Thursday, April 22, 2021

1 हजार 293 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी नांदेड जिल्ह्यात 1 हजार 99 व्यक्ती कोरोना बाधित 27 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

            1 हजार 293 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी 

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 99 व्यक्ती कोरोना बाधित

 27 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3  हजार 981 अहवालापैकी  1 हजार 99 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 788 तर अँटिजेन तपासणीद्वारे 311 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 72 हजार 890 एवढी झाली असून यातील 57  हजार  273 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 14  हजार  8 रुग्ण उपचार घेत असून 240 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 20 ते 22 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 349 एवढी झाली आहे.   दिनांक 20 एप्रिल रोजी अपेक्षा कोविड रुग्णालय येथे देगलूर येथील 67 वर्षाची महिला, गोदावरी कोविड रुग्णालय येथे मुखेड येथील 82 वर्षाचा पुरुष, दिनांक 21 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे शिवाजी चौक लोहा येथील 60 वर्षाचा पुरुष, इंदिरा नगर लोहा येथील 66 वर्षाचा पुरुष, किनवट तालुक्यातील इसलापूर येथील 60 वर्षाचा पुरुष, मुखेड तालुक्यातील मेथी येथील 63 वर्षाची महिला, कंधार येथील 62 वर्षाचा पुरुष, हदगाव येथील 55 वर्षाचा पुरुष, समता नगर नांदेड येथील 56 वर्षाचा पुरुष, भोकर येथील 57 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल हडको नांदेड येथील 61 वर्षाचा पुरुष, सांगवी नांदेड येथील 48 वर्षाचा पुरुष, मुदखेड येथील 60 वर्षाची महिला, बिलोली येथील 74 वर्षाचा पुरुष, अर्धापूर तालुक्यातील लहान येथील 65 वर्षाची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथील 55 वर्षाची महिला, मुदखेड येथील 65 वर्षाची महिला, अपेक्षा कोविड रुग्णालय विशाल नगर नांदेड येथील 81 वर्षाचा पुरुष, भगवती कोविड रुग्णालय कंधार तालुक्यातील बोरी बु. येथील 72 वर्षाचा पुरुष, श्रीगणेशा कोविड रुग्णालय विनय नगर नांदेड येथील 73 वर्षाचा पुरुष, गुरुजी कोविड रुग्णालय येथे छत्रपती चौक नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, डेल्टा कोविड रुग्णालय सरपंच नगर नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, यशोसाई कोविड रुग्णालय असर्जन नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, दिनांक 22 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे बळीरामपूर नांदेड येथील 42 वर्षाचा पुरुष, नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील 65 वर्षाची महिला,मुदखेड तालुक्यातील इजळी येथील 60 वर्षाचा पुरुष, हदगाव तालुक्यातील नेवरी येथील 62 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.57 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 328, बिलोली 66, कंधार 67, मुखेड 6, माहूर 4, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 24, देगलूर 50, किनवट 61, नायगाव 33, यवतमाळ 3, अर्धापूर 1, धर्माबाद 2, लोहा 18, उमरी 41, लातूर 3, भोकर 41, हिमायतनगर 26, मुदखेड 9, हदगाव 2, परभणी 2  असे एकूण 788 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 30, बिलोली 5, हिमायतनगर 18, माहूर 22, उमरी 19, नांदेड ग्रामीण 12, देगलूर 9, कंधार 3, मुदखेड 22, हिंगोली 1, अर्धापूर 5, धर्माबाद 4, किनवट 44, मुखेड 44, भोकर 16, हदगाव 7, लोहा 13, नायगाव 37  व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 311 बाधित आढळले.

 

आज 1 हजार 293 कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 18, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 719, भोकर तालुक्यातंर्गत 1, देगलूर कोविड रुग्णालय 13, अर्धापूर तालुक्यातंर्गत 20, उमरी तालुक्यातंर्गत 24, खाजगी रुग्णालय 107, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 48, मुखेड कोविड रुग्णालय 130, कंधार तालुक्यातंर्गत 24, किनवट कोविड रुग्णालय 64, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 29, बारड कोविड रुग्णालय 4, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 29, हदगाव कोविड रुग्णालय 11, माहूर तालुक्यातंर्गत 17, नायगाव तालुक्यातंर्गत 2, लोहा तालुक्यातंर्गत32, मांडवी कोविड केअर सेंटर 1 यांचा समावेश आहे. 

