Tuesday, April 30, 2024

 वृत्त क्र. 397

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65 वा दिन उत्साहात साजरा

·         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण

·         उत्कृष्ठ कामगिरी बाबत कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव 

नांदेड दि. 1 :- महाराष्ट्र राष्ट्र स्थापनेच्या 65 व्या दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात वजीराबाद येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर सकाळी 8 वाजता साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी समस्त जिल्हावाशियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,  अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, श्रीमती किर्तीका अन्य वरिष्ठ अधिकारी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिक तसेच स्वातंत्र सैनिक व त्यांचे कुटुंबियाची उपस्थिती होती. 

 

ध्वजारोहण व ध्वजवंदनानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवड झालेला आदर्श तलाठी पुरस्कार उमाकांत दत्तराम भांगे यांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व 5 हजार रुपयाचा धनादेश आणि प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे जिल्हा अग्निशामक दलाचे अधिकारीकर्मचारी  ज्ञानेश्वर सुर्यवंशी व निलेश निवृत्ती काबंळे यांना उत्कृष्ठ कामगिरी केल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. 

 

जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह राज्यगीत सादर केले.  यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीतानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. परेड कमांडर संकेत सतीश गोसावी  सेकंड परेड कमांडर विजयकुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीस दल, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, दंगा नियंत्रण पथक, गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, राष्ट्रीय छात्रसेना,  पोलीस बॅन्ड पथक, डॉग स्काड,  मार्क्स मॅन वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वज्र वाहन, बुलेट रायडर, मिनी रेस्क्यू फायर टेंडर, अग्नीशामक वाहन, 108 रुग्णवहिका यांचा पथसंचलनात सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. तत्पूर्वी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा आयुक्त कार्यालयात आज ध्वजारोहण संपन्न झाले.

 

तसेच पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडून जाहिर केलेले पुरस्कार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आज सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. दिलीप पुनमचंद जाधव, दहशतवाद विरोधी पथक नांदेड, पंढरीनाथ मुदीराज, वाचक शाखा, विक्रम बालाजीराव वाकडे, ग्रामीण पोलीस स्टेशन, संतोष विश्वनाथ सोनसळे, पोलीस मुख्यालय नांदेड, मो. असलम मो. हनिफ, एटीबी नांदेड, सिद्धार्थ पुरभाजी हटकर, नागरी हक्क संरक्षण नांदेड, दिनेश पारप्पा वसमतकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ  देवून सन्मानित करण्यात आले.

000000












वृत्त क्र. 396

 जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता,

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 30 :- जिल्ह्यात आज ३० एप्रिल  व उद्या 1 मे 2024 रोजी काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.  

उन्हाचा कडाका वाढल्याने प्रादेशिक हवामान विभागाकडून जिल्ह्यात आज ३० एप्रिल व उद्या 1 मे 2024 रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतातहे लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी व उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

उष्णतेच्या लाटेदरम्यान लहान मुलं व वृद्ध यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घेताना या काळात सैलहलकेफिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत. हलका आहार घ्यावाफळे आणि सलाद सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे.  पुरेसे पाणी प्या. उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल/छत्री/टोपी/बूट/चप्पल घालूनच घराबाहेर पडावे. प्रवास करताना पिण्याच्या पाण्याची बाटली आपल्याजवळ बाळगावी. शक्य असल्यास थंड पाण्याने आंघोळ करावी.  घराबाहेरील उपक्रम/मैदानी उपक्रमा दरम्यान थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घेत चला व विश्रांतीची वारंवारता वाढवावी.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उष्माघाताची पुढील प्रमाणे लक्षणे आढळल्यास काळजी घ्यावी. डोकेदुखीतापउलट्याजास्त घाम येणे आणि बेशुध्द पडणेअशक्तपणा जाणवणेशरीरात पेटके येणेनाडी असामान्य होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवाव्यक्तीचे कपडे सैल करा. त्याला द्रव पदार्थ जसे पाणीओ.आर.एस.फळांचा रस यापैकी एक पाजा. चहा किंवा कॉफी देण्याचे टाळा. तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवा. बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा आणि वैद्यकीय सल्ला घ्या. अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच अशी कामे करा. नागरिकांनी वरील काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

