Monday, April 7, 2025

वृत्त क्रमांक 361

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन

8 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन

 

नांदेड दि. 7  एप्रिल :- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांच्यावतीने 1 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन उद्या 8 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते समाज कल्याण कार्यालयात होणार आहे.

 

या सामाजिक सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत विभागाच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेला व्हावी तसेच नागरिकामध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने 8 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह कार्यक्रम सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय व त्यांच्या अधिनस्त नांदेड जिल्ह्यातील कार्यरत अनु. जाती मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळा व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहात सामाजिक सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 360

 अंगणवाडी मदतनिस मानधनी पदासाठी 24 एप्रिलपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 7  एप्रिल :- बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येणार आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती याबाबत सविस्तर जाहिरात  https://nanded.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी पात्र स्थानिक महिला उमेदवारांनी 24 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर व्हि.एस.बोराटे यांनी केले आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत पात्र स्थानिक रहीवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून 8 ते 24 एप्रिल 2025 पर्यत विहित नमुन्यात अर्ज मागणी करण्यात येत आहे. तरी पात्र स्थानिक महिला उमेदवारांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर, हौसिंग सोसायटी, घर क्र. 114, शासकीय विश्रामगृह ते पावडेवाडी नाका रोड, गणेश नगर, नांदेड कार्यालयात अर्ज करावेत.

00000

वृत्त क्रमांक 359

 विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा दौरा

                                                                                          

नांदेड दि. 7  एप्रिल :-  महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती हे 9 एप्रिल 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

                                                                                                                                      बुधवार 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईहून नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 8.45 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने सेलूजि. परभणीकडे प्रयाण. सायंकाळी 5.10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं. 6 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

0000

वृत्त क्रमांक 358

 जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे

"समता पंधरवडा " विशेष मोहिमेचे आयोजन

नांदेड दि.  एप्रिल :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे"समता पंधरवडा" आयोजित केला आहे. या पंधरवड्याच्या निमित्ताने एप्रिल ते 14 एप्रिल, 2025 या कालावधीत विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या समता पंधरवड्यात विशेष मोहिमेतंर्गत जिल्हयातील इ.11 व 12 विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थीसीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन भरलेला परिपूर्ण अर्ज जमा करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत. तसेच सर्व कनिष्ठ विज्ञान शाखेच्या महाविद्यालयानी देखील या मोहिमेचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुं. कुलाल यांनी केले आहे.
                                                                                                                               

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समतास्वातंत्र्यबंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.  राज्यघटनेच्या कलम 46 मध्ये घटनेने समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दूरदर्शीपणाने व गांभीर्याने नमूद केली आहे.  त्याअनुषंगाने राज्यातील अनुसूचित जातीवंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत.  यासर्व योजनांची जनतेला माहिती व्हावी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य यांचा प्रचारप्रसिध्दी व्हावीयासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध"समता पंधरवडा"कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे.


समता पंधरवडयात सन 2024-25 मधील विज्ञान शाखेतील प्रवेशित अनुसूचित जातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विहित मुदतीत समितीमार्फत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान संपूर्ण नांदेड जिल्हयातील विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रकरणे तालुका व महाविद्यालय निहाय संख्यात्मक माहिती महाविद्यालयस्तरावर स्थापन केलेल्या समान संधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय व तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत. 

समता पंधरवडयात सन 2024-25 मधील इ. 11 व 12 विज्ञान शाखेतील तसेच सीईटी देणारे विद्यार्थीडिप्लोमाच्या तृतीय वर्षातील प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पावेतो जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाविद्यालयामार्फत जातप्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज समितीकडे दाखल केलेले नाहीतअशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विशेष मोहिमेतंर्गत त्यांचे ऑनलाईन अर्ज संबंधित महाविद्यालयाच्या समान संधी केंद्रामार्फत भरुन महाविद्यालयाकडे दाखल करावेत.  त्याच बरोबर अशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत विशेष मोहिमेतंर्गत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.  तसेच संबंधित महाविद्यालयाच्या समान संधी केंद्रामार्फत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जमा करुन घेण्यात आलेले ऑनलाईन भरलेले एकत्रित अर्ज प्रवर्गनिहाय समितीकडे प्राप्त झाल्यानंतर अशा सर्व अर्जावर समितीच्यावतीने तात्काळ कार्यवाही करुन वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरुन समितीचे कामकाज अधिक पारदर्शकलोकाभिमुख व गतिमान होऊन विद्यार्थ्यांना विहीत वेळेत वैधता प्रमाणपत्र मिळू शकेल.

00000

वृत्त क्रमांक 357

 राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आज नांदेडमध्ये

                                                                                                                                                                                              नांदेड दि. 7  एप्रिल :- राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म  राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
  
सोमवार दि. 7 एप्रिल 2025 रोजी रात्री 9 वाजता हैद्राबाद येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव.
0000