्वासावर या सोसायटीच्या 12 शाखा सुरु झालेल्या आहेत. चार राज्यांसाठी आर्थिक व्यवहाराची परवानगी असणाऱ्या या सोसायटीचे प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या भागात केळी व हळदीचे महत्वाचे पीक आहे. यावर प्रक्रिया उद्योग सुरु करणाऱ्यांना अर्थसहाय्य दिले जाईल. त्यामुळे या भागात अधिक समृद्धी निर्माण होईल. नव उद्योजक निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला.  
यावेळी एका अपघात प्रसंगी सापडलेले सोसायटीचे सुमारे 6 लाख रुपये प्रामाणिकपणे परत करणारे कैलास बारसे, व्यसनमुक्तीचे काम करणारे उत्तमराव दुधाटे, शेतीनिष्ठ शेतकरी हनुमत राजेगोरे, आदींचा श्री. शिंदे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.  
प्रारंभी सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक धनजय तांबेकर यांनी प्रास्ताविक केले. आभार सुरेश कटकमवार यांनी मानले तर सुत्रसंचलन दिवाकर चौधरी यांनी केले. या समारंभात सोसायटीचे संचालक, अधिकारी, ठेवीदार नागरिक उपस्थित होते.

000000
वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र
नुतनीकरणाबाबत आवाहन
नांदेड, दि. 3 - योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज दिनांक 4 व 5 सप्टेंबर 2016 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे चालू राहणार आहे.  जिल्ह्यातील सर्व वाहन मालक-चालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
देगलुरच्या शासकीय तांत्रिक
विद्यालयातील अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु
नांदेड, दि. 3 -  शासकीय तांत्रिक माध्यमिक विद्यालय केंद्र रामपूर रोड देगलूर या संस्थेत उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रीकल टेक्नॉलाजी (द्विलक्षी) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे चालू आहे.
प्रवेशासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. अर्जाचा नमुना कार्यालयीन वेळेत मिळेल. प्रथम येणाऱ्यांना  प्रथम  प्रवेश  दिला  जाईल. मागासवर्गीय, अपंग विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे देय असणारी शासनाची स्कॉलरशीप मिळेल. मर्यादीत जागा असल्याने त्वरीत प्रवेश घ्यावा. शासनाने विहित केलेल्या नियमाप्रमाणे  विकास  निधी 1 हजार 200 रुपये दोन हप्त्यात भरावे लागेल. अधीक माहितीसाठी शासकिय तंत्र माध्यमिक विद्यालय केंद्र रामपूर रोड देगलूर  येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापक शासकिय तंत्र माध्यमिक विद्यालय देगलूर यांनी केले आहे.

