Saturday, January 7, 2017

दंगलच्या संवेदनशील पर्वणीने खुलले
मुलींचे चेहरे ;आनंदासह... प्रेरणाही घेऊ...
जिल्हाधिकारी काकाणी यांच्यामुळे दंगल पाहण्याची संधी
नांदेड, दि. 7 :- एखाद्या सुंदर कलाकृतीचा रसास्वाद स्वतः घेण्यात आनंदच असतो. पण हा आनंद द्विगुणीत होतो, तो ही कलाकृती इतरांबरोबरच अनुभवण्यातून. अशाच अनुभवामुळे आज काही मुलींच्या चेहऱ्यावर अनोखे हास्य फुलले.. आणि समोर आलेल्या कलाकृतीतून प्रेरणा घेण्याची जिद्दही व्यक्त झाली. निमित्तं होतं  जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या दंगलचित्रपट पाहण्याच्या अनोख्या संधीचं. शहरातील अनाथालयातील काही मुलींना ही संधी साधता आली. यामुळे शाम टॅाकीजमध्ये दंगलचा सायंकाळचा शोही आगळा ठरला.
ख्यातकिर्त मल्ल महावीरसिंह फोगट यांच्या जीवनावर आधारीत, आणि कुस्तीच्या क्षेत्रात त्यांच्या मुलींनी मिळविलेली जागतिक किर्ती या अनुषंगाने दंगल चित्रपटाची निर्मिती झाली आहे. दंगलची कहाणी आणि मांडणीही मुलींसाठी प्रेरणादायी आहे. अशा या उत्कृष्ट चित्रपटाविषयी चर्चा करताना जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना कल्पना सुचली, उत्कृष्ट चित्रपट आपण नेहमीच पाहतो. पण विशेषतः मुलींसाठी प्रेरणादायी असलेला, मुलींसाठी कोणतेही क्षेत्र वर्ज्य नसल्याचा संदेश हा चित्रपट देतो. मग हा चित्रपट पाहण्याचा आनंद द्विगुणीत करता येईल. तोही असा चित्रपट पाहण्याची संधी अभावानेच उपलब्ध होणाऱ्या मुलींना ही संधी उपलब्ध करून देण्यातून. त्यातूनच जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सहकाऱ्यांना ही कल्पना बोलून दाखविली आणि ती लगेच प्रत्यक्षातही आणली. शहरातील मिनाक्षी महिला मंडळ संचलित सुमन मुलींचे बालगृह आणि राणीलक्ष्मीबाई महिला मंडळ संचलित पितृछाया बालकाश्रमातील मुलींसाठी शाम टॅाकीज येते दंगल चित्रपट पाहण्याची व्यवस्था करण्यात आली. सुमारे बेचाळीसहून अधिक मुलींनी हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला.
दंगलची ही पर्वणी अनुभवण्यासाठी आलेल्या या मुलींचे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. याबाबत जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले, मुलींसाठी हा चित्रपट आनंददायी ठरेल, तर दुसरीकडे तो प्रेरणादायी ठरेल, या विश्र्वासातून ही कल्पना सुचली. चित्रपट आपण नेहमीच पाहतो पण पाहण्याची संधी मिळते. पण अशी संधी नसलेल्या मुलींना ही संधी उपलब्ध करून देण्यातही मोठे समाधान आहे.
यावेळी महिला व बालविकास अधिकारी एस. व्ही. शिंगणे, सहायक करमणूक कर अधिकारी मकरंद दिवाकर, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, शाम टॅाकीजचे शामसेठ बिसेन, गोपालसेठ बिसेन, व्यवस्थापक महावीरसिंह चौहान, बालकाश्रमांचे पदाधिकारी ललिता कुंभार, अनिल दिनकर आदींची उपस्थिती होती.
दंगलची पर्वणी आनंददायी..यातून प्रेरणाही घेऊ - कांचन आणि उमा
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी हा चित्रपट पाहण्याची ही संधी उपलब्ध करून दिली. हा क्षण आमच्यासाठी आनंददायी तरच आहे. पण यातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न करू. मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. हे सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटाविषयी खूप ऐकून होतो. पण तो प्रत्यक्ष अनुभवण्याची  संधी जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून दिली, ही बाबही आमच्यासाठी खूप मोठी आहे, अशा आशयाची प्रतिक्रीयाही दंगल चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या कांचन व उमा या दोघींनी व्यक्त केली.

