Thursday, August 20, 2020

103 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

115 बाधितांची भर तर एकाचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- गुरुवारी 20 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 103 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 115 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 41 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 74 बाधित आले.

 आजच्या एकुण 738 अहवालापैकी  575 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 4 हजार 670 एवढी झाली असून यातील 2 हजार 803 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 672 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 170 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. बुधवार 19 ऑगस्ट रोजी किल्ला रोड नांदेड येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्य झाला.  

आज बरे झालेल्या 103 कोरोना बाधितांमध्ये आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड सेंटर येथील 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 18, बिलोली कोविड सेंटर 11, मुदखेड कोविड सेंटर 11, किनवट कोविड सेंटर 5, भोकर कोविड सेंटर 3, मुखेड कोविड सेंटर 34, पंजाब भवन कोविड सेंटर 4, उमरी कोविड सेंटर 3, धर्माबाद कोविड सेंटर 12 असे एकूण 103 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 11, हदगाव तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 2, मुखेड तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 2, मुंबई येथे 1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली तालुक्यात 11, किनवट तालुक्यात 3, लोहा तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 1, हिंगोली 2, यवतमाळ 1 असे एकुण 41 बाधित आढळले. 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 25, बिलोली तालुक्यात 4, देगलूर तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 4, मुदखेड तालुक्यात 3, धर्माबाद तालुक्यात 23, यवतमाळ 1, नांदेड तालुक्यात 2, भोकर तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 5, हिंगोली 2 असे एकुण 74 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 672 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 202, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 798, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 41, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 32, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 38, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 99,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 46, लोहा कोविड केअर सेंटर येथे 53, हदगाव कोविड केअर सेंटर 24, भोकर कोविड केअर सेंटर 21,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 16, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 99, किनवट कोविड केअर सेंटर येथे 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 6, मुदखेड कोविड केअर सेटर 23,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 6, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 16, बारड कोविड केअर सेंटर 1, उमरी कोविड केअर सेंटर 20, खाजगी रुग्णालयात 114 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 4, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 727,

घेतलेले स्वॅब- 32 हजार 672,

निगेटिव्ह स्वॅब- 25 हजार 895,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 115,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 670,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 5,

एकूण मृत्यू संख्या- 160,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 803,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 672,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 493, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 170. 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश 22 ऑगस्ट पासून लागू

 वृत्त क्र. 777

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश 22 ऑगस्ट पासून लागू

नांदेड (जिमाका) दि. 20 :- नांदेड जिल्ह्यात 22 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 4 सप्टेंबर मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 22 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार 4 सप्टेंबर 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्र. 775

जिल्ह्यातील विविध मार्गांवर

राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरु

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- मिशन बिगेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा-सुविधा जनतेला उपलब्ध करुन देण्याच्या धोरणाअंतर्गत आता राज्य परिवहन महामंडळाच्या विविध बससेवा सुरु करण्यात आल्या आहेत. नांदेड विभागातील भोकर, किनवट, मुखेड, देगलूर, कंधार, हदगाव, बिलोली, माहूर आणि नांदेड आगारामार्फत विविध मार्गांवर 20 ऑगस्ट पासून बस सेवा सुरु करण्यात आल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळ नांदेडचे विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.

 

नांदेड आगारातून सातारा, पुणे, सोलापूर, नागपूर, लातूर, हिंगोली, शिराढोण, टेंभुर्णी, कलंबर, सावरगाव, इज्जतगाव आदी मार्गांवर बससेवा सुरु करण्यात आली आहे. भोकर आगारातून अहमदनगर, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, लातूर, नरसी, नांदेड या मार्गांवर बसेस सुरु झाल्या आहेत. किनवट आगारातून औरंगाबाद, नागपूर, अमरावती, यवतमाळ, लातूर, नांदेड, माहूर या मार्गांवर बसेस धावतील. मुखेड आगारातून पुणे, सिंगनापूर, अमरावती, सोलापूर, लातूर, नांदेड, शिरुर, उदगीर, देगलूर, कंधार, मुक्रमाबाद, हंगीरगा या मार्गावर बससेवा सुरु करण्यात आली आहे.

 

देगलूर आगारातून पंढरपूर, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, उदगीर, सांगवी, शेवाळा, भोकसखेडा, मुक्रमाबाद, हनेगाव या मार्गावर बससेवा सुरु करण्यात आली आहे. कंधार आगारातून नागपूर, रिसोड, लातूर, नांदेड, गंगाखेड, जळकोट, नरसी, शिराढोण, लोहा, पुर्णा, आष्टूर, चोंढी या मार्गावर बस सेवा सुरु करण्यात आली आहे. हदगाव आगारातून अकलूज, अक्कलकोट, सोलापूर, औरंगाबाद, अकोला, उदगीर, बाळापूर, नांदेड, पुसद, माहूर, भोकर, हिमायतनगर या मार्गावर बसे सेवा सुरु करण्यात आली आहे. बिलोली आगारातून औरंगाबाद, अमरावती, अकोला, रिसोड, नांदेड, देगलूर, कंधार, धर्माबाद, नरसी, देगलूर येथे सुरु करण्यात आली आहे. माहूर आगारातून बार्शी, लातूर, मुखेड, अमरावती, नागपूर, परळी, यवतमाळ, नांदेड, किनवट, शिखर या मार्गावर बससेवा सुरु केलेली आहे.  

 

प्रवास करतांना वैयक्तिक सुरक्षितता व शासनाचे कोविड-19 संदर्भातील नियम याचे काटेकोर पालन केले पाहिजे, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले.

00000



 

वृत्त क्र. 776

रेतीसाठ्याचा नांदेड तहसिल कार्यालयात 

25 ऑगस्ट रोजी लिलाव

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत गोळा केलेल्या रेतीसाठा महसूल विभागाने जप्त केला आहे. त्याची ईटीएस मोजणी करण्यात आली आहे. या रेतीसाठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली 25 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे केला जाणार आहे.

 

सदर अवैध रेतीसाठा हा 425 ब्रास असून तो मौजे ब्राम्हणवाडा येथे उपलब्ध आहे. सदर रेतीसाठा गट नंबर निहाय असून तो पाहून तपासून घेऊन लिलावात भाग घ्यावा व अटी आणि शर्तीबाबतची माहिती गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहून घ्यावी, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...