जिल्हा कारागृहात कायदे विषयक शिबीर संपन्न
नांदेड, दि. 7 :- विधी सेवा प्राधिकरण
यांच्या वार्षिक सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय
नांदेड यांच्यावतीने जिल्हा कारागृह नांदेड येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. आर. कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली प्ली बारगिनिंग, बंदी व न्यायाधीनबंदी यांचे अधिकार व जामीना संबंधीच्या तरतुदी याविषयावर कायदेविषयक शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
न्या. कुरेशी यांनी कारागृहात शिक्षा भोगत असलेले बंदी व न्यायाधीनबंदी यांचे अधिकार याविषयावर मार्गदर्शन
केले. तसेच बंद्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती दिली. न्या. श्रीमती सरिता विष्वंभरण, अॅड. जयपाल ढवळे, अभियोक्ता संघाचे उपाध्यक्ष अॅड. जगजीवन भेदे यांनी मार्गदर्शन
केले. अॅड. फेरोजा हाश्मी यांनी महिला बंद्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अॅड. एडकेबंटी उपस्थित होते. जिल्हा कारागृहाचे अधिक्षक जी. के. राठोड यांनी आभार मानले.
000000
No comments:
Post a Comment