00000000
शासकीय विभागांना रोपांची माहिती देण्याचे आवाहन
नांदेड, दि. 7 :- लागवड केलेल्या जीवंत रोपांच्या विषयी ज्या विभागाने अर्धवट माहिती दिली आहे अशा विभागांनी सप्टेंबर 2016 च्या परिपूर्ण जीवंत रोपांची टक्केवारी तसेच डिसेंबर 2016 अखेरची माहिती सामाजिक वनीकरण विभागास पाठवावी. त्यानंतर ही माहिती शासनास सादर करणे शक्य होणार आहे, असे आवाहन उपसंचालक तथा सदस्य सचिव सामाजिक वनीकरण विभाग नांदेड यांनी केले आहे.
000000


  स्त्री रुग्णालय श्यामनगर येथे
रविवारी फेफरे-फिटची मोफत तपासणी
नांदेड, दि. 7 :- सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ईपिलेप्सी फौंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 8 जानेवारी 2017 रोजी स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड येथे भव्य ईपिलेप्सी (फेफरे / फिट) या आजाराबाबत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
            मुंबई येथील तज्ज्ञ न्युरोफिजिशियन डॉ. सूर्या यांच्यावतीने शिबिरात ईपिलेप्सी (आकडी) या आजाराबाबत तपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत.  शिबिरात रुग्णांची न्युरोलोजीस्टतर्फे मोफत ईईजी चाचणी, फ़िजिओथेरपी ओकुपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, समुपदेशन व रक्त तपासणी तसेच रुग्णासाठी मोफत औषधी देण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थी व इतर ईपिलेप्सी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी ( बां. स.) डॉ. उत्तम इंगळे यांनी केले आहे.

000000
जिल्हा कारागृहात कायदे विषयक शिबीर संपन्न
नांदेड, दि. 7 :- विधी सेवा प्राधिकरण यांच्या वार्षिक सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय नांदेड यांच्यावतीने जिल्हा कारागृह नांदेड येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  न्या. . आर. कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली प्ली बारगिनिंग, दी न्यायाधीनबंदी यांचे अधिकार जामीना संबंधीच्या तरतदी याविषयावर कायदेविषयक शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
न्या. कुरेशी यांनी कारागृहात शिक्षा भोगत असलेले बंदी न्यायाधीनबंदी यांचे अधिकार याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच बंद्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती दिली. न्या. श्रीमती सरिता विष्वंभरण, अॅड. जयपाल ढवळे, अभियोक्ता संघाचे उपाध्यक्ष अॅड. जगजीवन भेदे यांनी मार्गदर्शन केले. अॅड. फेरोजा हाश्मी यांनी महिला बंद्यांशी संवाद साध त्यांच्या अडचणी जाण घेतल्या. यावेळी अॅड. एडकेबंटी उपस्थित होते. जिल्हा कारागृहाचे अधिक्षक जी. के. राठोड यांनी आभार मानले.
000000


रब्बी हंगाम पिक विम्यासाठी
10 जानेवारी पर्यंत मुदत
नांदेड, दि. 7 :- राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम सन 2016-17 मध्ये राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि.मुंबई यांचेमार्फत राबविण्यात येणार आहे. कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना पिकविमा उतरवण्याची अंतिम तारीख मंगळवार 10 जानेवारी 2017 ही आहे. अधिकच्या माहितीसाठी  शेतकऱ्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा , असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत पिकांसाठी बंधनकारक असू, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमाहप्ता आकारण्यात येणार आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5 टक्के ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पिक पेरणीपासुन काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गीक आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग त्यादीबाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान त्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. नांदेड जिल्हयातील गहु (बा), ज्वारी (जि), हरभरा, करडई, सुर्यफुल व उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी ही योजना लागु आहे.
या योजने अंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे.
पीक
प्रति हेक्टर विमा संरक्षीत रक्कम
शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु)
विमा लागअसलेले तालुके
गहु (बा)
33000
217.80
नांदेड,अर्धापूर,मुदखेड, बिलेाली, धर्माबाद, नायगाव,मुखेड,कंधार,
लोहा, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, किनवट, माहूर
ज्वारी (जि)
24000
158.40
नांदेड, अर्धापूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, मुखे, देगलूर
हरभरा
24000
158.40
नांदेड,अर्धापूर,मुदखेड,बिलोली,धर्माबाद,नायगंाव,हदगांव,हि.नगर,
देगलूर
करडई
22000
145.20
                     
