Monday, April 8, 2024
वृत्त क्र. ३१8
नांदेड लोकसभा संदर्भिकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन
वृत्त क्र. ३१७
भयमुक्त वातावरणात लोकसभा निवडणूक लढा !
निवडणूक निरीक्षकांचे उमेदवारांना आवाहन
प्रथम लेखे तपासणी १२ एप्रिल रोजी
नांदेड दि. ८ एप्रिल : लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणतीही अडचण असेल, दबाव असेल, किंवा भीती असेल, काही मदत हवी असेल तर जिल्हा प्रशासनासोबत चार निरीक्षक आपल्या सोबतीला आहे. 24 तास आम्ही इथे कार्यरत आहे. आमच्या सगळ्यांचे दूरध्वनी आपल्याकडे आहेत. कधीही मदत मागा, आदर्श आचारसंहितेच्या पालन करा,असे आवाहन निवडणूक रिंगणात उरलेल्या उमेदवारांना पक्ष निरीक्षक व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याच्या आजच्या दिवशी 16 -नांदेड मतदार संघातून 43 उमेदवारांनी माघार घेतली आहे त्यामुळे आता 23 उमेदवार रिंगणात आहेत. या 23 रिंगणात असणाऱ्या उमेदवारांसोबत व त्यांच्या प्रतिनिधी सोबत सर्वसामान्य निरीक्षक शशांक मिश्र, खर्च निरीक्षक डॉ. दिनेशकुमार जांगिड, खर्च निरीक्षक मग्पेन भुटिया यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, खर्च कक्षाचे प्रमुख तथा महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. जनार्दन पक्वान्ने यांच्यासह खर्चविषयक समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी खर्चाच्या नोंदी कशा ठेवाव्यात कोणत्या खर्चाच्या नोंदी ठेवाव्यात , दैनंदिनी कशी बनवावी यासह खर्चाच्या अनेक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवहीच्या तपासणीसाठी कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन, कॅबिनेट बैठक कक्ष, तळमजला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रथम तपासणी 12 एप्रिल सकाळी 11 ते सहा वाजता, द्वितीय तपासणी 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 ते 6 तर तृतीय तपासणी 22 एप्रिल ला सोमवारी 11 ते 6 या कालावधीत होणार आहे. या बैठकींना तपासणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे.उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी या बैठकींना उपस्थित न राहिल्यास, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी अपात्र ठरतो, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी सर्वसाधारण निरीक्षक व अन्य निरीक्षकांनी
उमेदवारांशी संवाद साधून त्यांच्या कुठल्याही
अडचणीला सोडवण्यात येईल,असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
०००००
वृत्त क्र. ३१६
नांदेड लोकसभेसाठी 23 उमेदवार रिंगणात
43 उमेदवारांनी घेतले अर्ज मागे
नांदेड दि. 8 एप्रिल – 16- नांदेड लोकसभा निवडणुकीच्या छाननीमध्ये पात्र ६६ उमेदवारापैकी एकूण 43 उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 23 उमेदवार सध्या पात्र आहे. 16-नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये 23 अंतिम उमेदवार निश्चित झाले आहेत. उमेदवारांची नावे व पक्ष चिन्ह पुढीलप्रमाणे असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन रिंगणात असलेल्या उमेदवारांची माहिती दिली. जिल्ह्यामध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मोठ्यासंख्येने जनतेने लोकशाहीच्या या महोत्सवात आपल्या मतदाधिकाराचे कर्तव्य म्हणून कार्यवहन करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता तसेच १६ मार्च पासून वेगवेगळ्या विभागात झालेली कार्यवाही तसेच निवडणुकीची तयारी याबाबतची माहिती दिली.