 

जिल्ह्यात 14 हजार 8 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 245, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 111, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 209, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 137, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 142, नायगाव कोविड केअर सेंटर 52,उमरी कोविड केअर सेंटर 70, माहूर कोविड केअर सेंटर 57, भोकर कोविड केअर सेंटर 13, हदगाव रुग्णालय 51, बारड कोविड केअर सेंटर 15, भक्ती कोविड केअर सेंटर 56, एनआरआय कोविड केअर सेंटर 85, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 210, मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 5 हजार 923 , मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 179, देगलूर कोविड रुग्णालय 54, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 61, बिलोली कोविड केअर सेंटर 94, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 9, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 105, कंधार कोविड केअर सेंटर 29, धर्माबाद कोविड केअर सेंटर 133, मुदखेड कोविड केअर सेंटर 312, अर्धापूर कोविड केअर सेंटर 9, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 3 हजार 451 खाजगी रुग्णालय 2 हजार 184 , हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 14 हजार 8 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 7, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 8 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 31 हजार 7

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 49 हजार 644

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 72 हजार 890

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 57 हजार 273

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 349

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.57 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-45

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-88

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-379

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-14 हजार 8

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-240

00000

 

हनुमान जयंती साधेपणाने साजरा करावी - जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

                                                    हनुमान जयंती साधेपणाने साजरा करावी

- जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :-  शासनाने कोव्हिड-19 च्‍या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्‍सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्‍यात येत आहेत. सध्‍या कोविड-19 च्‍या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्‍या अतिसंसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. सध्‍या राज्‍यात तसेच मोठया शहरांमध्‍ये रुग्‍णांच्‍या संख्‍येत पुन्‍हा वाढ होताना दिसत आहे. त्‍यामुळे उद्भवलेल्‍या परिस्थितीचा विचार करता यावर्षी मंगळवार 27 एप्रिल 2021 रोजी हनुमान जयंती हा उत्‍सव अत्‍यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढीलप्रमाणे पाच मागर्दशक सूचनेनुसार कार्यवाही करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

1.      कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्‍या घरी हनुमान जयंती उत्‍सव  साजरा करावा. 

2.      कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्‍थळे बंद ठेवण्‍यात आली असल्‍याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही.

3.      मंदिरामधील व्‍यवस्‍थापक, विश्‍वस्‍त यांनी शक्‍य असल्‍यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्‍यादी द्वारे उपलब्‍ध करून द्यावी.                

4.    हनुमान जयंती उत्‍सवानिमित्‍त कोणत्‍याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्‍यात येऊ नयेत.   

5.     कोवीड-19 च्‍या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्‍यक्ष सण  सुरू होण्‍याच्‍या मधल्‍या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्‍द झाल्‍यास त्‍यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न   करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी , कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही. 

0000

 

 

 

 

 

महावीर जयंती साधेपणाने साजरा करावी

- जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 22 :-  शासनाने कोव्हीड-19 च्‍या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्‍सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्‍यात येत आहेत. सध्‍या कोविड-19 च्‍या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्‍या अतिसंसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. सध्‍या राज्‍यात तसेच मोठ्या शहरांमध्‍ये रुग्‍णांच्‍या संख्‍येत पुन्‍हा वाढ होताना दिसत आहे. त्‍यामुळे उद्भवलेल्‍या परिस्थितीचा विचार करता यावर्षी रविवार 25 एप्रिल 2021 रोजी महावीर जयंती हा उत्‍सव अत्‍यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढीलप्रमाणे पाच मागर्दशक सूचनेनुसार कार्यवाही करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

1.      कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्‍या घरी महावीर जयंती उत्‍सव  साजरा करावा. 

2.      कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्‍थळे बंद ठेवण्‍यात आली असल्‍याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही.

3.      मंदिरामधील व्‍यवस्‍थापक, विश्‍वस्‍त यांनी शक्‍य असल्‍यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेब साईट व फेसबुक इत्‍यादी द्वारे उपलब्‍ध करून द्यावी.                

4.    महावीर जयंती उत्‍सवानिमित्‍त कोणत्‍याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्‍यात येऊ नयेत.   

5.     कोवीड-19 च्‍या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्‍यक्ष सण  सुरू होण्‍याच्‍या मधल्‍या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्‍द झाल्‍यास त्‍यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न   करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी , कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही. 

