Friday, June 28, 2019


कृषि विभागाचा लोगो
सुधारीत करण्यासाठी आवाहन
नांदेड दि. 28 :- कृषि विभागाचा लोगो प्रचलित असून कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येतो. सध्या कृषिक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने प्रचलित लोगोमध्ये बदल करुन नव्याने लोगो करण्याचे प्रस्तावित आहे.
या लोगोमध्ये सुधारणा करुन डीटीपी, डिझाईनचे सॉफ्ट व हार्ड (रंगीत) कॉपी कृषि माहिती विभाग, कृषि भवन 2 रा मजला, शिवाजीनगर पुणे-5 येथे समक्ष व ddinfor@gmail.com, या ईमेलद्वारे 31 जुलै 2019 पर्यंत पाठविण्यात यावा. तसेच ब्रिदवाक्य सुचविण्यात यावे. त्याकरीता सोबत सध्या वापरण्यात येत असलेला लोगो दण्यात येत आहे.
उत्कृष्ट लोगो तयार करणाऱ्या व्यक्ती, संस्था, फर्म्स यांना 25 हजार रुपयाचे पारितोषिक देऊन विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. तसेच सदर लोगो वापरण्याचे स्वामित्व हक्क कृषि विभागाकडे राहील याची नोंद घ्यावी. अधिक संपर्कासाठी रामकृष्ण जगताप, कृषि उपसंचालक (माहिती) कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे-5 कार्यालय नं. 020-25537865 मो.नंबर 9823356835 वर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय पुणे यांनी केले आहे.
00000

तलाठी भरती प्रक्रियेबाबत आवाहन



नांदेड,दि. 28:- तलाठी गट क संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने महापरीक्षा पोर्टलवरील तसेच हॉलतिकीटवरील सुचनांचे उमेदवारांनी तंतोतत पालन करावे. याबाबत अधिक माहिती, तक्रार नोंदविण्‍यासाठी महापरीक्षाचा टोल फ्रि क्रमांक 1800 3000 7766 व enquiry@mahapariksah.gov.in या मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाचे केले आहे.
राज्‍यातील सर्व शासकीय विभागातील मोठया प्रमाणावर असणारी रिक्‍त पदे भरण्‍याबाबत शासन धोरण निश्‍चीत करण्‍यात आले आहे. या धोरणानुसार सदर भरती प्रक्रिया महाआयटी (माहिती तंत्रज्ञान विभाग) या शासकीय विभागाच्‍या माध्‍यमातुन ई-महापरिक्षा या पोर्टलवरुन करावयाची आहे. त्‍यानुसार महसुल विभागाच्‍या आखत्‍यारीत असलेल्‍या तलाठी संवर्गातील रिक्‍त पदे भरण्‍याची कार्यवाही महा-आयटीच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात येत आहे.
या परीक्षेचे पुर्ण संचलन व कार्यान्‍वयन महा-आयटी (माहीती तंत्रज्ञान) विभागाच्‍या माध्‍यमातुन             ई-महापरिक्षा मार्फत होत आहे. उमेदवारांच्‍या पसंतीच्‍या जिल्‍ह्यात परीक्षा देण्‍यासाठी संगणक विषयक पायाभुत सोई असणा-या शाळा/कॉलेजची निवड महा-आयटीकडून करण्‍यात येवून राज्‍यभरात एकुण 122 परीक्षा केंद्र निश्‍चीत करण्‍यात आली आहेत.
पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, मुळफोटोसह राष्‍ट्रीयकृत बॅंक पासबुक, वाहन अनुज्ञप्‍ती (Driving Licence), आधारकार्ड हे सर्व परीक्षा केंद्रावर उमेदवारांने सहापैकी एक मुळ फोटो ओळखपत्र (Original photo ID) आणणे अत्‍यावश्‍यक आहे.
 ओळखपत्र फेरफार करुन तोतया उमेदवार येवू नये यासाठी फोटो ओळखपत्राची रंगीत झेरॉक्‍स, e-Aadhar card  आणि फोटो ओळखपत्राची सॉफ्ट कॉपी वैद्य ओळखपत्र पुरावा म्‍हणून स्विकारली जाणार नाही. अशा स्‍पष्‍ट सुचना उमेदवारांच्‍या हॉलतिकीटवर देण्‍यात आल्‍या आहेत.
महापरिक्षा पोर्टलवरुन घेतल्‍या जाणा-या परीक्षा चालु असतांना नियमांचे पालन केले जात आहे ना, काही गैरप्रकार होत नाही ना, यावर लक्ष ठेवण्‍यासाठी प्रत्‍येक परीक्षाकेंद्रावर  निरीक्षक (Observer) म्‍हणून व महा-आयटीच्‍या मुंबई येथील कंमाड रुममध्‍ये परीक्षा नियंत्रक (Exam Controller) म्‍हणून प्रत्‍येकी एका अधिका-याची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
महापरीक्षा पोर्टलवरील तसेच हॉलतिकीटवरील सुचनांचे उमेदवारांनी तंतोतत पालन करणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात अधिक माहीती/तक्रार नोंदविण्‍यासाठी महापरीक्षाचा टोल फ्रि क्रमांक 1800 3000 7766 व enquiry@mahapariksah.gov.in ह्या मेलवर संपर्क साधण्‍याबाबत सर्व सं‍बंधितांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
00000