00000000
विशेष घटक योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी
प्रस्ताव पाठविण्याची 30 सप्टेंबर पर्यंत मुदत
नांदेड, दि. 3 :-  सन 2016-17 या वर्षामधील विशेष घटक योजनेअंतर्गत नवीन विहीर इतर बाब घटकांचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक सर्व कागदपत्रांसह संबंधीत तालुक्यातील गटविकास अधिकारी कार्यालयास शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 अखेर पर्यंत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावतीने कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे. 
प्रस्तावासोबत लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे असतील. लाभार्थ्यांचा योजनेचा लाभ मिळणेबाबत विनंती अर्ज. अर्जात कोणत्या बाबीचा लाभ घेण्यास इच्छूक आहेत याचा उल्लेख असावा. जसे नवीन विहीर  किंवा इतर बाब. संबंधीत तालुक्याचे तहसिलदार यांनी दिलेले सन 2015-16  या वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र. लाभधारकाच्या शेत जमिनीचा  चालु वर्षाचा सात-बाराची प्रत, जमिनीचा टोच नकाशाची प्रत 8-अ. लाभधारकाच्या प्रस्तावासोबत सन 2002 च्या सर्वेक्षणानुसार दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव समाविष्ट  असल्याबाबत संबंधित लाभार्थ्याचे दारिद्रयरेषेचा यादी क्रमांक उल्लेख असलेले गट विकास अधिकारी यांचे मुळ प्रमाणपत्र. योजनेत अथवा इतर योजनेत नवीन विहीर घटकाचा लाभ घेतला नसल्याबाबतचे कृषि अधिकारी  ( विघयो ) यांचे  प्रमाणपत्र, गटविकास  अधिकारी यांचे प्रतिस्वाक्षरीसह (मुळ). लोकसंख्या नियंत्रण धोरणानुसार 1 मे 2001 नंतर दोन पेक्षा जास्त आपत्य नसल्याबाबत संबंधित गावाच्या  ग्रामसेवकाचे विहित  नमुन्यात मुळ प्रमाणपत्र.जात प्रमाणपत्राची साक्षांकित छायांकित प्रत. नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणारे प्रस्तावधारकासाठी संबंधीत गट नंबरमध्ये विहीर नसल्याचे तलाठी  यांचे मुळ प्रमाणपत्र. नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणा-या प्रस्ताव धारकासाठी इतर योजनेतून जसे एमआरईजीएस, जवाहर विहीर योजना  विहिरीसाठी  लाभार्थ्याची  निवड  करण्यात आली  नसल्याबाबतचे  ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र. अर्जदार शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसल्याबाबत ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी  योजनामध्ये ज्या लाभार्थींनी विहिरी घेतल्या आहेत त्या यशस्वी  झालेल्या आहेत अशा पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राधान्याने इतर बाबीसाठी (मोटार,पाईपलाईन इतर अनुषंगीक ) मागवावेत. ग्रामसभेचा निवड करणे बाबतचा ठराव. रेशनकार्डची सत्य प्रत प्रस्तावासोबत सादर करावी. संयुक्त खातेदार असल्यास कुटुंबात एकुण जमीन धारणाचे प्रमाण पत्र. सरपंच ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी यांनी दिलेले रहिवाशी प्रमाणपत्र. मतदान ओळखपत्र आधार कार्डाची झेरॉक्स. कृषि अधिकारी (विघयो) यांचा स्थळ पाहणी अहवाल.योजनेच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये दिलेल्या विविध प्रपत्रानुसार माहिती जोडावी.
लाभार्थी निवडीचे अटी व शर्ती पुढील प्रमाणे राहतील. लाभार्थी  हा अनुसूचित जातीचा असावा. लाभधारकाचे नावे विघयो अंतर्गत किमान 0.40 हेक्टर कमाल 6.0 हेक्टर मर्यादेपर्यंत शेत जमीन लाभधारकाचे नावे असणे आवश्यक आहे. लाभधारकाचे सन 2015-16 या वर्षाचे आर्थिक उत्पन्न 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) शेतक-यांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट राहणार नाही. विघयो योजनेसाठी लाभधारकाचे नाव सन 2002 च्या सर्वेक्षणानुसार दारिद्रयरेषेच्या  यादीमध्ये समाविष्ट असणे आवश्यक आहे. लाभधारकास 1 मे 2001 नंतर दोन पेक्षा जास्त  अपत्य झालेले नसावे. लाभधारकाची यापूर्वी विघयो योजनेत निवड झाली असल्यास लाभ घेतला असल्यास तसेच जवाहर इतर विहिरीच्या योजनेचा लाभ घेतलेला असल्यास संबंधित लाभार्थी चालू वर्षी  निवडीसाठी अपात्र राहिल. मार्गदर्शक सुचनाप्रमाणे  प्रस्ताव धारकाकडे असलेल्या क्षेत्र धारणे नुसार निवड यादीमध्ये प्राधान्यक्रम देण्यात येइल 2 हेक्टर पर्यंत क्षेत्र असल्यास प्रथमप्राधान्य, 2 ते 4 हेक्टर क्षेत्र  असल्यास द्वितीय प्राधान्य 4 ते 6 हेक्टर क्षेत्र असल्यास तृतीय प्राधान्य याक्रमाने यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामधून जिल्हयासाठी ठरविण्यात आलेला लक्षांक 5 हजार 200 लाभार्थीच्या मर्यादेत  लाभधारकाची निवड करण्यात येईल. यापुर्वी योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी निवडीस पात्र राहणार नाहीत. प्रस्तावासोबत जोडण्यात येणारी सर्व कागदपत्र साक्षांकित करुनच जोडावीत, अन्यथा अर्ज अपात्र होईल.
सन 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या प्रमाणात अनु.जातीच्या लोकसंख्येवर आधारीत लाभार्थी निवडीचे उददीष्ट दर्शविणारा तक्ता (अनु.जाती)
अं.क्रं.
तालुका
                                  अनु.जाती
अनुसूचीत जातीची लोकसंख्या
अनुसूचीत जातीचे लोकसंख्येची टक्केवारी
सन 2016-17 करिता अनु.जाती उपयोजने अंतर्गत (विशेष घटक योजने करिता)अनुसूचीत जातीचे लाभार्थी निवडीचे उददीष्ट
1
नांदेड
145676
22.74
1182

2
मुदखेड
19961
3.12
162
3
अर्धापूर
19976
3.12
162
4
बिलोली
36323
5.67
295
5
धर्माबाद
18794
2.93
152
6
नायगांव
40718
6.35
330
7
मुखेड
65542
10.24
532
8
कंधार
52795
8.25
429
9
लोहा
41604
6.49
337
10
हदगांव
56361
8.79
457
11
हिमायतनगर
15066
2.35
122
12
भोकर
21968
3.43
178
13
उमरी
20354
3.18
165
14
देगलुर
52191
8.15
424
15
किनवट
24569
3.84
200
16
माहुर
8585
1.35
73
एकुण
640483
100
5200

0000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...