Friday, September 25, 2020

 

247 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

232 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 25 :- शुक्रवार 25 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 247 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 232 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 76 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 156 बाधित आले. 

आजच्या एकुण 945 अहवालापैकी  676 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 14  हजार 668 एवढी झाली असून यातील 10  हजार 697 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 519 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 53 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  

या अहवालात एकुण तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवार, दि. 23 सप्टेंबर रोजी विकास नगर कौठा नांदेड येथील 54 वय वर्षाचा एक पुरुष खाजगी रुग्णालयात तर शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर रोजी भोकर तालुक्यातील सोमठाणा 70 वय वर्षाची एक महिला यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे तर शिवराज नगर नांदेड येथील 57 वय वर्षाचा एक पुरुष यांचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 381 झाली आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 8, बिलोली कोविड केअर सेंटर 8,धर्माबाद कोविड केअर सेंटर 9, मुखेड कोविड केअर सेंटर 23, भोकर कोविड केअर सेंटर 28, खाजगी रुग्णालय 141, कंधार कोविड केअर सेंटर 5, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड 7, किनवट कोविड केअर सेंटर 29, लोहा कोविड केअर सेंटर 2, नायगाव कोविड केअर सेंटर 8, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 46, हदगाव कोविड केअर सेंटर 12, मुदखेड कोविड केअर सेंटर 38 असे 247 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 52, माहूर तालुक्यात  1, अर्धापूर तालुक्यात  2, धर्माबाद तालुक्यात  1, उमरी तालुक्यात 3, हिमायतनगर तालुक्यात  1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 1, मुखेड तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 2 , लोहा तालुक्यात 6, हिंगाली 3, यवतमाळ 1असे एकुण 76 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 64,  हदगाव तालुक्यात 6, धर्माबाद तालुक्यात 13, किनवट तालुक्यात 10, बिलोली तालुक्यात 5, अर्धापूर तालुक्यात 4, भोकर तालुक्यात 3,  हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 7, मुदखेड तालुक्यात 3, लोहा तालुक्यात 8, मुखेड तालुक्यात 23, नायगाव तालुक्यात 4, कंधार तालुक्यात 2, उमरी तालुक्यात 3 असे एकूण 156 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 519 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 270, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 776, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 83, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 45,  आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 36, नायगाव कोविड केअर सेंटर 93, बिलोली कोविड केअर सेंटर 44, मुखेड कोविड केअर सेंटर 144, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केअर सेंटर 70, लोहा कोविड केअर सेंटर 40, हदगाव कोविड केअर सेंटर 37, भोकर कोविड केअर सेंटर 43, कंधार कोविड केअर सेंटर 29, बारड कोविड केअर सेंटर 14, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 113, मुदखेड कोविड केअर सेटर 54,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 23, किनवट कोविड केअर सेंटर येथे 129, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 55, उमरी कोविड केअर सेंटर 75, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 25,  खाजगी रुग्णालयात 314 बाधित, हैद्राबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद येथे संदर्भित 2, निजामाबाद येथे संदर्भित 1, लातूर येथे संदर्भित 1, अकोला येथे संदर्भित 1, आदिलाबाद येथे संदर्भित 1  झाले आहेत.   

 जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 76 हजार 658,

निगेटिव्ह स्वॅब- 58 हजार 471,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 232,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 14 हजार 668,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-15

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 10,

एकूण मृत्यू संख्या- 381,                         

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 10 हजार 697,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 519,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 379, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 53,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 75.24 टक्के  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 

 

शौर्यदिनानिमित्त 29 सप्टेंबर रोजी माजी सैनिकांचा सत्कार

मालमत्ता कर माफी योजना प्रमाणपत्र वाटपाचा शुभारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 25:- शौर्यदिनाचे औचित्य साधून शासनाच्या “मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना” प्रमाणपत्र वाटप शुभारंभ येत्या 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते होणार आहे. कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या  प्रादूर्भावअंतर्गत शासनाच्या नियमांचे पालन करत अत्यंत साधेपणाने हा शौर्यदिन साजरा करण्यात येणार आहे. 

 

मालमत्ता कर माफी प्रमाणपत्रासाठीचे अर्ज  सैनिक कल्याण कार्यालयात स्विकारण्यात येत आहेत. माजी सैनिकांनी अर्जांसोबत चालू वर्षे 2020 ची मालमत्ता कर पावती व ओळखपत्र छायांकित प्रत जोडून अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.  या योजनेअंतर्गत फक्त एकच  मालमत्तासाठी  माजी सैनिक किंवा पत्नीच्या नावावर असलेली प्रोपर्टीसाठी प्रमाणपत्र अदा करण्यात येईल.  माजी सैनिकांनी प्रमाणपत्रासाठी गर्दी व  घाई करु नये. अर्ज पोस्टाने किंवा तालूका संघटनेतर्फे एकत्रित आणून दिले, तरीही प्रमाणपत्र माजी सैनिकांना पाठविण्यात येतील असेही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 

जिल्हयातील वीरनारी, वीरपिता, वीरमाता आणि माजी सैनिकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी सैनिक संघटना अध्यक्ष यांचा सत्कार यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केला आहे 

 

भारतीय सैन्य दलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्वीत घुसून सर्जीकल स्ट्राईकव्दारे अतिरेक्यांचा खात्मा केला.  जम्मु कश्मीर  उरी येथे  झालेल्या अतिरेक्याचा भ्याड हल्ल्याचा  बदला घेण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आली होती.  भारतीय सैन्याची ही अभिमानस्पद कामगिरी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी शौर्यदिन साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे.

000000

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...