Monday, October 26, 2020

 

172 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

  43 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 26 :- सोमवार 26 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 172 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 43 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 19 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 24 बाधित आले. 

आजच्या एकुण 635 अहवालापैकी  536  अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 18 हजार 796 एवढी झाली असून यातील  17  हजार 391 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 774 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 37 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात दोघाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रविवार 25 ऑक्टोंबर रोजी हदगाव येथील 65 वर्षाची एक महिला, देगलूर तालुक्यातील हिप्परगा येथील 20 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 502 झाली आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 4, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केंअर सेंटर 3, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 5, कंधार कोविड केंअर सेंटर 3, लोहा कोविड केंअर सेंटर 2, मांडवी कोविड केंअर सेंटर 6, मुखेड कोविड केंअर सेंटर 3, उमरी कोविड केंअर सेंटर 5, भोकर कोविड केंअर सेंटर 6, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 7, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 2, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 76, किनवट कोविड केंअर सेंटर 5, माहूर कोविड केंअर सेंटर 6, मुदखेड कोविड केंअर सेंटर 4, नायगाव कोविड केंअर सेंटर 12, खाजगी रुग्णालय 23 असे  172 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.49 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 14, भोकर तालुक्यात 1, देगलूर 1, नांदेड ग्रामीण 1, किनवट 1, बिलोली 1  असे एकुण 19 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 17, भोकर तालुक्यात 1, नायगाव 1, पुणे 1, नांदेड ग्रामीण 2, बिलोली 1, किनवट 1 असे एकूण 24 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 774 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 160, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 258, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 47, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 29, हदगाव कोविड केअर सेंटर 11, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 8, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 12, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 14,  मांडवी कोविड केअर सेंटर 7, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 9, लोहा कोविड केअर सेंटर येथे 13, मुदखेड कोविड केअर सेटर 5, माहूर कोविड केअर सेंटर 14, किनवट कोविड केअर सेंटर येथे 30, धर्माबाद कोविड केअर सेंटर 1, उमरी कोविड केअर सेंटर 1, कंधार कोविड केअर सेंटर येथे 6, अर्धापूर कोविड केअर सेंटर 9, भोकर कोविड केअर सेंटर 8,  हिमायतनगर कोविड केअर सेंटर 3, खाजगी रुग्णालयात दाखल 125, लातूर येथे संदर्भीत 1, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, औरंगाबाद येथे संदर्भीत 1 झाले आहेत. 

सोमवार 26 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 69, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 71 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 6 हजार 998

निगेटिव्ह स्वॅब- 84 हजार 891

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 796

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 391

एकूण मृत्यू संख्या- 502

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.49 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-13

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 390 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 774

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 37. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 

जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी

ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने मंगळवार 27 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी लॉकडाऊननंतर उद्भभवलेला बेरोजगारीचा प्रश्न व उपाय याविषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दुपारी 4 ते सायं 5 वाजेपर्यंत  करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीतजास्त युवक-युवतींनी ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात सहभाग घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

लॉकडाऊननंतर उद्भभवलेला बेरोजगारीचा प्रश्न व उपाय याविषयावर शुभंकरोती फाऊंडेशन तथा मार्गदर्शक उद्योगिनी समुहाचे संस्थापक किरण चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे लागेल. यासाठी https://meet.google.com/vwn-qumy-uam या लिंकवर क्लिक करावे. आपल्याकडे Google meet app यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर  इन्स्टॉल करून घ्यावे. आपण गुगल मीटॲप Google meet app मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माइक म्युट mice mute बंद करावे. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक अन् म्युट  unmute / सुरु करून विचारावे व लगेच  माईक म्युट mute/ बंद करण्याची दक्षता घ्यावी.    अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा कौशल्य विकास. रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड  02462-251674 येथे  संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

000000

 

रब्बी हंगामातील पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 26 :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सन 2020-21 या रब्बी हंगामासाठी पिकविमा प्रस्ताव स्विकारणे सुरू झाले असून रब्बी ज्वारीसाठी पिक विमा भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 तर गहु बागायती, हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2020 ही अंतिम मुदत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात इफ्कोटोकीयो कंपनीची पुढील ती वर्षासाठी नियुक्ती केली आहे. या इफ्कोटोकीयो कंपनीच्यावतीने जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार प्रसिध्दीच्या चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन या मोहिमेला सुरूवात झाली. यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी रामराव पवार, इफ्कोटोकीयोचे जिल्हा प्रतिनीधी गौतम कदम, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, कृषि विज्ञान केंद्राचे संशोधक श्री. गिरी, तंत्र अधिकारी प्रमोद गायके हे उपस्थित होते.

000000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...