Monday, February 12, 2024

 वृत्त क्र. 126 

जिल्हा माहिती अधिकारी पदाचा प्रवीण टाके यांच्याकडे पदभार

 

नांदेड ( जिमाका ) दि. 12 : नांदेडच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा सोमवारी प्रवीण टाके यांनी पदभार स्वीकारला. प्रवीण टाके हे नागपूर येथून नांदेड येथे या पदावर रुजू झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने काढलेल्या बदली आदेशानंतर यापूर्वीचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे नागपूर येथे रुजू झाले आहेत. त्यांच्या जागेवर प्रवीण टाके यांनी आज पदभार सांभाळला. प्रवीण टाके यांनी यापूर्वी नवी दिल्लीमुंबईचंद्रपूरनागपूर या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी व समकक्ष पदावर काम केले आहे. यापूर्वी लोकमतसामना तरुण भारतनागपूर पत्रिका आदि वृत्तपत्रांमध्ये पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले प्रवीण टाके एक प्रतिभावान कवी,लेखक असून त्यांची फकीर ही कादंबरी प्रकाशित आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर त्यांनी स्तंभलेखन केले आहे.

000000






वृत्त क्र. 125

 

महासंस्कृती महोत्सवासाठी प्रशासनाची जय्यत तयारी 

·         महासंस्कृती महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन 

·         महोत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 12 :- महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन दिनांक 15 ते 19 फेब्रुवारीला नांदेड येथे करण्यात आले आहे. महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रशासन सज्ज झाले असून यानिमित्ताने होणाऱ्या विविध आणखी कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदानस्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठलुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धनतसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती आदी बाबी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध स्तरावरील बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे.

 

या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानात नवा मोंढा येथे करण्यात आले आहे. महोत्सवात लक्षणीय कार्यक्रमांसोबतच प्रदर्शनीय दालने यामध्ये विविध विभागाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांच्या माहितीचेस्थानिक खाद्य पदार्थतृणधान्याचे पदार्थबचत गटामार्फत बनविण्यात आलेल्या पदार्थाचे प्रदर्शन व विक्री याबाबीचे स्टॉल लावण्यात येणार आहे.

 

या महोत्सवात 15 व 16 फेब्रुवारी रोजी पोलीस कवायत मैदान येथे विविध मैदानी खेळाचे आयोजन क्रिडा विभागामार्फत करण्यात आले आहे. दिनांक 18 व 19 रोजी शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धाचे आयोजन आयटीआय नांदेड येथे तर 19 फेब्रुवारी रोजी नंदगिरी किल्ला येथे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत या महोत्सवात लोककलालोकसंगीतलोकनृत्यआदिवासी समुहाचे पारंपारिक नृत्य या सर्व कलाप्रकाराचा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे. नागरिकांनी या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येन सहभाग घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

0000

 वृत्त क्रमांक 124

नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढीसाठी

इच्छूक संस्थानी 22 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत  

- जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर बी गणबीर

नांदेड (जिमाका) दि. 12 :- महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम चालविण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी मंडळाचे अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक पंजीकृत संस्थाकडून /व्यवस्थापनाकडून तसेच यापूर्वी मान्यता दिलेल्या संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतची जाहिरात www.msbsvet.edu.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रवेश सत्र 2024-25 पासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्थाना व अस्तित्वात असलेल्या संस्थामध्ये नवीन अभ्यासक्रम/तुकडीवाढ सुरु करण्यास मान्यता घेण्यासाठी इच्छूक संस्थानी मंडळाचे संकेतस्थळावर ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत. तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नांदेड यांचेकडे प्रस्तावाच्या 4 नस्ती 22 फेब्रुवारी 2024 पर्यत सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर बी गणबीर यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 123

दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु 

नांदेड, (जिमाका) दि. 12 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

 

तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव तथा सहा.सचिव ए.आर.कुंभार 9405077991, तसेच उच्च माध्यमिक साठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं. 8379072565, एम.यु.डाळिंबे (व.लि) मो.नं. 9423777789एस.जी.आरसुलवाड (व.लि) मो.क्र. 7767825495 तर माध्यमिक साठी ए.पी. चवरे (व.अ)  मो.क्र. 9421765683 तर एस.एल.राठोड (क.लि) मो.क्र. 8830298158ए.एल. सुर्यवंशी (क.लि) मो.क्र. 7620166354 हा भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक आहे. तर नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी. एम. कच्छवे यांचा भ्रमणध्वनी 9371261500, बी.एम.कारखेडे मो.क्र.9860912898, पी.जी. सोळंके मो.क्र. 9860286857,  बी. एच. पाटील 9767722071 यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहेत.

00000

 वृत्त क्रमांक 122

जिल्हाधिकारी कार्यालयात 13 फेब्रुवारी रोजी पेन्शन अदालत 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...