Sunday, January 23, 2022

 पत्रकार परिष निमंत्रण 

ई-मेल संदेश दि. 23 जानेवारी 2022

 

प्रति ,

मा. संपादक / प्रतिनिधी

दैनिक वृत्‍तपत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया    

नांदेड जिल्‍हा

 

 विषय :- रोजगार मेळाव्याचे आयोजनाबाबत पत्रकार परिषद

 

महोदय,  

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोजगार मेळावा आयोजनाबाबत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन सोमवार दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता करण्यात आले आहे. ही पत्रकार परिषद जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.

कृपया आपण अथवा आपले प्रतिनिधी यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड सोमवार दि. 24 जानेवारी 2022 रोजी  दुपारी 12.30 वाजता उपस्थित रहावे, ही विनंती.

 

वार व दिनांक     -  सोमवार दि. 24 जानेवारी, 2022

स्थळ                 -  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड

वेळ                  -  दुपारी 12.30 वाजता   

 

  आपला विश्वासू

         स्वा/-

  ( विनोद रापतवार )

जिल्‍हा माहिती अधिकारी,

         नांदेड  

000000

 नांदेड जिल्ह्यात 786 व्यक्ती कोरोना बाधित

तर 507 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 12 अहवालापैकी 786 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 648 तर अँटिजेन तपासणीद्वारे 138 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 98 हजार 495 एवढी झाली असून यातील 91 हजार 508 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 329 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 658 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 392, नांदेड ग्रामीण 49, भोकर 7, देगलूर 2, धर्माबाद 2, कंधार 5, हदगाव 10, किनवट 36, लोहा 3, मुदखेड 20, मुखेड 13, उमरी 16, माहूर 35, परभणी 26, हिंगोली 8, लातूर 1, अकोला 1, नागपूर 2, हैद्राबाद 4, तेलंगणा 1, पुणे 1, वाशीम 1, राजस्थान 2, बुलढाणा 3, यवतमाळ 2, उमरखेड 1, औरंगाबाद 3, निजामाबाद 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 20, बिलोली 19, किनवट 2, मुखेड 21, नांदेड ग्रामीण 5, देगलूर 20, लोहा 3, नायगाव 6, अर्धापूर 8, धर्माबाद 17, माहूर 2, उमरी 5, भोकर 2, हदगाव 5, मुदखेड 3 असे एकुण 786 कोरोना बाधित आढळले आहे.

 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 432, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 67, खाजगी रुग्णालय 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2 असे एकुण 507 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 921, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 3 हजार 338, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 33, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 4 हजार 329  व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 32 हजार 58

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 18 हजार 655

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 98 हजार 495

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 91 हजार 508

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 658

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.90 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-18

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-89

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4 हजार 329

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 भोकरसह इतर पाणी टंचाई असलेल्या

गावासाठी मंजूर कामे त्वरीत करा

-          पालकमंत्री अशोक चव्हाण   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता नागरिकांचे अधिक हाल होवू नयेत, गरजेच्या वेळी नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे यादृष्टीने भोकरसह इतर टंचाईग्रस्त गावातील कामांना मंजुरी दिली आहे. मंजूर असलेल्या पाणीटंचाई निवारणाची कामे त्वरीत पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित विभागाना दिले. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आज संपन्न झालेल्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत ते बोलत होते. 

या बैठकीस आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी एन. कार्तीकेयन, उपविभागीय अधिकारी राजेंद्र ख्रंदारे, भोकर पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, तहसिलदार श्री. लांडगे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

नागरिकांना जेंव्हा पाण्याची टंचाई भासते तेव्हा त्यांना पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने संबंधित यंत्रणानी पाणी पुरवठ्याची कामे वेळेत पुर्ण करावीत. भोकर तालुक्यातील सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्यात येणार असून त्यासाठी 10 गावातील जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रीया सुरू झाली आहे. या कामात सर्व यंत्रणानी वेळेत समन्वयाने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. पाणी टंचाईची कामे करतांना यंत्रणानी झालेल्या कामांचा प्रगती अहवाल शासनास सादर करावा. कामे कागदावर न दाखवता प्रत्यक्ष होणे महत्चाचे आहे अशा सूचनाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. जिल्ह्यातील टंचाई निवारण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी भोकर, अर्धापूर परिसरात असलेल्या तळयातील गाळ काढून नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होईल व शहराच्या सुंदरतेत भर पडेल, असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी अर्धापूर, भोकर व मुदखेड तालुक्या अंतर्गत जल जीवन मिशन सद्यस्थिती, भोकर येथे सुरु  असलेल्या विविध शासकीय इमारत बांधकामाचाही आढावा, विंधन विहीर उपाययोजना, विहीर बोर अधिग्रहण मंजूर प्रकरणाची माहिती, ग्रामपंचायत निहाय उपलब्ध पाणी पुरवठा व उपाय योजना, पाणी टंचाई कृती आराखडा आदी बाबींचा आढावा यावेळी घेतला.

0000



  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...