Thursday, August 27, 2020

 

मतदार यादी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम घोषीत 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- मा. भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनाकांवर आधारीत विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम पुढील प्रमाणे घोषीत केला आहे.    

 गुरुवार 27 ऑगस्ट 2020 पर्यंत दावे हरकती निकाली काढणे. सोमवार 7 सप्टेंबर 2020 पर्यंत मतदार यादीची तपासणी करणे व अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यास परवानगी प्राप्त करणे. शुक्रवार 18 सप्टेंबर 2020 पर्यंत डाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्याची छपाई करणे. शुक्रवार 25 सप्टेंबर 2020 पर्यंत मतदार यादीचे अंतिम प्रकाशन करणे. याप्रमाणे सर्व जनतेने अयोगाच्या या कार्यक्रमाची नोंद घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

वृत्त क्र. 795

154 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

148 बाधितांची भर तर नऊ जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- बुधवार 27 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 154 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 148 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 46 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 102 बाधित आले. 

आजच्या एकुण 480 अहवालापैकी  313 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 5 हजार 640 एवढी झाली असून यातील 3 हजार 894 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 503 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 214 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  

मंगळवार 25 ऑगस्ट 2020 रोजी गुरुद्वारा परिसर नांदेड येथील 55 वर्षाचा एक पुरुष यांचा खाजगी रुग्णालय, नांदेड येथे तर बुधवार 26 ऑगस्ट, 2020 रोजी देगलूर तालुक्यातील करडखेड येथील 58 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे, नगीनाघाट नांदेड येथील 67 वर्षाचा एक पुरुष व सिडको नांदेड येथील 75 वर्षाचा एक पुरुष यांचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे तर लोहा येथील 70 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे, गुरुवार 27 ऑगस्ट 2020 रोजी धर्माबाद तालुक्यातील धानोरा येथील 65 वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील 76 वर्षाचा एक पुरुष यांचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे वसंत नगर नांदेड येथील 40 वर्षाची एक महिला , रवीनगर नांदेड येथील 65 वर्षाची एक महिला यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथील 4, नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 14, हदगाव कोविड केअर सेंटर 8, अर्धापूर कोविड केअर सेंटर 1, लोहा कोविड केअर सेंटर 23, धर्माबाद कोविड केअर सेंटर 27, पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड 55, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर 2, खाजगी रुग्णालय 3, बिलोली कोविड केअर सेंटर 7,मुदखेड कोविड केअर सेंटर 3, नायगाव कोविड केअर सेंटर 7 असे एकूण 154 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.    

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 25, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 3, किनवट तालुक्यात 4, नायगाव तालुक्यात 1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 4, धर्माबाद तालुक्यात 2, लातूर 1, हिंगोली 1 असे एकुण 46 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपाक्षेत्र 46, मुदखेड तालुक्यात 4, देगलूर तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 6, कंधार तालुक्यात 12, उमरी तालुक्यात 3, अकोला 1 , नांदेड ग्रामीण 2, बिलोली तालुक्यात 3, हदगाव तालुक्यात 2, किनवट तालुक्यात 7, मुखेड तालुक्यात 7, धर्माबाद तालुक्यात 8 असे एकुण 102 बाधित आढळले.  

जिल्ह्यात 1 हजार 503 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 176, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 483, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 58, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 27, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 41, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 132,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 47, लोहा कोविड केअर सेंटर येथे 54, हदगाव कोविड केअर सेंटर 47, भोकर कोविड केअर सेंटर 18,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 29,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 54, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 21, मुदखेड कोविड केअर सेटर 22,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 9, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 21, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 43,उमरी कोविड केअर सेंटर 33, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 170 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 10, निजामाबाद 1, मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 51 हजार 467,

घेतलेले स्वॅब- 42 हजार 570,

निगेटिव्ह स्वॅब- 34 हजार 721,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 148,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 5 हजार 640,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,

एकूण मृत्यू संख्या- 206,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 3 हजार 894,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 503,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 341, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 214. 

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 


 


वृक्ष लागवडीतुन प्रादेशिक परिवहन कार्यालय

परिसराचा कायापालट करु  

-         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत

 

नांदेड (जिमाका) दि. 27:- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या  रिकाम्या परिसरात असलेल्या जागेवर जी वृक्ष लागवड केली आहे त्याची काळजीपुर्वक निगा राखून सर्वांच्या प्रयत्नातून या परिसराचा कायापालट केला जाईल, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. राज्य शासनाच्या ''अटल आनंदवन घनवन योजना 2020'' अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात सहाशे वृक्षांची मियावाकी (सघन वन) पध्दतीने दोन प्लॉटवर लागवड नुकतीच करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

 

नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावर्षी एकत्र येऊन श्रमदानातून प्रादेशिक परिवहन कार्यालयात वृक्षांची जोपासना केली आहे. वृक्ष लागवडीसाठी सुमारे 25 ते 30 प्रजातींची 600 रोपे मियावाकी पध्दतीने लावण्यात आले. रोपांच्या लागवडीसाठी परिसराची साफसफाई, वृक्ष लागवड व जोपासना या संपूर्ण प्रक्रियेत या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. दैनंदिन कार्यालयीन कर्तव्य सांभाळून श्रमदानाद्वारे त्यांनी यावर्षीचा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी केला आहे.

 

इच्छाशक्ती असेल तर प्रयत्नातून कार्यालयाचा परिसर हिरवागार करता येऊ शकतो हे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कृतीतून दाखवले आहे. कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी नियमित आपल्या कामाचा काही वेळ लागवड केलेल्या वृक्षांची निगा राखण्यासाठी देतात. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहन दिले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहूल जाधव, रोहीत काटकर व अनंत भोसले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

0000

 

नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी रास्त

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 27:-  कोविड-19 मुळे जगभरात आव्हान निर्माण झाले असून यात सर्व क्षेत्र ढवळून निघाले आहे. भारतात शैक्षणिक परिक्षांचा कालावधी आणि दोन महिन्यानंतर नवे शैक्षणिक वर्षे सुरु होण्याचा कालावधीत हा कोविड-19 च्या चक्रात अडकल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गैरसोय झाली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने शासनही यात अत्यंत सावधन भुमिका घेत असून नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकल्याव्यात अशी होणारी मागणी रास्त असल्याची भुमिका पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. पालक म्हणून जे काळजीचे वातावरण आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...