Friday, May 26, 2017

लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी
कडक उपाय योजनांचा अवलंब
नांदेड, दि. 26 :-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी दुय्यम निरीक्षक पदासाठीची पूर्व परीक्षा रविवार 28 मे 2017 रोजी होणार आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी आयोगाने कडक उपाय योजना केल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
रविवार 28 मे रोजी  सकाळी 10.30 ते दुपारी 12 यावेळेत परीक्षा होणार आहेत. या परीक्षेच्या पर्यवेक्षणावर जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार आहेत. याशिवाय परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी आयोगाचे अधिकारी केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देताना पोलीस कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. परीक्षेत गैर प्रकार केल्यास संबंधितावर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाच्या कारवाई केल्या जाणार असल्याचेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

000000
औषध दुकान बंदच्या अनुषंगाने
अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
नांदेड, दि. 26 :-  औषध दुकानदारांच्या मंगळवार 30 मे 2017 रोजीच्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील औषध दुकानदार सहभागी होण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, औषध दुकानदार तसेच वैद्यकीय घटकांना आवाहन केले आहे.
या आवाहनात सहाय्यक आयुक्त यांनी म्हटले आहे की, मंगळवार 30 मे रोजीच्या संपात जिल्ह्यातील औषध दुकानदारांनी सहभागी होवू नये. व्यवसाय करताना अर्थप्राप्ती तसेच जनसामान्यांच्या आरोग्य सेवेचे समाजोपयोगी कार्य घडत आहे. अनेक औषध दुकानदार रात्री, अपरात्री आपत्कालीन परिस्थितीत औषधी दुकान उघडून सेवा प्रदान करतात. अशा प्रकारची सेवा जनसामान्यांना देण्याचे कार्य आपल्याकडून अवितरीतपणे सुरु राहावी. त्यामुळे प्रस्तावीत आंदोलनात सहभागी होवू नये जेणेकरुन जनतेची गैरसोय व रुग्णांना त्रास होणार नाही.  
सरकारी, निमसरकारी व खाजगी दवाखान्यांनी रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी औषधांचा मुबलक साठा करुन ठेवावा. तसेच नागरिकांनी या बंद काळात औषधांचा पुरवठा करण्यास औषध दुकानदारांनी नकार दिल्यास त्याबाबत संपर्क साधावा. संपर्कासाठी पत्ता व दुरध्वनी क्रमांक असे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत नांदेड (दुरध्वनी क्र. 02462-251360).

0000000
औषध दुकान बंदच्या अनुषंगाने
अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
नांदेड, दि. 26 :-  औषध दुकानदारांच्या मंगळवार 30 मे 2017 रोजीच्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील औषध दुकानदार सहभागी होण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, औषध दुकानदार तसेच वैद्यकीय घटकांना आवाहन केले आहे.
या आवाहनात सहाय्यक आयुक्त यांनी म्हटले आहे की, मंगळवार 30 मे रोजीच्या संपात जिल्ह्यातील औषध दुकानदारांनी सहभागी होवू नये. व्यवसाय करताना अर्थप्राप्ती तसेच जनसामान्यांच्या आरोग्य सेवेचे समाजोपयोगी कार्य घडत आहे. अनेक औषध दुकानदार रात्री, अपरात्री आपत्कालीन परिस्थितीत औषधी दुकान उघडून सेवा प्रदान करतात. अशा प्रकारची सेवा जनसामान्यांना देण्याचे कार्य आपल्याकडून अवितरीतपणे सुरु राहावी. त्यामुळे प्रस्तावीत आंदोलनात सहभागी होवू नये जेणेकरुन जनतेची गैरसोय व रुग्णांना त्रास होणार नाही.  
सरकारी, निमसरकारी व खाजगी दवाखान्यांनी रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी औषधांचा मुबलक साठा करुन ठेवावा. तसेच नागरिकांनी या बंद काळात औषधांचा पुरवठा करण्यास औषध दुकानदारांनी नकार दिल्यास त्याबाबत संपर्क साधावा. संपर्कासाठी पत्ता व दुरध्वनी क्रमांक असे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत नांदेड (दुरध्वनी क्र. 02462-251360).

