Friday, July 5, 2024

 वृत्त क्र. 563

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 9 व 10 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड, दि. 5 जुलै :- जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व ग्रामीण टेक्नीकल ॲड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपूरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 9 व बुधवार 10 जुलै 2024 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ग्रामीण टेक्नीकल ॲड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपूरी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 9 व 10 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र, झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी कागदपत्रे सोबत आणावेत. या मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
00000

 


  ( कृपया सोबतच्या वृत्तास वृत्तपत्रातून प्रसिद्धी द्यावी ही विनंती.)

वृत्त क्र. 562

महिलांनो ! “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” 
योजनेसाठी “नारी शक्ती दूत ॲप” डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा ; सोमवारपासून गावांमध्ये शिबीर
     
नांदेड, दि. 5 जुलै :- राज्य शासनाने “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक केला आहे. त्यासाठी कोणताही ॲनरॉईड मोबाईलवर नारी शक्ती दूत ॲप सहजरित्या डाउनलोड केल्या जाते. यावर आपला अर्ज दाखल करावा. ऑनलाईन अर्जामुळे मध्यस्थांकडून पैशांची मागणी होणार नाही व कोणतीही फसवणूक होणार नाही. ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांना मदत करण्यासाठी सोमवारपासून गावागावात शिबीर सुरू होतील. यामध्ये मागेपुढे होऊ शकते. मात्र त्यासाठी गोंधळ, गडबड करू नये. प्रशासनाकडून सर्व पात्र महिलांना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे नांदेड जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज यासंदर्भात सर्व तहसिलदार, सर्व मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी तसेच यासंदर्भातील सर्व यंत्रणेतील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. अंगणवाडी सेविकेजवळ, नगरपालिकेमध्ये शहरासाठी प्रभाग कार्यालयामध्ये अर्ज उपलब्ध आहेत. मात्र हे सर्व अर्ज ऑनलाईनच भरावे लागणार आहेत. या ऑनलाईन अर्ज भरण्याचा तणाव कोणी घेऊ नये. प्रत्येकांचा अर्ज भरणे शासनाची जबाबदारी आहे. सोमवारपासून गावांमध्ये या प्रक्रियेला सुरूवात होईल. गावातील सुशिक्षित तरुणांनी सरपंचापासुन तर सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी, महाविद्यालयीन तरुणांनी हा ॲप डाऊनलोड करण्यासाठी, अर्ज अपलोड करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

अर्ज ऑनलाईनच का ?
या योजनेतील अर्ज भरतांना अन्य कागदपत्रांसोबतच छायाचित्र काढणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे हा अर्ज ऑनलाईन भरणे अनिवार्य आहे. साधा अर्ज, ऑफलाइन अर्ज भरला तरी संबंधित कर्मचाऱ्यांना अर्जदाला बोलवून त्याचा समक्ष फोटो काढावा लागणार आहे. त्यामुळे शक्य झाल्यास गावातील तरुणांनी या ॲपवर अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या भगिंनींना मदत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

अधिकृत अर्ज कोणता ?
ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे तरीही अनेकजण ऑफलाईन अर्ज भरत आहेत. हा अर्ज भरतांना ज्या अर्जांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र लावलेले आहेत तो अर्ज अधिकृत आहे. काही ठिकाणी अनधिकृत अर्ज पुढे येऊ शकतात. चुकीची माहिती भरली जाऊ शकते. त्यामुळे अधिकृत अर्ज भरण्यात यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांनी अर्ज करू नये
शासनामार्फत महिलेला दरमहिन्याला दीड हजार रूपये बँक खात्यामध्ये थेट दिले जाणार आहे. संजय गांधी निराधार योजनेमध्ये देखील दीड हजार रूपये महिना दिला जातो. त्यामुळे ज्या महिला या योजनेतून यापूर्वीच ही रक्कम मिळवत आहेत त्यांचा अर्ज रद्द होईल. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांनी अर्ज करू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मुदत 31 ऑगस्ट पर्यंत
या योजनेची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मी मागे राहिली, मला लाभ मिळणार नाही अशा पद्धतीची भिती कोणत्याही महिलेने मनात आणू नये. गोंधळ करू नये. सर्वांना जुलै महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे. ऑगस्टमध्ये देखील अर्ज दाखल झाला तरीही जुलै महिन्यापासून लाभ मिळणार आहे. ऑनलाईन असल्यामुळे कोणताही अर्ज परिपूर्ण व अटी व शर्ती पूर्ण असल्याशिवाय अपलोड होणार नाही. कोणत्याही एजंटची मदत घ्यायची गरज नाही. गोंधळ, गडबड करण्याची गरज नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0000

  वृत्त क्र. 561

हिंगोली समाज कल्याण सहायक आयुक्तांना मारहाण

नांदेडच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निषेध
     
नांदेड, दि. 5 जुलै :- हिंगोली येथील समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांना घरात घुसून मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून तसेच या प्रकरणात सक्त कारवाई करण्याची मागणी नांदेड जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना केली.

आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी एकत्रीत येऊन हा निषेध नोंदविला. हिंगोली सहायक आयुक्त यादव गायकवाड यांना 4 जुलै रोजी रविंद्र वाडे या व्यक्तीने रात्री घरात घुसून मारहाण केली. मोबाईलवर केलेल्या व्हॅटसॲप मॅसेज व दूरध्वनीनुसार कंत्राटी भरतीमध्ये आपण सांगितलेले दोन उमेदवार का  घेतले नाही यासाठी जाब विचारून घरात घुसून मारहाण केली. यामध्ये जखमी झालेले सहायक आयुक्त यादव गायकवाड यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी आज समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी व समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रीत येऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले.
0000


 वृत्त क्र. 560 

महिलांच्या योजना, कायदे आणि संरक्षण संदर्भात

जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत आढावा  

     
नांदेड, दि. 5 जुलै :- नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. जिल्ह्यातील विद्यार्थीनीपासून ते गृहिणी पर्यंत, परितक्तापासून कामगार महिलांपर्यंत सर्वांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी योजनांची सर्वदूर प्रसिद्धी व लाभ देण्याचे लक्षांश वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

 
यासोबतच राज्य शासनाच्या  “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामुहिक सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची पुनर्रचित बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली 4 जुलै रोजी करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

 
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. पी. काळम, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्रीमती रेणुका तम्मलवार, तसेच जिल्ह्यातील प्रांत अधिकारी हे ऑनलाईनद्वारे उपस्थित होते.
 
या बैठकीमध्ये महिलांसाठी असणाऱ्या वैयक्तिक व सामूहिक योजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये हुंडा पद्धतीच्या विरोधात जनजागृती करणे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणे, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाच्या प्रकरणांचा आढावा, महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावा, देहविक्री करणाऱ्या महिलांच्या विविध मागण्यांचा आढावा, अपराधी परिविक्षा अधिनियमाची चर्चा, मिशन शक्ती, एक छत्री योजनेंतर्गत योजनांची चर्चा, पोलीस स्टेशन आवारात समुपदेशन केंद्रांचा आढावा, महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम, राज्याचे मिशन वात्सल्य अभियान संदर्भात चर्चा करण्यात आली.

 
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्याबाबत जिल्हयातील महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय विविध योजना लोकाभिमुख करुन त्याची अंमलबजावणी करावी. महिला व बाल विकास विभागाच्या विविध बैठकीत वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी निश्चित करुन महिला व बालकांच्या संदर्भात योग्य ते जबाबदारीने काम करण्याच्या सुचना संबंधित विभागाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केल्या.
 
प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. रंगारी यांनी केले तर विविध विषयांच्या अनुषंगाने सादरीकरण जिल्हा बालसंरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे यांनी केले. बैठकीस समितीतील अशासकीय सदस्य, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

00000



 वृत्त क्र. 559

कृषि विभागाचे विविध कृषि पुरस्कार

 

 · कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेले

शेतकरीव्यक्तीगटसंस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

नांदेडदि. 5 जुलै :- राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत सन 2023 या वर्षांमध्ये कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तीगटसंस्था यांच्याकडून विविध कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकरीगटसंस्थाव्यक्तींनी कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेतअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे  यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्याकृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्तीसंस्थागटांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारवसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कारजिजामाता कृषिभूषण पुरस्कारसेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कारउद्यान पंडित पुरस्कारवसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कारवसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारयुवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारीकर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. या विविध कृषि पुरस्काराचे प्रस्ताव तयार करण्याबाबतच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावाअसेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्र. 558

 

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या

इयत्ता 5 व 8 वीसाठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीस अंतिम मुदतवाढ

 

नांदेडदि. 5 जुलै :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्जासाठी  अंतिम मुदतवाढ 15 जुलै पर्यंत देण्यात आली आहे. अर्ज 5 जुलै ते 15 जुलै 2024 रात्री 11.59 वाजेपर्यंत या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीत प्रवेश अर्ज करावेतअसे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या प्र. सचिव शैलेंद्र पाटील यांनी  केले आहे. 

 

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा  तपशील पुढील प्रमाणे आहे. ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी शुक्रवार 5 ते सोमवार 15 जुलै 2024 रोजीच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत तर शनिवार 6 ते शुक्रवार 19 जुलै 2024 या कालावधीत विद्यार्थ्यांना  मूळ अर्जविहित शुल्क व मूळ कागदपत्रे  अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे लागतील. बुधवार 24 जुलै 2024 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्कमूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करतील. या कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी 8 वीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी http:/msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरूवात करावीअसेही आवाहन करण्यात आले आहे. 

00000

 वृत्त क्र. 557

 

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

     

नांदेडदि. 5 जुलै :- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षणकला,  सांस्कृतिक कार्यखेळ नाविन्यपूर्ण शोधसामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव https://awards.gov.in या संकेतस्थळावर 31 जुलै 2024 पर्यंत करावेतअसे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

 

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. हे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 31 जुलै 2024 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षणकलासांस्कृतिक कार्यखेळ नाविन्यपूर्ण शोधसामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्यावतीने राज्य सरकारकेंद्र शासित प्रदेशजिल्हाधिकारी/जिल्हादंडाधिककारीपंचायत राज्य संस्थानागरी स्वराज्य संस्थाशैक्षणिक संस्था आदी अर्ज करू शकतात. राज्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवाहन महिला व बाल विकास आयुक्तालयाने केले आहे.

0000

 वृत्त क्र. 556 

जिल्ह्यात जमावबंदीशस्त्रबंदी आदेश लागू

 

 नांदेडदि. 5 जुलै :- नांदेड जिल्ह्यात 6 जुलै 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 20 जुलै 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहेअशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 6 जुलैच्या सकाळी 6 वाजेपासून ते 20 जुलै 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारीशासकीय कर्मचारीविवाहअंत्ययात्राधार्मिक कार्यक्रमयात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठीसभामिरवणुकामोर्चा काढणेध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...