सुर्यफुल
22000
330.00
मुखेड,भोकर
उन्हाळी भुईमुग
36000
237.60
मुखेड,देगलूर,बिलोली,धर्माबाद,नायगांव,कंधार,लोहा,नांदेड,अर्धापूर,
मुदखेड, हदगाव, हिमायतनगर,भोकर,उमरी
000000


यशवंतराव चव्हाण वा:य पुरस्कारसाठी
प्रवेशिका पाठवण्‍याचे आवाहन
नांदेड, दि. 7 - मराठी भाषेतील उत्‍कृष्‍ट वाङमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2016 करीता राज्‍य शासनाच्यावतीने देण्यात येणा-या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारांसाठीच्‍या प्रवेशिका जिल्‍हाधिकारी कार्यालय तसेच महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळाच्‍या कार्यालयात मंगळवार 31 जानेवारी 2017 पर्यंत सादर कराव्‍यात, असे आवाहन राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळाच्‍या सचिव मिनाक्षी पाटील यांनी केले आहे.  
दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत प्रकाशित झालेली  प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत.  या स्‍पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी  रोड, प्रभादेवी, मुंबई - 400025 यांच्या कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया (सर्व साधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.  
लेखक/ प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. महाराष्ट्र शासनाच्या www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2016 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक मंगळवार 31 जानेवारी 2017 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक, प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे साहित्य 1 ते 31 जानेवारी 2017 पर्यंत पाठवावे. मंडळाकडे प्रवेशिक व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर / पाकीटावर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वामय पुरस्कार 2016 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे. विहीत कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत, असेही मंडळाच्यावतीने कळवण्यात आले आहे.

00000000
इंग्रजी माध्यमातील शाळांच्या प्रवेशासाठी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन
नांदेड, दि. 7 :- जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत सन 2017-18 मध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणेसाठी इच्छूक पालकाकडून रविवार 15 जानेवारी 2017 पासून विद्यार्थ्यांचे अर्ज शासकीय अनुदानीत आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्राप्त करुन घेऊन त्यांच्याकडेच परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. पालकांने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. जर विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांकासह मूळ प्रमाणपत्र सादर करावे. अन्यथा दारिद्रयरेषेसाठी अर्जाचा विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापर्यंत असावे. त्यासाठी तहसिलदाराचे यांचे सन 2017-18 चे उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे. इयत्ता पहिलेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 5 वर्ष पूर्ण असावे. ( जन्म 1 जून 2011 ते 1 जून 2012 या कालावधीत झालेला असावा. ) पालकाचे संमती पत्र, दोन पासपोर्ट फोटो व जन्म तारखेचा दाखला अंगणवाडीचा जोडावा. 
 विद्यार्थ्यांचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र  यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्ता व दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. घटस्फोटीताकरीता न्यायालयीन निवाडयाची प्रत सोबत जोडावी.
 विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. त्याबाबत हमीपत्र जोडावे (ग्रामसेवक). खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांला एकदा एका शाळेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकाच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र देण्यात यावे. वरील अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.

