वृत्त क्रमांक 634
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया प्रमाणात साजरा करा : जिल्हाधिकारी
कर्डिले
11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी योग संगम या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 18 जून : दरवर्षी 21 जून रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' उत्साहाने साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ही 'एक पृथ्वी एक आरोग्य' साठी योग (Yoga for One Earth One Health) ही असून केंद्र शासनाने योगदिनाचा कार्यक्रम सर्व स्तरांवर मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. योगशास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. योगाने उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड वृद्धी, मनोविकार, सांध्यांचे विकार तसेच दैनंदिन जीवनशैलीमुळे निर्माण झालेले आजार कमी होऊ शकतात. दैनंदिन जीवनात योग आत्मसात केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते तसेच सकारात्मक ऊर्जा कायम राहते.
यास अनुसरून जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये सर्व जिल्हा परिषद शाळा, सर्व खाजगी व अनुदानित शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा. यासाठी शासकीय-अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, इतर विभागातील अधिकारी-कर्मचारी व सामान्य नागरिक यांचा सक्रिय सहभाग घ्यावा व योगविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी सोबत दिलेल्या उपक्रमांचा अंतर्भाव करून त्यासंबंधीचा प्रचार करण्यासाठी विविध ऑनलाइन संसाधनांचा वापर करावा. यातील “योग संगम” या 21 जून 2025 रोजीच्या योगसत्र कार्यक्रमाची नोंद (रजिस्ट्रेशन) केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अधिकृत पोर्टल https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam वर तात्काळ रजिस्ट्रेशन करुन सदरचा स्क्रिनशॉट संबंधित व्हॉटसअॅप ग्रुपवर टाकण्यात यावेत. दिनांक 21 जून रोजी सकाळी 7 ते 7.45 वाजे दरम्यान कॉमन योग प्रोटोकॉल (CYP) नुसार योग प्रात्यक्षिके करावीत व पुढील 15 मिनिटे इतर योगाभ्यास करावा.
CYP लिंक
https://www.youtube.com/watch?v=X8zQmuWEpSU&list=PLxZ05kgQiFwf6JbbEvThly9AcZ0xrfxvk&index=3
कार्यक्रमात योग संबंधित माहिती साहित्य, बॅनर्स, कटआउटस इत्यादीचा योग्य वापर करावा. कार्यक्रम
मोठ्या प्रमाणात साजरा करून त्यास समाज माध्यमे व वृत्तपत्रांतून प्रसिद्धी
देण्यात यावी. तसेच फोटो, बातम्यांचे संकलन व संख्या अहवाल
दिलेल्या प्रपत्राप्रमाणे भरून https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam या पोर्टलवर पाठवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी
संबंधित कार्यालयांना दिले आहेत.
000000
No comments:
Post a Comment