Monday, August 14, 2017

शिवाजी पुतळा ते महात्मा गांधी पुतळा परिसरात बंदी आदेश
नांदेड, दि. 14 :- नांदेड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात सोमवार 14 ऑगस्ट रोजी सायं. 6 वाजेपासून मंगळवार 15 ऑगस्ट 2017 रोजी मध्यरात्री पर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
मंगळवार 15 ऑगस्ट 2017 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात होणार आहे. त्याअनुषंगाने शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात मुख्य रस्त्यावर सोमवार 14 ऑगस्ट रोजी सायं 6 वाजेपासून मंगळवार 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री पर्यंत उपोषण, धरणे, मोर्चा, रॅली इत्यादी आंदोलन करण्यात येऊ नयेत. यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  बंदी आदेश लागू करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी नांदेड यांच्याकडून देण्यात आली.
000000


कर सहायक परीक्षा केंद्र
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 14 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग कर सहाय्यक परीक्षा- 2017 ही रविवार 20 ऑगस्ट 2017 रोजी नांदेड शहरातील 17 केंद्रावर सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  लागू  केल्याचे जिल्हादंडाधिकारी  नांदेड  यांनी कळवले आहे
या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी, कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. 

000000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 14  :- जिल्ह्यात शनिवार 26 ऑगस्ट 2017 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनाची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 12 ते 26 ऑगस्ट 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

000000
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये
माजी विद्यार्थ्यांचा आज मेळावा  
नांदेड दि. 14 :- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधु शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे संस्थेच्यावतीने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन मंगळवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा. करण्यात आले आहे. मेळाव्यास जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी शासकीय तंत्रनिकेतनच्या सभागृहात  उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य पी. डी. पोपळे यांनी केले आहे.
माजी विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेबद्दल आपुलकी निर्माण करुन त्यांच्या यशाबद्दल आजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, यादृष्टीने माजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा लाभ निश्चितपणे संस्थेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरु शकतो. याहेतने संस्थास्तरावर माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000
स्वातंत्र्य दिन मुख्य समारंभात आज
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 14 :- भारतीय स्वातंत्र्याच्या 70  व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त मंगळवार 15 ऑगस्ट, 2017  रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सकाळी 9.05 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहनही  राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय समितीने केले आहे.

0000000
पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा दौरा
नांदेड, दि. 14 :-  राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 14 ऑगस्ट 2017 रोजी जालना येथुन मोटारीने सायं. 6 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव.
मंगळवार 15 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 8.50 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9.05 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय स्वातंत्र्याच्या 70  व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.07 वा. राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीत. सकाळी 9.07 वा. परेड कमांडरची रिपोर्टिंग. सकाळी 9.08 वा. शुभेच्छा संदेश. सकाळी 9.20 वा. विविध शाळेतील गुणवंत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण. सकाळी 9.45 वा. मा. स्वातंत्र्य सैनिक व इतर मान्यवरांशी हितगुज. सकाळी 10.10 वा. जलसंपदा विभागांतर्गत सर्व बंधाऱ्यामध्ये शंभर टक्के पाणीसाठा करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याबाबत बैठक. सकाळी 10.40 वा. संगणीकृत सातबारा होर्डिंग मशिनचे लोकार्पण सोहळा. सकाळी 11 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सोईनुसार शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन जालनाकडे प्रयाण करतील.

000000
वंचित घटकांचे राहणीमान उंचावण्यासाठी
जिल्हा प्रशासन प्रयत्नशील - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड, दि. 14 :- समाजातील वंचित घटकांना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
शोध वंचितांचा "एक संकल्प" याबाबत करावयाच्या उपाययोजनेची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या कक्षात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एन. कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (जि.ग्रा.वि.यं.) डॉ. पी. पी. घुले, महिला व बालविकास अधिकारी धर्मपाल शाहू, समाज कल्याण अधिकारी एस. व्ही. आऊलवार, आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, भटक्या विमुक्त समाजातील वंचित नागरिकांना त्यांचे हक्क प्राप्त करुन देणे महत्वपुर्ण आहे. त्यांचे पुनर्वसन, आरोग्य, शिक्षण, निवारा, अन्न-धान्य, शिधापित्रका, कौशल्य विकास, व्यवसायासाठी अर्थसहाय्य यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. वंचित घटकांना लाभ मिळवून देणे एक समाजिक काम आहे. यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मानव निर्देशांकामध्ये उल्लेखनीय प्रगती करणे या उपक्रमाचा उद्देश आहे. नांदेड जिल्ह्यात क्रमाक्रमाने हे काम पुढे नेले जाईल, असे जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सांगितले.  
लोहा तालुक्यात वंचितांच्या वस्तीवर भेटी देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदानकार्ड, तसेच स्वस्त धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  या उपक्रमात नांदेड तालुक्यातील सांगवी, अर्धापुर आणि लोहा या गावांची निवड करण्यात आली आहे.  नांदेड तालुक्यातील 327 कुटुंबे, अर्धापुर तालुक्यातील 97, लोहा तालुक्यातील 96 कुटुंबांचा समावेश आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
000000



  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...