Wednesday, June 18, 2025

 वृत्त   

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी 1 ते 8 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा 

नांदेड, दि. 18 : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात 284 पदे भरती करीता दिनांक 22 एप्रिल 2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या अनुषंगाने अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. 

नोंदणी व मुद्रांक विभागातील ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यासाठी तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यासाठी आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले असून आयबीपीएस कडून दिनांक 22 एप्रिल ते 16 मे 2025 दरम्यान ऑनलाईनपद्धतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले आहेत. आयबीपीएसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची परीक्षा दिनांक 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र/ हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आयबीपीएस कडून पाठविण्यात येणार आहेत. 

या परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्था, मध्यस्थ अथवा इतरांकडून तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी सावध राहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात आले आहे.

०००

 वृत्त क्रमांक  634 

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया प्रमाणात साजरा करा : जिल्हाधिकारी कर्डिले 

11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी योग संगम या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 18 जून : दरवर्षी 21 जून रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' उत्साहाने साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ही 'एक पृथ्वी एक आरोग्य' साठी योग (Yoga for One Earth One Health) ही असून केंद्र शासनाने योगदिनाचा कार्यक्रम सर्व स्तरांवर मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. योगशास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. योगाने उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड वृद्धी, मनोविकार, सांध्यांचे विकार तसेच दैनंदिन जीवनशैलीमुळे निर्माण झालेले आजार कमी होऊ शकतात. दैनंदिन जीवनात योग आत्मसात केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते तसेच सकारात्मक ऊर्जा कायम राहते. 

यास अनुसरून जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये सर्व जिल्हा परिषद शाळा, सर्व खाजगी व अनुदानित शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा. यासाठी शासकीय-अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, इतर विभागातील अधिकारी-कर्मचारी व सामान्य नागरिक यांचा सक्रिय सहभाग घ्यावा व योगविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी सोबत दिलेल्या उपक्रमांचा अंतर्भाव करून त्यासंबंधीचा प्रचार करण्यासाठी विविध ऑनलाइन संसाधनांचा वापर करावा. यातील योग संगम या 21 जून 2025 रोजीच्या योगसत्र कार्यक्रमाची नोंद (रजिस्ट्रेशन) केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अधिकृत पोर्टल https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam वर तात्काळ रजिस्ट्रेशन करुन सदरचा स्क्रिनशॉट संबंधित व्हॉटसअॅप ग्रुपवर टाकण्यात यावेत. दिनांक 21 जून रोजी सकाळी 7 ते 7.45 वाजे दरम्यान कॉमन योग प्रोटोकॉल (CYP) नुसार योग प्रात्यक्षिके करावीत व पुढील 15 मिनिटे इतर योगाभ्यास करावा. 

CYP लिंक

https://www.youtube.com/watch?v=X8zQmuWEpSU&list=PLxZ05kgQiFwf6JbbEvThly9AcZ0xrfxvk&index=3 कार्यक्रमात योग संबंधित माहिती साहित्य, बॅनर्स, कटआउटस इत्यादीचा योग्य वापर करावा. कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करून त्यास समाज माध्यमे व वृत्तपत्रांतून प्रसिद्धी देण्यात यावी. तसेच फोटो, बातम्यांचे संकलन व संख्या अहवाल दिलेल्या प्रपत्राप्रमाणे भरून https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam या पोर्टलवर पाठवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित कार्यालयांना दिले आहेत.

000000

 रस्ता सुरक्षा मोहीम

 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

वृत्त क्रमांक 633 

इतर मागासवर्गीय व्यक्तींसाठी विविध कर्ज योजना  

नांदेड दि. 18 जून : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या उपकंपनी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या तिन्ही महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वागीण कल्याणाकरीता बेरोजगारांसाठी स्वयंग उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. इतर मागासवर्गीय प्रवार्गातील गरजु व कुशल व्यावसायीक व्यक्तींना कृर्षी सलग्न व पारंपारीक उपक्रम, लघु उद्योग व मध्यग उद्योग उत्पादन, व्यापर विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसासाठी या महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

रुपये 1 लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना

या योजनेत अर्जदाराचा सिबील क्रीडिट स्कोअर किमान 500 पेक्षा जास्त असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू 1 लक्ष पेक्षा कमी असावे. परतफेडीचा कालावधी 48 समान मासिक हप्त्यांमध्ये राहिल. नियमीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेत व्याज अदा करावे लागणार नाही परंतू थकित झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. ४ टक्के व्याजदर आकारण्यात येईल. 

