Monday, February 21, 2022

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित

तर 15 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 769 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 730 एवढी झाली असून यातील 99 हजार 954 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 86 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

रविवार 20 फेब्रुवारी 2022 रोजी हिमायतनगर तालुक्यातील कांडली दरेगाव येथील 15 वर्षाच्या महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 690 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, धर्माबाद 1 व देगलूर 1 असे एकुण 3 कोरोना बाधित आढळले आहे.

 

आज जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 13 असे एकुण 15 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 8, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 69, खाजगी रुग्णालय 5 असे एकुण 86 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 70 हजार 268

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 50 हजार 647

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 730

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 99 हजार 954

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 690

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.29 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-86

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 21 :- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पुर्व परीक्षा-2021 शनिवार 26 फेब्रुवारी 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील 63 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.

जिल्ह्यातील विविध 63 केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत परीक्षा होणार आहे. त्यासाठी 17 हजार 567 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

00000

प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांचा दौरा   

नांदेड, (जिमाका) दि. 21 :-  प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

मंगळवार 22 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे येथून सकाळी 8 वा. नांदेडकडे आगमन. सायं. 4 वा. ग्रामीण दंत महाविद्यालय ॲण्ड रिसर्च सेंटरला भेट व नांदेड येथे मुक्काम. बुधवार 23 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वा. सहसंचालक उच्च शिक्षण विभाग यांच्या समवेत चर्चा. दुपारी 12 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे सुनावनीस उपस्थित व नांदेड येथे मुक्काम. गुरुवार24 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8 वा मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण करतील.

00000


    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...