विद्युत ठेकेदार अनुज्ञाप्तीसाठी अभियंत्यांचा 4 जुलैला मेळावा



नांदेड, दि.28:- पात्र विद्युत अभियंत्यांचा मेळावा विद्युत निरीक्षक कार्यालय नांदेड आणि अधिक्षक अभियंता, स. सु. नियंत्रन मंडळ, महावितरण, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 4 जुलै 2019 रोजी सकाळी 11 वा. उप प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, महावितरण मंडळ कार्यालय परिसर, विद्युत भवन, अण्णा भाऊ साठे चौक, नांदेड येथे आयोजीत केला आहे.
जिल्हयात विज वितरण कंपनीची इतरही विद्युत विषयक कामे करण्यासाठी पुरेसे विद्युत कंत्राटदार उपलब्ध व्हावे त्यातुन बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध होने करीता पात्र अभियंत्यांना शासनाची विद्युत कंत्राटदारांची अनुज्ञाप्ती मिळविण्यासाठी आवश्यक असणारी माहिती मार्गदर्शन देण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी पात्र विद्युत अभियंत्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. 
             जिल्हयातील सर्व विद्युत अभियांत्रीकी पदवि / पदविकाधारक बेरोजगार अभियंते तसेच सर्व विद्युत पर्यवेक्षक अनुज्ञाप्ती धारक, विद्युत विषयात NCTVT पुर्ण केलेले, ITI विजतंत्री पुर्ण करुन अनुभव असलेल्या अशा सर्व उमेदवारांना सदर मेळाव्यात आपल्याकडे असलेल्या कागदपत्रासह उपस्थीत रहावे असे आवाहन विद्युत निरीक्षण विभाग व अधिक्षक अभियंता महावितरण नांदेड या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
             आयोजीत केलेल्या या मेळाव्यास उपस्थित राहु च्छिणाऱ्या वर नमुद केल्याप्रमाणे पात्र उमेदवारांनी विद्युत निरीक्षक यांचे कार्यालय स्नेहनगर, नांदेड येथे दुरध्वनी क्रमांक 02462 (250966) वर किंवा अधिक्षक अभियंता, महावितरण, मंडळ कार्यालय, नांदेड यांचे कार्यालयीन दुरध्वनी क्रं. 02462 (286904) वर दुरध्वनी द्वारे किंवा प्रत्यक्ष भेटुन नाव नोंदणी करावी, असे आवाहन या दोन्ही कार्यालयाकड करण्यात येत आहेü.
0000


संगणक प्रणालीत सुधारणेचे काम सुरु
सातव्या वेतन आयोगानुसार
निवृत्तीवेतनधारकांना लवकरच वेतन
नांदेड, दि.28 :- राज्य शासनाच्या आदेशानुसार निवृत्तीवेतन धारकांच्या जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 या कालावधीच्या सातव्या वेतन आयोगानुसार वाढीव निवृत्तीवेतनाचा पहिला हप्ता प्रदान करण्याचे काम जिल्हा कोषागारामध्ये चालू आहे. संगणक प्रणालीमधील  त्रटीमूळे मासिक निवृत्तीवेतनाच्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्यासह, प्रदानास दोन-तीन दिवस विलंब होण्याची क्यता आहे. संगणक प्रणालीत सुधारणेचे काम सुरु असून लवकरात लवकर निवृत्तीवेतन धारकांचे वेतन आयोगाच्या  हप्त्यांसह प्रदान करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...