0000

           

 

विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांच्या अडी-अडचणी

सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरु

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ भांबुर्डा, शिवाजीनगर पुणे यांच्यावतीने एप्रिल, मे 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251733 व इयत्ता बारावीसाठी 02382-251633 या हेल्पलाईन सुरु करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांनी अडी-अडचणी विषयी या हेल्पलाईन क्रमांकावर पुढे दिलेल्या समुपदेशकांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे विभागीय सचिव सुधाकर तेलंग यांनी कळविले आहे.

 

लातूर जिल्ह्यासाठी वारद जे.एम-9850695303, दानाई एस.एस.-9422015152. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कदम व्ही.के.-9423721756, श्रीमती चंदनशिवे एस.जे.-9518304556, 9527296605, पांचाळ एस.एम-9421359840 नांदेड जिल्ह्यासाठी कच्छवे बी.एम-9371261500, कारखेडे बी.एम-9860912898, सोळंके पी.जी.9860286857, पाटील बी.एच-9767722071 नमूद केलेल्या समुपदेशकाचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही विभागीय सचिव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शक सुचना

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू

जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शक सुचना

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :-   जिल्ह्यात कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आपत्कालीन उपाययोजना म्हणून दिनांक 20 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये जिल्ह्यात अत्‍यावश्‍यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु राहण्‍यास परवानगी देण्‍यात आली आहे. दिनांक 1 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये सकाळी 7 वाजेपर्यंत लागू करण्‍यात आले आहेत. जिल्ह्यात दिनांक 22 एप्रिल, 2021 चे रात्री 8 वाजेपासून ते            1 मे 2021 रोजीच्‍या  सकाळी 7 वाजतापर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लागू केले आहेत. यामध्ये कार्यालयीन उपस्थिती, लग्न समारंभ, खाजगी प्रवासी वाहतूक, सार्वजनिक प्रवासी वाहतूक याबाबतच्या मार्गदर्शक सूचनानिर्गमित केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे राहतील.

अ)   कार्यालयीन उपस्थिती

अ)   कोविड-19 व्‍यवस्‍थापनाशी संबंधित अत्‍यावश्‍यक सेवा देणारी कार्यालये वगळता सर्व सरकारी कार्यालये (राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये) केवळ १५ टक्के कर्मचारी क्षमतेनेच कार्यरत राहतील.

ब)    राज्‍य शासनाचे आदेश दिनांक 13 एप्रिल, 2021 मधील मुद्दा क्रमांक 5 मध्‍ये नमुद इतर कार्यालये ही त्‍यांच्‍या क्षमतेच्‍या १५ टक्के किंवा 5 कर्मचारी, कर्मचारी क्षमतेनेच कार्यरत राहतील. कोरोनाशी संबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात आले आहे.

क)   राज्‍य शासनाचे आदेश दिनांक 13 एप्रिल, 2021 मधील मुद्दा क्रमांक 2 मध्‍ये नमुद अत्‍यावश्‍यक सेवा पुरविणारे कार्यालये, कामाचे ठिकाण हे किमान क्षमतेनुसार सुरू राहतील. परंतू तेथील उपस्थिती 50 टक्‍के पेक्षा जास्‍त असता कामा नये, आणि प्रत्यक्ष लोकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी असेल.

आ)लग्‍न समारंभ

लग्नसमारंभ फक्त एकाच हॉलमध्ये दोन तासांमध्येच पूर्ण करावे लागतील. यासाठी एकूण २५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कुटुंबाला ५० हजार रुपये दंड व हॉलवर कोरोनाची परिस्थिती सामान्य होईपर्यंत बंदी घालण्यात येईल.

 

 

इ)     खाजगी प्रवासी वाहतूक

अ)   बसेस सोडून इतर खाजगी प्रवासी वाहतूक फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच करता येईल. त्यासाठी चालक आणि एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. हे नियम आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत वाहनांना लागू नसून प्रवासी राहात असलेल्या शहरांनाच लागू असतील. आंतरजिल्हा किंवा जिल्हातर्गंत प्रवास अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसारख्या टाळता न येण्यासारख्या कारणासाठीच करता येईल. नियमभंग करणाऱ्यांवर दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

ब)    खासगी बसमध्ये एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना परवानगी असेल. उभ्याने प्रवास करण्यास मनाई असेल.

क)   शहरांतर्गत तसेच जिल्‍हातंर्गत खाजगी प्रवासी बसेस या खालील अटी व शर्तीच्‍या अधिन राहून सुरू राहतील.