20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना  

या योजनेमध्ये 75 टक्के रक्कम ही बँकेची असून त्यावरील व्याज हे बँकेच्या नियमाप्रमाणे राहील. 20 टक्के रक्कम ही महामंडळची असून त्यावर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज आकारण्यात येते व 5 टक्के सहभाग हा लाभार्थ्यांचा आहे. या योजनेची कर्ज मर्यादा रुपये 5 लाखापर्यंत असून परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा समान 60 हप्त्याचा आहे. 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 15 लाखा पर्यतची आहे. सदर योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. या योजनेत कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न मर्यादा 8 लक्ष पर्यंत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल तसेच लाभार्थ्यांने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरू असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे. 

गट कर्ज व्याज परतावा योजना

सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 10 ते 50 लक्ष रुपये पर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. गटातील लाभार्थीचे वय 18 ते 45 वर्षे असावे. तसेच गटातील लाभार्थ्यांनी यापूर्वी महामंडळाचा किंव्हा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. इतर मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षीक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचतगट, भागीदार संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), एलएलपी, एफपीओ अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणी करीता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बैंक प्रमाणीकरनानुसार महामंडळाकडून अदा केले जाईल. 

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा देशातर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा 10 लक्ष ते 20 लक्ष रुपये पर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्ष असावे. अर्जदाराची कोटोबीक वार्षीक उत्पन्न मर्यादा 8 लक्ष रुपये असावी. विद्यार्थी 12 वीत 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरनानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. 

महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना  

सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधनकेंद्र (CMRC) मार्फत राबविल्या जात आहे. इतर मागास प्रवार्गातील किमान 50 टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास प्रथम टप्यात रुपये 5 लक्ष पर्यंत कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येईल. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. 

सदर कर्ज योजना ही बँकेमार्फत असून लाभार्थ्यांनी महामंडळाच्या वेबसाईडवर ऑनलाईन अर्ज www.msobcfdc.org या संकेत स्थळावर भरावा. सदर योजनेचा लाभा हा इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तीने जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे. अधिक माहिती संपर्कसाठी पत्ता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर नांदेड 431605, दूरध्वनी क्रमांक 02462-220865 हा आहे.

00000

 

 वृत्त क्र. 631 

दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात

शिक्षण मंडळाची हेल्पलाईन   

नांदेड दि. 18 जून :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने जून-जुलै 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लेखी परीक्षेच्या 8 दिवस अगोदरपासुन विभागीय मंडळस्तरावर सकाळी 8 ते सायं. 8 वाजेपर्यंत इयत्ता 10 वी साठी 02382-251633 व इ. 12 वी साठी 02382-251733 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. 

इ. 12 वी लेखी परीक्षा व ऑनलाईन परीक्षा 24 जून ते  16 जुलै 2025  इ. 10 वी लेखी परीक्षा 24 जून ते 8 जुलै 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. श्रीमती भंडारी ए.आर. (सहसचिव) मो.नं. 9422886101, चवरे ए. पी. (प्र. सहा.सचिव) मो.नं. 9421765683. उच्च माध्यमिकसाठी कारसेकर जे.एस. (व.अ.) च मो.नं. 9822823780, डाळींबे एम. यु. (प.लि.) मो.नं. 9423777789 3. जानकर एच. एस. (व.लि.) मो.नं. 9764409318. माध्यमिकसाठी जेवळीकर सी. व्ही. (व.अ.) मो.नं. 9420436482, घटे एस. एच. (प.लि.) मो.नं. 9405486455, सुर्यवंशी ए. एल. (क.लि.) मो.नं.7620166354 हे नंबर देण्यात आले आहेत. विद्यार्थी, पालक, शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी वरील दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत संपर्क साधावा. 

माध्यमिक व उच्च माध्यमिक प्र. परीक्षा फेब्रु- मार्च 2025 या भयमुक्त व तणावमुक्त होवून परीक्षेस सामोरे जाणे आवश्यक आहे. या संदर्भात विद्यार्थी, पालक यांच्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून आवश्यकतेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक कच्छवे बी. एम. भ्रमणध्वनी क्र. 9371261500, कारखेडे बी. एम. 9860912898, सोळंके पी. जी. 9860286857, पाटील बी. एच. 9767722071 यांच्याशी संपर्क करता येईल, असे आवाहन लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव अनुपमा भंडारी यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 630 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी शिष्यवृत्ती योजना 

नांदेड दि. 18 जून :- सन  2025-26 वर्षासाठी केंद्रीय  शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या 'राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती' योजनेसाठी (एनएमएमएस) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (एनएसपी) www.scholarships.gov.in वर नवीन आणि नूतनीकरण अर्जांच्या ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्यास 2 जून 2025 पासून सुरुवात झाली आहे. नवीन आणि नूतनीकरण नोंदणीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2025 आहे. या योजनांसाठी पात्र लाभार्थानी विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज भरणे बाबत आपल्या अधिनिस्त शाळांना अवगत करून पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे  यांनी केले आहे. 

