Thursday, March 10, 2022

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित

तर 1 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 675अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 780 एवढी झाली असून यातील 1 लाख 75 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13 रुग्ण उपचार घेत आहे. 

आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे बेलखेड यवतमाळ येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे चंद्रपूर 1 असा एकुण 1 कोरोना बाधित आढळला आहे. 

आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 1 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 11 असे एकुण 13 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 84 हजार 356

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 64 हजार 530

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 780

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 75

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-13

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-13

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना  

काम वाटप करण्यासाठी समितीची बैठक 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना लॉटरी पद्धतीने काम वाटप करण्यासाठी गठीत केलेल्या काम वाटप समितीची बैठक सोमवार 14 मार्च 2022 रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड येथे दुपारी 12 वा. येथे घेण्यात येणार आहे. 

कामे घेण्यास इच्छुक सुशिक्षीत बेरोजगार अभियंतांनी नोंद घेऊन आवश्यक कागदपत्रासह बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड काम वाटप समिती तथा सार्वजनिक बांधकाम मंडळाचे सदस्य सहाय्यक अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.

00000


 शासकीय पातळीवरच्या सेवा वेळेत देण्यासाठीच

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा - मुख्य आयुक्त दिलीप शिंदे

 

·         नांदेड जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतूक 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा लोकांना शासकीय पातळीवरच्या सेवा वेळेत देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. जनतेला या सेवा वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. नागरिकांना अधिकार देणारा आणि प्रशासनाला कर्तव्य तत्पर गतीमान करणारा याचबरोबर जबाबदार धरणारा हा कायदा आहे. या कायदाची राज्यात चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे. तथापि हा कायदा अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्नरत असले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी केले. 

नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदाच्या दृष्टिकोणातून आज त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती.  

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय पातळीवरून दिल्या जाणाऱ्या सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. या सेवा गरजूंना सुलभ आणि तत्परतेने देण्याच्या दृष्टिने महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने कार्य सुरू आहे. आपली सेवा आपले कर्तव्य हे ब्रिदवाक्य शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनातील सेवाभाव जागृत करणारा आहे. हा कायदा अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे असे सांगून मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने याबाबत चांगले कार्य सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचेही त्यांनी कौतूक करून या अधिनियमाअंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने चिखलवाडी कॉर्नर नांदेड येथे सुरू करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र आणि अण्णा भाऊ साठे चौक, महाराणा प्रताप चौक येथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कर्मचारी व लाभार्थी नागरिकांशी चर्चा केली. यावेळी उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार किरण अंबेकर, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक कपील पेंडलवार आदी उपस्थित होते.   

00000







समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...