1)     बस सेवा पुरविणाऱ्यांनी शहरातील प्रवासी थांबे दोन या मर्यादेत ठेवावे. आणि जिल्‍हा आपत्‍ती प्राधिकरणास आपल्‍या नियोजीत मार्गक्रमणाबाबत सूचीत करावे आणि आवश्‍यकता भासल्यास जिल्‍हा आपत्‍ती प्राधिकरण त्‍यामध्‍ये बदल करू शकेल. 

2)      बस थांब्‍यावर ज्‍या ठिकाणी प्रवासी उतरतील त्‍यावेळी त्‍यांचे हातावर १४ दिवसांच्या विलगीकरणाचा (क्वारंटाईन) शिक्का मारण्यात यावा. हा शिक्का बस सेवा पुरवणाऱ्यानेच मारणे बंधनकारक आहे.

3)     या ठिकाणी थर्मल स्‍कॅनरचा वापर करण्‍यात यावा आणि लक्षणे असणाऱ्या प्रवाशांची कोविड सेंटर किंवा रुग्‍णालयामध्‍ये रवानगी करावी.

4)   खाजगी बसेसमधून येणाऱ्या प्रवाशांची रॅपीड अँटीजन चाचणी (RAT) करण्यासाठी स्‍थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्‍या थांब्‍यावर अधिकृत लॅबद्वारा सेवा पुरवतील. चाचणीचा खर्च संबंधित प्रवाशाकडून किंवा बस सेवा पुरवणाऱ्याकडून घेतला जाईल.

5)    कोणताही खासगी बस सेवा पुरवठादार या नियमांचा भंग करताना आढळला, तर त्याला दहा हजारांचा दंड ठोठावण्यात येईल. वारंवार नियमांचा भंग केल्यास त्याचा परवाना कोविड परिस्थिती सामान्‍य होईपर्यंत  रद्द करण्यात येईल.

6)     आंतरजिल्‍हा प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्‍या हातावर खाजगी वाहतूकदारांद्वारे क्वारंटाईन असा शिक्का मारण्‍यात यावा.

ई)     सार्वजनिक प्रवासी वाहतूक  

अ)   राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाच्या बसेसला ५० टक्के आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असेल. परंतू उभे राहून प्रवास करण्यास मनाई असेल.

आ)जिल्हांतर्गत किंवा आंतरजिल्हा सेवा देणाऱ्या लांब पल्‍याच्‍या बस किंवा रेल्वे या खालील अटी व शर्तीच्‍या अधिन राहून सुरू राहतील.

1)     रेल्वे अधिकारी किंवा एसटी बस अधिकारी स्थानिक प्रशासनास प्रवाशांची सर्व माहिती स्क्रीनिंग करिता पुरवतील किंवा उपलब्‍ध करून देतील.

2)     थांब्यावर उतरल्यावर प्रवाशांच्या हातावर १४ दिवस गृह विलगीकरण (होम क्वारंटाईन) चा शिक्का मारला जाईल. थर्मल स्कॅनरमध्ये लक्षणे दिसल्यास संबधित प्रवाशास कोविड केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवले जाईल.

3)     सार्वजनिक वाहनाद्वारे येणाऱ्या प्रवाशांची रॅपीड अँटीजन चाचणी (RAT) करण्यासाठी स्‍थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्‍या थांब्‍यावर अधिकृत लॅब द्वारा सेवा पुरवतील. चाचणीचा खर्च संबंधित प्रवाशाकडून किंवा बस सेवा पुरवणाऱ्याकडून घेतला जाईल.

4)   आंतरजिल्‍हा प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्‍या हातावर रेल्वे प्रशासन, महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळ यांच्‍याद्वारे क्वारंटाईन असा शिक्का मारण्‍यात यावा.

या आदेशात निर्दिष्‍ट केलेल्‍या व्‍यतिरिक्‍त इतर सर्व अटी ह्या राज्‍य शासनाचे आदेश 13 एप्रिल, 2021 नुसार व त्‍या अनुषंगाने जारी केलेल्‍या पुरक टिपण्‍या आणि स्‍पष्‍टीकरणांसह लागू राहतील. या आदेशांची अंमलबजावणी 22 एप्रिल, 2021 चे रात्री 8 वाजेपासून ते 1 मे 2021 चे सकाळी ७ वाजेपर्यत लागू राहील. 

या आदेशाची अमंलबजावणी करण्‍याची जबाबदारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जि.प. नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड, आयुक्‍त, नांदेड वाघाळा महानगरपालीका नांदेड, मुख्‍याधिकारी, सर्व नगर परीषद / नगर पंचायत यांचे वर राहील.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न  करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी, कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...