0000

वृत्त क्र. 395

 वाढत्या तापमानात उष्माघातापासून

बचावासाठी आरोग्याकडे लक्ष द्या : जिल्हा आरोग्य अधिकारी

नांदेड दि. 29 :- मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. राष्ट्रीय हवामान विभागाकडे ३ एप्रिल 2024 रोजी देशातील पश्चिम राजस्थानउत्तर पश्चिम मध्य प्रदेशविदर्भउत्तर गुजरात व मराठवाड्यात सर्वाधिक तापमानाची ४१ ते ४३°C नोंद झाल्याचे आढळून आले आहे. तसेच अकोला येथे ४४°C ही देशातील सर्वाधिक तापमाणाची नोंद करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या पुढच्या पाच दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये सुध्दा तापमान वाढ कायम राहण्याचे संकेत आहेत. नागरिकांमध्ये तापमानवाढउष्णतेची लाट याबाबत जागरुकता निर्माण होणे गरजेचे असूनयासाठी सर्वसामान्य लोकांना संभाव्य तापमानवाढीचे संकेत लक्षात यावेत यासाठी कलर कोडींगचा वापर हवामान विभागाकडून केला जातो.

 उदा. पांढरा रंग सर्वसामान्य दिवस (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा कमी तापमान)पिवळा अलर्ट उष्ण दिवस (जवळपास नेहमीच्या कमाल तापमानाएवढे तापमान)केशरी अलर्ट उष्णतेची मध्यम स्वरुपाची लाट (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा 4 ते 5 डिग्री सेल्सियस जास्त तापमान)लाल अलर्ट अत्यंत उष्ण दिवस (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा 6 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान) उष्माघात होऊ नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहीले पाहीजे. उन्हाळयामध्ये उष्माघाताने रुग्णांवर उपाययोजना करण्यासाठी व मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असूनआरोग्य संस्थांमध्ये उष्माघात उपचार कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेऊन उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एम. शिंदे यांनी केले आहे.

उष्माघात होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत :-

उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजूरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या वॉयलर रुममध्ये काम करणेकाच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपडयांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उप्ततेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबध येण्याने उष्माघात होतो.

उष्माघातामध्ये पुढील लक्षणे दिसून येतात :-

थकवा येणेताप येणेत्वचा कोरडी पडणे, भुक न लागणेचक्करयेणेनिरुत्साही होणेडोके दुखणेपोटऱ्यात वेदना येणे अथवा पेटके येणे, रक्तदाब वाढणेमानसिक बैचैन व अस्वस्थताबेशुद्धावस्था इत्यादी.

उष्माघातामध्ये अतिजोखमीचे घटक खालील प्रमाणे आहेत :-

65 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती, 1 वर्षाखालील व 1 ते 5 वयोगटातील मुले, गरोदर माता, मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती, अतिउष्ण वात्तावरणामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती. 

उष्माघात होऊ नये या करीता काय करावे 

तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकीपातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्सछत्री/टोपीबुट व चपलांचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोकेमान व चेहरा झाकण्यात यावा, शरीरातील पाण्याचे प्रमाणे कमी होत असल्यास ओआरएसघरी बनविण्यात आलेली लस्सीतोरणीलिंबूपाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा. अशक्तपणास्थूलपणाडोकेदुखीसतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसल्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरे थंड ठेवण्यासाठी पडदेशटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात, पंखेओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, सुर्य प्रकाशाचा थेट सबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे, पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा, गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी, रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

उष्माघात होऊ नये या करीता काय करु नये

लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडदघट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.

प्रतिबंधक उपाय-

वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषुन घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे) वापरु नयेतसैल पांढ-या रंगांचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावापाणी भरपूर प्यावे. सरबत प्यावे. अधुन मधुन उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी. वरील लक्षणे सुरु होताच ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा. उन्हात बाहेर जाताना गॉगल्सडोक्यावर टोपीटॉवेलफेटाउपकरणेयांचा वापर करावा.

तालुकास्तरावरील व प्रा.आ.केंद्रावरील उष्माघात नियंत्रण कक्ष:

जिल्हयात एकुण 14 ग्रामीण रुग्णालये व 6 उपजिल्हा रुग्णालय व तसेच जिल्हयात एकुण 68 प्राथमिक आरोग्य केंद्र असुन एकुण 379 उपकेंद्र आहेत. ग्रामीण रुग्णालयउपजिल्हा रुग्णालय व प्रा.आ.केंद्र स्तरावर उष्माघात नियत्रंण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

उपचार-

रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावेखोलीत पंखेकुलर ठेवावे अथवा वातानुकूलित खोलीत ठेवावे. रुग्णांच्या शरीराचे तापमानात खाली आणण्याचा दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...