आज एकूण 66 पात्र उमेदवारापैकी आज 43 जणांनी माघार घेतली त्यामूळे 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भारतीय जनता पार्टी)- चिन्ह कमळ, पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पार्टी) चिन्ह- हत्ती, चव्हाण वसंतराव बळवंतराव (इंडियन नॅशनल काँग्रेस) चिन्ह- हात, अब्दुल रईस अहेमद (देश जनहीत पार्टी) चिन्ह-शाळेचे दप्तर, अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी) चिन्ह-शिट्टी , कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग) चिन्ह-शिवण यंत्र, राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी) चिन्ह-खाट, रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष) चिन्ह-ऑटो रिक्शा, सुशीला निळकंठराव पवार (समनक जनता पार्टी) चिन्ह-गॅस सिलेंडर, हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी) चिन्ह-जहाज. तर अपक्षांमध्ये कदम सुरज देवेंद्र (अपक्ष) चिन्ह-फुगा, कल्पना संजय गायकवाड (अपक्ष) चिन्ह-माईक, गजानन दत्तरामजी धुमाळ (अपक्ष) चिन्ह-कपाट, जगदीश लक्ष्मण पोतरे (अपक्ष) चिन्ह-टेबल, देविदास गोविंदराव इंगळे (अपक्ष) चिन्ह-ऊस शेतकरी, नागेश संभाजी गायकवाड (अपक्ष) चिन्ह-एअर कंडिशनर, निखिल लक्ष्मणराव गर्जे (अपक्ष) चिन्ह-हिरा, भास्कर चंपतराव डोईफोडे (अपक्ष) चिन्ह-सफरचंद, महारुद्र केशव पोपळाईतकर (अपक्ष) चिन्ह–पेन ड्राईव्ह, राठोड सुरेश गोपीनाथ (अपक्ष) चिन्ह-रोड रोलर, लक्ष्मण नागोराव पाटील (अपक्ष) चिन्ह-बेबी वॉकर, साहेबराव भिवा गजभारे (अपक्ष) चिन्ह-पेनाची निब सात किरणांसह, ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे (अपक्ष) चिन्ह-बांगड्या यांचा समावेश आहे.
माघार घेतलेले उमेदवार- मोहनराव आनंदराव वाघमारे, शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलीस- ए-इन्कलाब –ए- मिल्लत), सय्यद तनवीर (बहुजन महापार्टी), अकबर अख्तर खॉन, अक्रम रहेमान सय्यद, अनवर अ. कादर अ. कादर शेख, अमजत खा सरवर खान, अरुण भागाजी साबळे, अशफाक अहमद, असलम इब्राहीम शेख, शे. इमरान शे. पाशा, इरफान फहरुख सईद, मो. इलियास अब्दुल वहिद मोहमद, खान अलायार युसुफ खान, अ. खालेद अ. रफीक, जफर अली खाँ महेमुद अली खाँ पठाण, जुल्फेखान जिलानी सय्यद, तबस्सुम बेगम, तुकाराम गणपत बिराजदार, थोरात रविंद्र गणपतराव, नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसैन, नागोराव दिगंबर वाघमारे, प्रमोद किशनराव कामठेकर, फहाद सलीम शेख सलीम शेख, मजीद अ. अकबर, महमंद तौफीक महमंद युसुफ, महमद मुबीन शे. पाशा, महमद सलीम महमद इकबाल, अॅड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील, मोहम्मद नदीम मोहम्मद इक्बाल, मोहम्मद वसीम, मोहम्मद सिद्दीक शेख संदलजी, युनुस खान, युनुसखॉं युसुफखाँ, रमेश दौलाती माने, लतीफ उल जफर कुरेशी, अॅड. विजयसिंह चौव्हाण, विनयमाला गजानन गायकवाड, वैशाली मारोतराव हुक्के पाटील, शाहरुख खमर, शिवाजी दत्तात्रय गायकवाड, साहेबराव नागोराव गुंडीले, ज्ञानेश्वर बाबूराव कोंडामंगले़ हे आहेत अशी माहिती सहाय्यक
निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.
00000
महत्वाचे / संदर्भासाठी विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...