Monday, July 11, 2022

 नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचा निर्धार

 

·         7 लाख तिरंगा ध्वजाचे केले जात आहे नियोजन

·         11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत विशेष उपक्रम

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी  वर्षानिमित्त संपूर्ण नांदेड जिल्हा हर घर तिरंगा या विशेष मोहिमेसाठी सज्ज झाला असून जिल्हा प्रशासनातर्फे सुक्ष्म नियोजनावर भर दिला जात आहे. यासंदर्भात व्यापक कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आढावा बैठक घेतली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे याबाबत आज विशेष आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, देगलुरच्या उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, प्रशांत दिग्रसकर कापड व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता सुमारे 7 लाख घरे दृष्टिपथात ठेवली आहेत. प्रत्येक घरावर तिरंगा लागावा यासाठी दिनांक 11 ते 17 ऑगस्ट हा कालावधी निश्चित केला आहे. हर घर तिरंगा साठी प्रत्येक नागरिक आपल्या घरावर तिरंगा लावेल असा विश्वास डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीप्राथमिक-माध्यमिक शाळा, ग्रामीण आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तालुका पातळीवर पंचायत समिती, तहसील कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यालयाच्या परस्पर सहयोगातून ही मोहिम यशस्वी केली जाईल. हर घर तिरंगा या अभिनव उपक्रमात नांदेड जिल्हा आपल्या राष्ट्रकर्तव्याप्रती वेगळी मोहोर उमटवेल असा विश्वासही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बोलून दाखविला.

 

या मोहिमेला लागणारे ध्वज याच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील बचतगटांना प्रोत्साहित केले जात आहे. याचबरोबर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था यांचा सहभाग घेतला जाईल. प्रत्येक व्यक्तीचे या उपक्रमात योगदान अभिप्रेत असून हा सहभाग स्वतंत्र ॲपद्वारे नोंदविला जात आहे. यासाठी नागरिकांनीही उर्त्स्फूतपणे पुढे येऊन आपल्या घराच्या पत्त्यासह असलेली माहिती https://harghartirangananded.in या लिंकवर भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. सर्वसामान्यांना सहज माहिती भरता येईल असा पद्धतीने हे ॲप विकसित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

000000 











 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 29 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3  अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या लाख हजार 962 एवढी झाली असून यातील लाख 246 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 24 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 10 व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील असे एकुण 11 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 9नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 14शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी असे एकुण 24 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्थाप्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्कसॅनिटायझरसुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- लाख हजार 914
एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 89 हजार 612
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- लाख हजार 962
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- लाख 246
एकुण मृत्यू संख्या-हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-24
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.
0000

 शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या सर्व शासकीय वसतिगृहात या शौक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याबाबतची प्रक्रिया सुरु झालेली आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

 

इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या तसेच इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या व पदवी  प्रथम वर्षात व पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या प्रवेशोत्सूक विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरून द्यावेत. इयत्ता 8 वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार 15 जुलै तर इयत्ता 10 वी व 11 वी साठी शनिवार 30 जुलै पर्यंत प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रवेश अर्ज भरुन सादर करावे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाहीयाची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही समाज कल्याण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 7.40 मि.मी. पाऊस  

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात सोमवार 11 जुलै  रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 7.40  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 366.30 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात सोमवार 11 जुलै 2022 रोजी सकाळी  संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 0.90 (384.80), बिलोली- 40.50 (370.30), मुखेड- 4.40 (386.40), कंधार-2 (428.60), लोहा-2.80 (365.80), हदगाव-1.60 (275.40), भोकर- 4.50 (336.10), देगलूर-5.20 (381.), किनवट- 11.30 (361.40), मुदखेड- 4 (468.20), हिमायतनगर-13.20 (452.70), माहूर- 7.30 (282.90), धर्माबाद- 9(339), उमरी- 8 (415.50), अर्धापूर- 0.90 (358), नायगाव- 4.80 (297.30) मिलीमीटर आहे.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...