Monday, July 27, 2020


मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी
समाधानकारक : अशोक चव्हाण
मुंबई, दि. 27  : मराठा आरक्षणासंदर्भात आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली नाही. एवढेच नव्हे तर या प्रकरणाची व्याप्ती पाहता ही सुनावणी ऑनलाईन न करता प्रत्यक्ष करावी, याबाबतही सर्वोच्च न्यायालय गांभिर्याने विचार करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आजची सुनावणी समाधानकारक झाल्याचे मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीविषयी माहिती देताना श्री. चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या विरोधकांकडून वारंवार स्थगितीची मागणी केली जाते. परंतु, न्यायालयाने कोणतीही स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नोकरभरती ४ मे रोजीच्या शासन निर्णयान्वये अगोदरच थांबलेली आहे. राज्य शासनाच्या वकिलांनी ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली व नोकरभरतीबाबत तातडीने कोणताही निर्णय घेण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तीवाद केला. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षणाला देखील आज कोणतीही स्थगिती मिळाली नाही. परंतु, मराठा आरक्षणाचे विरोधक याबाबत गैरसमज निर्माण करीत असल्याचे ते  म्हणाले.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आजपासून सलग तीन दिवस व्हर्च्युअल सुनावणी करण्याचा निर्णयपूर्वी घेतला होता. परंतु, या प्रकरणाची व्याप्ती पाहता तसेच यामध्ये अनेक हस्तक्षेप याचिकाकर्ते असून त्यांनाही आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी मिळणे आवश्यक असल्याने ही सुनावणी ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्ष घ्यावी, अशी शासनाची भूमिका आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या वकिलांनी आज आपली बाजू मांडली. या विनंतीवर सर्वोच्च न्यायालय गांभिर्याने विचार करीत असल्याचे दिसून आले. शिवाय काही तांत्रिक बाबी विचारात घेता हे प्रकरण संवैधानिक खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी देखील पुढे आली होती. त्याअनुषंगाने येत्या 25 ऑगस्टला सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले. आजच्या सुनावणीत राज्य शासनाच्या अपेक्षेप्रमाणे कल आला आहे. पुढील काळातही राज्य शासन भक्कमपणे बाजू मांडणार असून या प्रकरणाचा सकारात्मक निकाल आलेला दिसेल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
००००


वृत्त क्र. 690   
कोरोनातून आज 47 व्यक्ती बरे 
जिल्ह्यात 70 बाधितांची भर तर दोघाचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 27 :-  जिल्ह्यात आज 27  जुलै रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 47 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 70 व्यक्तींचे अहवाल बाधित असून यात 4 बाधित हे शेजारील परभणी जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण 420 अहवालापैकी 337 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 1 हजार 394 एवढी झाली असून यातील 740 एवढे बाधित बरे झाले आहेत. 583 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 12 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 4 महिला व 8 पुरुषांचा समावेश आहे. रविवार 26 जुलै रोजी कौसरनगर चुनाभट्टी परिसर येथील 36 वर्षाची एक महिला व शहापूर देगलूर येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 59 एवढी झाली आहे.  
आज बरे झालेल्या 47 बाधितांमध्ये पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 39, मुखेड कोविड केअर सेंटर मधील 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 5, देगलूर कोविड केअर सेंटर येथील 2 बाधितांचा  यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण 740 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.  
नवीन बाधितांमध्ये  बरकतपुरा नांदेड येथील 54 वर्षाचा 1 पुरुष, नवीन मोंढा नांदेड येथील 63 वर्षाचा 1 पुरुष, चुनाभट्टी नांदेड येथील 36 वर्षाची 1 महिला, वसंतनगर नांदेड येथील 40 वर्षाचा 1 पुरुष, गणेशनगर नांदेड येथील 47 वर्षाचा 1 पुरुष, शिवाजीनगर नांदेड येथील 65 वर्षाची 1 महिला, सिंधी कॉलनी नांदेड येथील 30 वर्षाची 1 महिला, वजिराबाद नांदेड येथील 70 वर्षाचा 1 पुरुष, गोविंदनगर नांदेड येथील 42 वर्षाची 1 महिला, दिलीपसिंघ कॉलनी गोवर्धन घाट नांदेड येथील 10 वर्षाचा एक मुलगा, गोवर्धनघाट वजिराबाद नांदेड येथील 59 वर्षाचा 1 पुरुष, दिपनगर नांदेड येथील 19 वर्षाची 1 महिला, आश्विनी हॉस्पिटल येथील 65 वर्षाची 1 महिला, भगवती हॉस्पिटल येथील 47 वर्षाचा 1 पुरुष, फारुकनगर नांदेड येथील 24 वर्षाचा 1 पुरुष, देगलूरनाका नांदेड येथील 34 वर्षाचा 1 पुरुष, शारदानगर नांदेड येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, सिडको नांदेड येथील 11,17,56 वर्षाचे 3 पुरुष आणि 42 व 34 वर्षाच्या 2 महिला, दत्तनगर नांदेड येथील 4 वर्षाचा 1 मुलगा, सोमेश कॉलनी नांदेड येथील 58 वर्षाचा 1 पुरुष, वसरणी नांदेड येथील 21 वर्षाचा 1 पुरुष, नेरली नांदेड येथील 16,16,21 वर्षाचे 3 पुरुष व 40 वर्षाची 1 महिला, कासरखेडा नांदेड येथील 72 वर्षाचा 1 पुरुष, लोहा तालुक्यातील सोनखेड येथील 35 वर्षाचा 1 पुरुष, अर्धापूर करीम कॉलनी येथील 48 वर्षाची 1 महिला, हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण बामणी येथील 28,25 वर्षाचे 2 पुरुष, देगलूर गोकुळनगर येथील 16 वर्षाची 1 महिला, देगलूर येथील 27 व 52 वर्षाचे 2 पुरुष आणि 16 वर्षाची 1 महिला, लाइन गल्ली देगलूर येथील 25 व 40 वर्षाच्या 2 महिला, शिवनेरी देगलूर येथील 50 वर्षाची 1 महिला, भोईगल्ली देगलूर येथील 22, 40 वर्षाचे 2 पुरुष व 9,9,32,35 वर्षाच्या 4 महिला, देगलूर तालुक्यातील सुगाव येथील 18 वर्षाची 1 महिला, शहापूर येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, नायगाव तालुक्यातील कुटूंर येथील 26 वर्षाचा 1 पुरुष, नायगाव येथील 29 व 39 वर्षाचे 2 पुरुष, बिलोली येथील 68 वर्षाचा 1 पुरुष, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 60 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड फुलेनगर येथील 7,10,11,42,38,50 वर्षाचे 6 पुरुष आणि 12,29 वर्षाच्या 2 महिला, मुखेड 65 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड शिवाजीनगर येथील 34 वर्षाची 1 महिला, यवतमाळ जिल्ह्यातील आजादनगर उमरखेड येथील 60 वर्षाचा 1 पुरुष बाधित आढळले.  
जिल्ह्यात 583 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 103, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 218, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 22, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 10, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 3, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 85, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 41, उमरी कोविड केअर सेंटर 10, लोहा कोविड केअर सेंटर येथे 11, हदगाव कोविड केअर सेंटर 11, भोकर कोविड केअर सेंटर 2, कंधार कोविड केअर सेंटर येथे 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 8, खाजगी रुग्णालयात 44 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 5 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 545,
घेतलेले स्वॅब- 12 हजार 638,
निगेटिव्ह स्वॅब- 10 हजार 151,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 70,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 394,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 10,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,
मृत्यू संख्या- 59,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 740,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 583,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 246. 
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...