नांदेड जिल्ह्यात 96 व्यक्ती कोरोना बाधित
तर 411 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 320 अहवालापैकी 96 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 78 तर अँटिजेन तपासणीद्वारे 18 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 686 एवढी झाली असून यातील 99 हजार 177 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 824 रुग्ण उपचार घेत असून यात 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे हिमायतनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा 8 फेब्रुवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 685 एवढी आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 32, हिमायतनगर 3, माहूर 9, परभणी 1, पंजाब 1, अर्धापूर 1, हदगाव 4, मुदखेड 1, हिंगोली 4, उत्तरप्रदेश 1, भोकर 4, किनवट 5, मुखेड 4, यवतमाळ 1, बिलोली 1, लोहा 4, उमरी 1, राजस्थान 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 11, नांदेड ग्रामीण 4, देगलूर 1, किनवट 1, मुखेड 1 असे एकुण 96 कोरोना बाधित आढळले आहे.
आज जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 215, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 190, खाजगी रुग्णालय 6 असे एकुण 411 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.
उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 21, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 440, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 338, खाजगी रुग्णालय 23, असे एकुण 824 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 58 हजार 240
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 39 हजार 173
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 686
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 99 हजार 177
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 685
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.58 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-03
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-28
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-824
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2.
कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
000000