Friday, February 12, 2021

 

20 कोरोना बाधितांची भर तर

22 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- शुक्रवार 12 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 20  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 8 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  22  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 661 अहवालापैकी 640 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 791 एवढी झाली असून यातील 21 हजार 742 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 250 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 6 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 590 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 11, खाजगी रुग्णालय 3, हदगाव कोविड रुग्णालय 3, लोहा तालुक्यांतर्गत 1 असे एकूण 22 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.39 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 7, बिलोली तालुक्यात 1, कंधार 1, नांदेड ग्रामीण 2, नायगाव 1 असे एकुण 12 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 3, यवतमाळ 1, किनवट तालुक्यात 4 असे एकूण 8 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 250 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 12, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 14,  मुखेड कोविड रुग्णालय 3, किनवट कोविड रुग्णालय 16, देगलूर कोविड रुग्णालय 2,  नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 147, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 35, हैदराबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 20 आहेत.   

शुक्रवार 12 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 171, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 95 एवढी आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 16 हजार 405

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 89 हजार 238

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 791

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 742

एकुण मृत्यू संख्या-590

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.39 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1 

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-250

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-6.          

0000

 

विद्यापीठ परिसरात आता साकारेल

शासकिय अध्यापक महाविद्यालयाची नवीन वास्तू

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

नांदेड (जिमाका) 12 :-  सन 1968 पासून येथे कार्यान्वित असलेल्या शासकिय अध्यापक महाविद्यालयास आता सुमारे 14 कोटी 50 लाख रुपयांची भव्य वास्तू मिळणार असून लवकरच नांदेडच्या शैक्षणिक वैभवात या परिपूर्ण वास्तुतून विस्तार साधला जाणार आहे. बी.एड. महाविद्यालयाची ही वास्तू साकारावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करुन नांदेडच्या शैक्षणिक हब मधील ही कमतरता भरुन काढली आहे. 

नांदेडमधील जुन्या महाविद्यालयांपैकी एक असलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयास स्वतःची इमारत नव्हती. भाडेतत्त्वावर जागा किरायाने घेऊन हे महाविद्यालय सुरु होते. महाविद्यालयाचा दर्जा ठरविणाऱ्या युजीसीची नॅक कमिटी व नॅशनल कॉन्सील फॉर टीचर एज्युकेशन (एनपीसीई) या संस्थेने सुद्धा महाविद्यालयास स्वतःची इमारत असावी, असे सूचित केले होते. 

यासंदर्भात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून शासकीय अध्यापक महाविद्यालयास स्वतंत्र इमारत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या इमारतीसाठी जागेची आवश्यकता होती. अशावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या समवेत बैठक घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात आता या महाविद्यालयास जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  या जागेवर आता 14.41 कोटी रुपयांची भव्य वास्तू उभारली जाणार आहे. 

या इमारतीमध्ये अध्यापनासाठीच्या सुसज्य खोल्या, कार्यालय, ग्रंथालय, पार्किंग, अग्निशमन यंत्रणा, सौरउर्जा प्रकल्प यासह सर्व सोयी राहणार आहेत. ईबीसी वसतिगृहानंतर केवळ आठ दिवसात शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या नवीन वास्तूस शासनाने मान्यता दिली असून नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात नवी भर पडली आहे.

00000

 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका) 12 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे शनिवार 13 फेब्रुवारी रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

शनिवार 13 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई येथुन विमानाने सकाळी 10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11 वा. डॉ. शंकरराव चव्हाण को-ऑपरेटिव्ह बायोशुगर ॲण्ड प्रॉडक्टस इंडस्ट्रीज लि. शिवाजीनगर डोंगरकडा ता. कळमनुरी जि. हिंगोलीच्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थिती. स्थळ- लक्ष्मीनगर देगाव-येळेगाव ता. अर्धापूर जि. नांदेड. सकाळी 11.45 वा. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि. लक्ष्मीनगर देगाव-येळेगाव ता. अर्धापूर संस्थेच्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थिती. स्थळ लक्ष्मीनगर देगाव-येळेगाव ता. अर्धापूर. दुपारी 3 वा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचेसमवेत गणितीय संकुलाचे इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. दुपारी 3.15 वा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे समवेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कोविड लॅबची पाहणी. स्थळ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. दुपारी 3.30 वा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या समवेत गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था नांदेडच्या रोबोट प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड. दुपारी 3.45 वा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या समवेत गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था नांदेडच्या विकास कामांबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था नांदेड विष्णुपुरी नांदेड.

 

रविवार 14 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 8 वा. नांदेड येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...