Friday, July 5, 2024

 वृत्त क्र. 563

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 9 व 10 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड, दि. 5 जुलै :- जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व ग्रामीण टेक्नीकल ॲड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपूरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 9 व बुधवार 10 जुलै 2024 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ग्रामीण टेक्नीकल ॲड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपूरी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 9 व 10 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र, झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी कागदपत्रे सोबत आणावेत. या मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...