Thursday, September 10, 2020

 वृत्त क्र. 861    

जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

 नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

नांदेड (जिमाका) दि. 10 :-  मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह दिनांक 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या काळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केली आहे. हवामानाचा हा अंदाज लक्षात घेता नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्व कल्पना असल्यास बाहेर जाणे नागरिकांनी टाळावे. मोकळ्या जागेत जर कोणी असेल आणि आसपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा असरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसणे हे सुरक्षित ठरेल. विजा चमकत असतील तर घरातील विद्युत उपकरणे त्वरीत बंद कराव्यात. ताराचे कुंपन, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुपासून दूर राहणे अधिक हितकारक राहिल. 

आकाशात विजांचा गडगडाट अथवा चमकत असल्यास मोबाईल फोनचा वापर टाळा. लॅडलाईन फोनचाही वापर करणे टाळले पाहिजे. शावर खाली अंघोळ न करता कसल्याही विद्युत उपकरणाचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबुमध्ये अथवा शेडमध्ये आसरा घेणे टाळावे. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे न राहू नये. आपण जर घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून विज पडतांना पाहू नये.

नागरिकांनी धोक्याची शक्यता लक्षात घेऊन अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे यांनी केले आहे.

00000

                                                  अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेतील

पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण

नांदेड (जिमाका) दि. 10 :- कोविड-19 प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजना व  सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेंतर्गत जिल्ह्यातील अंत्‍योदय अन्‍न योजना आणि प्राधान्‍य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्‍यांना सप्‍टेंबर 2020 या महिन्यासाठी अन्‍नधान्‍याचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्‍य प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी  नांदेड यांनी केले आहे. 

अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार व केंद्र शासनाच्‍या खरेदी धोरणानुसार विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत राज्‍यातील आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्‍यात आलेल्‍या भरड धान्‍याचे राज्‍यातच वाटप करावयाचा आहे. त्‍याअनुषंगाने ज्‍या जिल्‍हयातील ज्‍वारी आणि मका खरेदी करुन त्‍याच जिल्‍हयामध्‍ये गव्‍हाचे नियमन कमी करुन ज्वारी व मका हा अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटुंबातील लाभार्थ्‍यांना वाटप करावे तसेच सदर भरड धान्‍य खराब होणार नाही यादृष्‍टीने सप्‍टेंबर 2020 पर्यंत भरडधान्‍याचे वाटप पुर्ण करावे अशा शासनाच्‍या सुचना आहेत.


नांदेड जिल्‍हयातील भरड धान्‍य असलेले गोदाम हे किनवट तालुक्‍यात असुन शासनाच्या सुचनेनुसार किनवट पासुन वाहतुकीचे अंतर कमी असलेल्‍या किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, नांदेड, उमरी, धर्माबाद या तालुक्‍यातील  अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटुंबातील लाभार्थ्‍यांना वाटप करण्‍यासाठी सप्‍टेंबर 2020 करीता गव्‍हाचे नियतन कमी करुन ज्वारी व मका भरड धान्‍य मंजुर करण्‍यात आले आहे. भरड धान्य ज्‍वारी व मका हा प्रति किलो रुपये एक प्रमाणे वितरीत करण्‍यात येणार आहे. नांदेड तालुक्‍यातील अंत्‍योदय अन्‍न येाजना योजनेतील लाभार्थ्‍यांना सप्टेंबर 2020 साठी प्रतिमाह प्रति कार्ड ज्‍वारी 11 किलो, मका 7 किलो, गहू 5 किलो असे एकुण 23 किलो, तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे. तसेच किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, उमरी, धर्माबाद हया तालुक्‍यातील अंत्‍योदय अन्‍न योजनेतील लाभार्थ्‍यांसाठी प्रति कार्ड ज्‍वारी 11 किलो, मका 12 किलो असे एकुण 23 किलो प्रतिकार्ड असून तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे. कंधार, लोहा, देगलूर, बिलोली, नायगाव, मुखेड या तालुक्‍यातील अंत्‍योदय अन्‍न योजनेतील लाभार्थ्‍यांसाठी प्रतिकार्ड गहू 23 किलो, तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे. तसेच अंत्‍योदय योजनेतील नांदेड जिल्‍हयातील सर्व लाभार्थ्‍यांना प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजनेंतर्गत मोफत प्रतिमाह प्रति सदस्‍य 3 किलो गहू, 2 किलो तांदुळ व जुलै ते सप्‍टेंबर 2020 हया कालावधीतील मोफत चनाडाळ प्रती कार्ड  3 किलो सप्‍टेंबर 2020 मध्‍ये वितरीत करण्‍यात येणार आहे. 