0000000
खरीपासाठी बियाणे, खते, औषध खरेदी
करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी - कृषि विभाग
नांदेड, दि. 26 :-  खरीप हंगाम 2017 मध्ये बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषध खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी  गुणवत्ता दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य दया. बनावट, भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्या पावतीसह खरेदी करा. पावतीवर शेतकऱ्याची विक्रेत्याची स्वाक्षरी मोबाईल नंबरची नोंद करुन पिक निघेपर्यंत पावती संभाळून ठेवा. खरेदी केलेल्या बियाणेचे वेष्टन / पिशवी, टॅग, खरेदीची पावती त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पॉकिटे सिलबंद/ मोहोरबंद असल्याची खात्री करा. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतीम मुद्दत पाहून घ्या. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा. किटकनाशके अंतीम मुदतीचे आतील असल्याची खात्री करावी. आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष, दुरध्वनी, ई-मेल, एस.एम.एस. इत्यादीद्वारे देवून शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हावे. कृषि निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी मार्गदर्शनासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 वर संपर्क साधावा.  विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोन नंबर दिलेले आहेत. अडचणी सोडविण्यासाठी फोनवर संपर्क साधा. गुरुवार 1 जून 2017 पासून डीबीटीद्वारे रासायनिक खताची विक्री करण्यात येणार आहे. खत खरेदी करताना आधारकार्ड आवश्यक आहे. आधारकार्ड नंबर देऊनच खताची खरेदी करावी असेही आवाहन कृषि कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

00000
 चला गावाकडे जा-ध्‍यास विकासाचा घे
अभियानास नांदेड तालुक्यात धनगरवाडीतून प्रारंभ
नांदेड, दि. 26 :-  औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्‍पनेतशनिवार 20 ते सोमवार 29 मे 2017 या कालावधीत चला गावाकडे जा-ध्‍यास विकासाचा घे या अभियानाची सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने नांदेडचे तहसिलदार किरण अंबेकर यांनी नांदेड तालक्‍यातील धनगरवाडी या गावी हे अभियान राबविले आहे.
श्रमदानाचे काम करुन या गावात एक दिवस मुक्‍काम केला. तेथील नागरीकांशी चर्चा करुन त्‍यांच्‍या डीअडचणी जाणुन घेतल्‍या व त्‍यांचे निरसण केले. पाणी टंचाई संदर्भात गावातील विहिरींची माहिती घेण्‍यात आली. एक नविन विंधन विहीर घेण्‍यास सांगण्‍यात आले. प्राधान्‍य कुटूंब लाभार्थी कमी असून बीपीएलचा एकही लाभार्थी या गावात नसल्‍यामुळे त्‍यांना या योजनेबाबत जागृत करुन लाभार्थी संख्‍या वाढविण्‍यासाठी सांगण्‍यात आले.
समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेमधील 11 कलमी कार्यक्रमाचे योजनानिहाय सर्व नागरीकांना मार्गदर्शन करण्‍यात आले. सिंचन विहीरीचे 2 लाभार्थी निवडण्‍यात आले. व्‍हर्मी कंपोस्‍टींग, नाडेफची कामे घेण्‍यास प्रोत्‍साह देण्‍यात आले. तर जिल्‍हा रेशीम विभागाच्‍यावतीने रेशीम कामासाठी 10 लाभार्थी निवडण्‍यात आले आहे. त्‍याअनुषंगाने सोमवार सकाळी 9 वा. या गावात एका विशेष कॅम्‍पचे नियोजन केले. त्‍यात रेशीम उद्योगाच्‍या कामास प्रोत्‍साहनासह नंदवन वृक्ष लागवडीच्‍या अनुषंगानेही माहिती देण्‍यात येणार आहे. या गावात मागल वर्षी जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत 8 सिमेंट नाला बांधचे उद्दीष्ट आहे. त्‍यापैकी चार पूर्ण तर 4 प्रगतीपथावर आहेत. गावातील शौचालयाचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे.  
गटविकास अधिकारी एन. पी. घोलप यांनी खुरगाव हे गाव अभियानासाठी निवडून त्‍या गावात अभियान राबविले आहे. तसेच नांदेड तालक्‍यातील सर्व ग्रामपंचायतीमध्‍ये हे अभियान राबविण्‍याकरीता ग्राम संपर्क अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहे. हे अधिकारी सोमवार 29 मे 2017 रोजी पर्यंत नेमुन दिलेल्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये अभियान राबविणार आहेत.

0000000
            ग्रामपंचायत निवडणुकीमुळे  
दारु विक्री बंदचे आदेश
नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यातील  लोहा तालुक्यातील घोटका व कंधार तालुक्यातील हणमंतवाडी या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार 27 मे 2017 रोजी मतदान व सोमवार 29 मे 2017 रोजी मतमोजणी होत आहे. त्यासंबंधी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.
मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी लोहा तालुक्यातील घोटका व कंधार तालुक्यातील हणमंतवाडी येथे मद्य विक्रीच्या कोणत्याही अनुज्ञप्त्या कार्यरत नाहीत. परंतू मतमोजणीही लोहा व कंधार तहसील कार्यालयात होत असल्यामुळे सोमवार 29 मे 2017 रोजी मतमोजणी होईपर्यंत मतमोजणी होत असलेल्या स्थानीकच्या सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल, बिआर-2 विक्रीच्या अनुज्ञप्त्या अंतर्गत मद्यविक्रीस पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे. 

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...