Friday, March 13, 2020


जलजागृती सप्ताहाचे कार्यक्रम रद्द
नांदेड दि. 13 :- जलजागृती सप्ताह 16 मार्च ते 22 मार्च 2020 पर्यंत साजरा करण्याचे व 16 मार्च 2020 रोजी सप्ताहाचे उदघाटन बाबत जिल्हाधिकारी नांदेड यांनी आदेशित केले होते. परंतु  नांदेड जिल्ह्यात कारोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी  आपती व्यवस्थापन कायदा लागू  करण्यात आल्यामुळे 16 मार्च ते 22 मार्च 2020 दरम्यान जलजागृती सप्ताह निमीत होणारे सर्व सामुहीक, सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे  कार्यकारी अभियंता नांदेड पाटबंधारे मंडळ (दक्षिण) नांदेड यांनी कळविले आहे.
00000


हरवलेल्या व्यक्तीचा शोध
नांदेड दि. 13 :- जुना मुजामपेठ नांदेड येथील शफी अहमद (वय 65) व्यवसाय मजुरी हे दोन वर्षापासून डोक्यावर परिणाम झाल्याने ते वेड्याच्या भरात 1 मार्च रोजी रात्री 8 च्या सुमारास घरातून निघून गेले आहेत. त्यांचा शोध घेतला असता मिळून आले नाहीत. त्यांचा रंग गोरा असून उंची साडेपाच फुट, भाषा हिंदी, मराठी, उर्दु येते तर पोशाख गुलाबी चौकडी शर्ट कते रंगाचा पॅन्ट पायात स्लीपर चप्पल अशी आहे. या हरवलेल्या व्यक्तीबाबत अधिक माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस स्टेशन नांदेड (ग्रा) पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
000000


जिल्हा परिषदेचे मंगळवारी
अर्थसंकल्पनीय विशेष सर्वसाधारण सभा
नांदेड दि. 13 :- जिल्हा परिषद नांदेडची अर्थसंकल्पनीय विशेष सर्वसाधारण सभा मंगळवार 17 मार्च 2020 रोजी दुपारी 1 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सचिव तथा कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) जिल्हा परिषद नांदेड यांनी दिली आहे.
0000


देगलूर न्यायालयाच्या भुमीपूजनाचा
कार्यक्रम अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आला
नांदेड दि. 13 :- प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड यांच्या आदेशानुसार देगलूर जिल्हा नांदेड येथील न्यायालयाच्या भुमीपूजनाचा रविवार 15 मार्च 2020 रोजी आयोजित कार्यक्रम अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती प्रबंधक जिल्हा न्यायालय नांदेड यांनी दिली आहे.
000000


किनवट तालुक्यातील महिलांसाठी
बंजारा विव्हिंग आर्टवर आधारीत
तीस दिवसाचे मोफत प्रशिक्षण
नांदेड दि. 13 :-  महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ द्वारा पुरस्कृत आणि मिटकॉन नांदेड कार्यालयामार्फत आयोजित किनवट तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार महिलांसाठी बंजारा विविंग आर्टवर आधारित 30 दिवसीय निवासी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात 16 मार्च 2020 ते 15 एप्रिल 2020 या कालावधीत नांदेड येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात बंजारा विविंग आर्टमधील तंत्र, विविध टाक्याचे प्रकार, टाक्याचे संयोजन व कामाची पद्धत, विविध आकृत्याचे रेखाटन व रंगसंगती, बंजारा विविंग आर्टसाठी आवश्यक विविध उपकरणांची माहिती, कापडाची निवड अशी तांत्रिक माहिती त्याच बरोबर विविध शासकीय योजनाची माहिती, शासनाचे औद्योगिक धोरण याची माहिती या प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज करण्यासाठी प्रशिक्षणार्थी किनवट तालुक्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे अशी आहे. प्रशिक्षणार्थीची नांदेड येथे निवासी राहण्याची तयारी असवी. त्याचबरोबर या प्रशिक्षणार्थीस 150 रुपये प्रति दिवस याप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे.
इच्छुक प्रशिक्षणार्थी शाळेचा दाखला, गुणपत्रक, रेशनकार्डची प्रत, पासपोर्ट छायाचित्र, आधारकार्ड, रहिवासी दाखला, जातीचा दाखला आदी माहितीसह मिटकॉन कन्सल्टन्सी ॲन्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. तळमजला उद्योग भवन इमारत, औद्योगिक वसाहत शिवाजीनगर, नांदेड येथे मुख्य व्यवस्थापक राहुल शेळके मो. 9764173848, 7020248518 व सहायक सुभाष जाधव मो. 9822740364 वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य व्यवस्थापक, मिटकॉन नांदेड यांनी केले आहे.
0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...