प्राधान्‍य कुटुंब येाजनेतील लाभार्थ्‍यांना सप्‍टेंबर 2020 मध्‍ये नांदेड, किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, उमरी, धर्माबाद हया तालुक्‍यातील लाभार्थ्‍यांसाठी प्रति सदस्‍य मका 3 किलो, तांदुळ 2 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे. कंधार, लोहा, देगलुर, बिलोली, नायगाव, मुखेड हया तालुक्‍यातील प्रति सदस्‍य गहू 3 किलो, तांदुळ 2 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे.  या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजनेंतर्गत मोफत प्रतिमाह प्रति सदस्‍य 3 किलो गहू, 2 किलो तांदुळ व जुलै ते सप्‍टेंबर 2020 या कालावधीतील मोफत चनाडाळ प्रतीकार्ड  3 किलो ही सप्‍टेंबर 2020 मध्‍ये वितरीत करण्‍यात येणार आहे. हे धान्‍य वाटप PoS मशीनमार्फत होणार आहे. साधारणतः प्रत्‍येक महिन्‍याच्‍या पहिल्‍या पंधरवडयामध्‍ये विहीत दराने (ज्‍वारी व मका 1 रु किलो, गहू 2 रु.किलो, तांदुळ 3 रु.किलो) वाटप झाल्‍यानंतर दुसऱ्या पंधरवडयामध्‍ये  फत धान्‍याचे वितरण होणार आहे. याबाबत सर्व संबंधित तहसिलदार व जिल्‍हयातील सर्व स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांना जिल्‍हयातील पात्र लाभार्थ्‍यांना धान्‍य वाटप करण्‍याबाबत सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍तधान्‍य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्‍य प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 वृत्त क्र. 859   

आरोग्य विज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कार्यकारी समितीवर

अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांची सदस्य म्हणून निवड 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आंतराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राअंतर्गत कार्यकरी समितीवर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर भास्करराव देशमुख यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकच्यावतीने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. विद्यापीठामार्फत विविध राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय विद्यापिठे संस्था, परिसंस्था, संघटना यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. आंतराष्ट्रीय स्तरावरील सहयोगी शैक्षणिक उपक्रमाचे संचालन सुयोग्य पद्धतीने होण्याकरीता ही समिती कार्य करेल. या समितीत अधिष्ठाता डॉ सुधिर देशमुख यांचा सदस्य म्हणून 3 वर्षाचा अथवा संबंधित नामांकन झालेली व्यक्ती ज्या प्राधिकरणाचे सदस्य, पदावर कार्यरत असतील तोपर्यत अथवा जे अगोदर घडेल त्या कालावधी पर्यत राहील.  

00000



 वृत्त क्र. 857   

 "नीट" परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 10 :- "नीट" परीक्षा 2020 ही रविवार 13 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 2 ते 5 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण 62 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. 

या परीक्षा केंद्राच्या परिसरात 13 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते सांयकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील दोनशे मीटर पर्यंतची सर्व झेरॉक्स मशीन चालू ठेवण्यास व भ्रमणध्वनी व पेजर चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 

121 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

327 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 10 :- गुरुवार 10 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 121 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 327 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 88 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 239 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 334 अहवालापैकी  949 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 10  हजार 313 एवढी झाली असून यातील  6  हजार 484 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 485 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 53 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  

या अहवालात बुधवार 9 सप्टेंबर रोजी दत्तनगर नांदेड येथील 64 वर्षाचा एक पुरुष नगीना घाट नांदेड येथील 60 वर्षाची महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर कंधार तालुक्यातील शेकापुर  येथील 65 वर्षाचा एक पुरुषाचा मुखेड कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 283 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 4, मुखेड कोविड केंअर सेंटर 8, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयातून 1, कंधार कोविड केंअर सेंटर 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर 4, नायगाव कोविड केंअर सेंटर 5, बिलोली कोविड केअर सेंटर 12, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड  16, मुदखेड कोविड केअर सेंटर 6, पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड 39,किनवट कोविड केंअर सेंटर 2, हदगाव कोविड केंअर सेंटर 11, अर्धापुर कोविड केंअर सेंटर 3, लोहा कोविड केंअर सेंटर 4, असे 121 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 65.04 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 19, भोकर 1, माहूर 1, हिमायतनगर 1, किनवट 4, लोहा 5, परभणी 3, उस्मानाबाद 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव 11,मुखेड 29, धर्माबाद 2, कंधार 6, बिलोली 1, हिंगोली 2,  असे एकुण 88 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 70, बिलोली तालुक्यात 7, अर्धापूर 1, किनवट 34, नायगाव 16, मुखेड 24, धर्माबाद 11, भोकर 3, परभणी 2, नांदेड ग्रामीण 3, मुदखेड 21, लोहा 21, कंधार 6, हदगाव 3, माहूर 3, उमरी 11, हिमायतनगर 1, हिंगोली 2,  असे एकुण 239 बाधित आढळले. 

 

जिल्ह्यात 3 हजार 485 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 290, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 498 , जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 102, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 140, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 104, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 157,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 68, लोहा कोविड केअर सेंटर येथे 107, हदगाव कोविड केअर सेंटर 81, भोकर कोविड केअर सेंटर 33,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 51,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 177, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 38, मुदखेड कोविड केअर सेटर 59,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 29, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 51, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 53, उमरी कोविड केअर सेंटर 60, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 14,  बारड कोविड केअर सेंटर 9, खाजगी रुग्णालयात 349 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 7, निजामाबाद येथे 2 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 4 बाधित, लातूर येथे 1 बाधित  संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 62 हजार 749,

निगेटिव्ह स्वॅब- 50 हजार 208,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 327,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 10 हजार 313,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-16,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 20,

एकूण मृत्यू संख्या- 283,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 6 हजार 484,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 485,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 412, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 53. 

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...