जिल्ह्यामध्ये  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद  पुणे मार्फत एनएमएमएस परीक्षेत शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये निवड  झालेल्या जिल्ह्यातील  सर्व  विद्यार्थ्यांनी 2025-26 शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन अर्जदार म्हणून आणि 9 वी, 10 वी, 11 वी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्तीधारकांनी नुतनीकरण अर्ज भरावे. शिष्यवृत्ती धारकांनी स्वतःची नोंदणी आधारानुसार करावी लागेल. यापूर्वी शिष्यवृत्ती घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दहावी, अकरावी आणि बारावीसाठी नूतनीकरण अर्जदार म्हणून स्वतःचे नूतनीकरण करावे लागेल. 

एनएमएमएससाठी पात्रतेचे निकष

पालकाचे उत्पन्न 3 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे. शासकीय , स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (टप्पा अनुदानसह) शाळेतील विद्यार्थांना  सदर योजना लागू आहे. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच केंद्र / राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. 

इयत्ता 10 वी नंतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल. इयत्ता 10 वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास 60 टक्केपेक्षा अधिक गुण आवश्यक (अनुसूचित जाती/ जमातीच्या विद्यार्थ्यास 5 टक्के सुट) इयत्ता 9 वी मधून 10 वी मध्ये गेलेले विद्यार्थी व 10 वी मधून 12 वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे ते संयुक्त खाते नसावे. शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे, त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती रक्कम, NMMSS साठी वार्षिक 12 हजार रुपये आहे.

वेळापत्रक

NMMSS व प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुरवात 2 जून 2025 पासून झाली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2025 आहे. शाळास्तर अर्ज पडताळणी अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2025 आहे. तर जिल्हास्तर अर्ज पडताळणी अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 अशी आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

 

वृत्त क्र. 629 

वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या विविध योजना 

लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन   

नांदेड, दि. 18 जून :- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. नांदेड जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन नांदेड दूरध्वनी क्र. 02462-220244 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांनी केले आहे. 

तसेच राज्य शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व रामोशी समाजासाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) या दोन महामंडळाची स्थापना केली आहे. ही महामंडळे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत कार्यरत असुन त्यांना स्वतंत्र उद्दीष्ट देण्यात आले आहे. या तिन्ही महामंडळांअंतर्गत पुढीलप्रमाणे विविध योजना राबलिल्या जात आहेत. 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना या योजनेची मर्यादा 10 लाख रुपयापर्यंत असून अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षादरम्यान असावे. अर्जदाराचे बँक खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. सदर योजना ही ऑनलाईन असुन यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल व इतर कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे. 

गट कर्ज व्याज परतावा योजना

गट कर्ज व्याज परतावा योजना या योजनेची मर्यादा 10 ते 50 लाख रुपयापर्यंत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा. गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावे. गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 वर्ष पर्यत असावे. गटातील लाभार्थ्याचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. उत्पन्नाची मर्यादा नॉनक्रिमीनल करिता 8 लाखाच्या मर्यादीत असावी. सदर योजना ही ऑनलाईन असून याकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल वेबसाईटवर मुळ कागदत्रासह अपलोड करणे आवश्यक आहे. 

थेट कर्ज योजना

एक लाख रुपये थेट कर्ज योजना या योजनेत महामंडळाकडुन 1 लाख रुपये थेट कर्ज दिले जाते. या योजनेसाठी दोन जामीनदार व गहाणखत तसेच बोझा नोंद करुन देणे आवश्यक आहे. या योजनेकरिता जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला ( रु.1 लाखापर्यंत) रेशनकार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, व्यवसायाचा परवाना इत्यादी कागदपत्रांसह संबंधीत व्यवसायानुसार कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेचे अर्ज महामंडळाच्या कार्यालयातुन जातीचा मुळ दाखला व आधार कार्ड दाखवुन रितसर नोंद करुन अर्जदारास मिळतील. 

बीज भांडवल योजना

बीज भांडवल योजना ही योजना बँकेमार्फत राबविली जात आहे. अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला ( रु. 1 लाखापर्यंत) रेशनकार्ड, आधारकार्ड, वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, संबंधीत व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून कार्यालयात दाखल करावी लागतील. यापूर्वी लाभार्थीने कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही. 

या योजनेचे सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे 150,05,01 गट कर्ज व्याज परतावा योजना योजनेचे 01,01,01, बीज भांडवल कर्ज योजना 01,01,01, रुपये 1 लाख थेट कर्ज योजना 200,20,20 असे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे, असेही महामंडळाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

00000

 

  वृत्त क्र. 720   डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हिमालया बेबी फि डिंग सेंटर चा लोकाअर्पण सोहळा       नांदेड दि. 11 ...