000000
आरोग्य विभागातील गट-क पदांसाठी
आज लेखी परीक्षा, ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध
नांदेड , दि. 7 :- उपसंचालक आरोग्य सेवा  लातूर मंडळ अंतर्गत लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड जिल्हयातील गट क संवर्गातील तांत्रिक व अतांत्रिक रिक्त पदे भरण्यासाठी लेखी परिक्षेचे आयोजन दिनांक रविवार 8 जानेवारी 2017 रोजी करण्यात आले आहे.
  परीक्षेचे वेळापत्रक आरोग्य विभागाच्या http://arogya.maharashtra.gov.in या तसेच महाऑनलाईनच्या  http://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र (HALL TICKET) http://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उमेदवारांनी त्यांच्याकडील Login id Password यांचा वापर करुन  प्रवेश पत्रिका Download करावी त्याची प्रिंट सोबत आणावी. प्रवेशपत्र  टपालाने  पाठविण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. याबाबत अधिक माहितीसाठी मे. महाऑनलाईन लि. या संस्थेच्या सहायक केंद्रास 022-61316403 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. परिक्षा केंद्रावर यासंदर्भातील कोणतीही तक्रार ऍकूण घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे डॉ. व्ही.एम कुलकर्णी, उपसंचालक आरोग्य सेवा लातूर मंडळ , लातूर यानी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

00000000
विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे
काटेकोर पालन करावे - जिल्हाधिकारी काकाणी
विविध यंत्रणा तसेच राजकीय पक्षांची बैठक संपन्न
नांदेड, दि. 7 :- भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ विधानपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. सर्व यंत्रणांनी मतदारांना प्रभावित करणाऱ्या बाबींबाबत सतर्क रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. शिक्षक मतदार संघ विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. काकाणी बोलत होते.
बैठकीस महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, उपवनसंरक्षक सुजय डोडल, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, डीआरडीएचे सहायक प्रकल्पाधिकारी प्रवीणकुमार घुले, जिल्हा नियोजन अधिकारी एस. ए. थोरात आदींची उपस्थिती होती.
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमाची बैठकीत माहिती देण्यात आली. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांवरील जबाबदाऱ्यांबाबत आढावा घेण्यात आला.  मतदारसंघासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार नांदेड जिल्ह्यातील मतदारांची संख्या 9 हजार 45 इतकी आहे. या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. निवडणुकीसाठी मंगळवार 10 जानेवारी रोजी अधिसूचना जाहीर करण्यात येईल. त्यानुसार मंगळवार 17 जानेवारी नामनिर्देशनपत्र दाखल कऱण्याची अंतिम मूदत आहे. त्यानंतर शुक्रवार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. तर सोवार सहा फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यातील मतदारांसाठी 29 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून, त्यांच्या मान्यतेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी श्री . काकाणी बैठकीत प्रचार कार्यालय, पोस्टर्स तसेच भित्तीपत्रके, विश्रामगृहांचा वापर, धार्मिकस्थळांचा निवडणुकीसाठी वापर करण्यास प्रतिबंध, प्रचारासाठीच्या वाहनांचा वापर या अनुषंगाने विस्तृत अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. शिक्षक मतदारांना प्रभावित करू शकतील अशा कार्यक्रमांबाबत दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी स्थिर पथक, भरारी पथक आणि केंद्रीय पथक यांद्वारे अवैध अशा गोष्टींवर प्रतिबंधात्मक कारवाईचे निर्देशही दिले. आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभाग ,तसेच विक्रीकर विभाग यांचा सहभाग घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या तयारींच्या अनुषंगानेही चर्चा झाली व विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
निवडणुकीसाठी राजकीय पक्ष प्रतिनिधींचीही बैठक संपन्न
विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिंधीची बैठकही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत मतदान व मतमोजणी प्रतिनिधींच्या नियुक्तीबाबत, प्रचार कार्यालये, मतदान केंद्रांची निश्चिती याबाबत चर्चा झाली. मतदान केंद्रांची स्थिती, तेथील सुविधांबाबत वेळीच दखल घ्यावी. मतदान शांततेत व सुरळीत पार पडेल यासाठीच्या सुविधांबाबत दक्ष रहावे, असेही  निर्देशही देण्यात आले.बैठकीस उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.



-------

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...