Friday, May 26, 2017

औषध दुकान बंदच्या अनुषंगाने
अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
नांदेड, दि. 26 :-  औषध दुकानदारांच्या मंगळवार 30 मे 2017 रोजीच्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील औषध दुकानदार सहभागी होण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, औषध दुकानदार तसेच वैद्यकीय घटकांना आवाहन केले आहे.
या आवाहनात सहाय्यक आयुक्त यांनी म्हटले आहे की, मंगळवार 30 मे रोजीच्या संपात जिल्ह्यातील औषध दुकानदारांनी सहभागी होवू नये. व्यवसाय करताना अर्थप्राप्ती तसेच जनसामान्यांच्या आरोग्य सेवेचे समाजोपयोगी कार्य घडत आहे. अनेक औषध दुकानदार रात्री, अपरात्री आपत्कालीन परिस्थितीत औषधी दुकान उघडून सेवा प्रदान करतात. अशा प्रकारची सेवा जनसामान्यांना देण्याचे कार्य आपल्याकडून अवितरीतपणे सुरु राहावी. त्यामुळे प्रस्तावीत आंदोलनात सहभागी होवू नये जेणेकरुन जनतेची गैरसोय व रुग्णांना त्रास होणार नाही.  
सरकारी, निमसरकारी व खाजगी दवाखान्यांनी रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी औषधांचा मुबलक साठा करुन ठेवावा. तसेच नागरिकांनी या बंद काळात औषधांचा पुरवठा करण्यास औषध दुकानदारांनी नकार दिल्यास त्याबाबत संपर्क साधावा. संपर्कासाठी पत्ता व दुरध्वनी क्रमांक असे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत नांदेड (दुरध्वनी क्र. 02462-251360).

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...