Saturday, September 3, 2016

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे
मंगळवारी आयोजन
नांदेड दि. 3 :- जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती व नांदेड वाघाळा शहर  महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने दरमहा आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे या महिन्यात मंगळवार 6 सप्टेंबर रोजी 2016 रोजी सायंकाळी 5  वा. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह श्री गुरु गोबिंदसिंग स्टेडियम परिसर नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे.
            राजमुद्राकार मनोहर भोळे हे याप्रसंगी विद्यार्थ्यांशी सवांद साधणार असून या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी व प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे व महानगरपालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे हे राहणार आहेत.
            याप्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी व प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता यापदी नुकतीच निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहे. या शिबिराचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...