Friday, September 8, 2023

 अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेतील

उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिध्द


नांदेड, (जिमाका) दि. 8 :-  बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत पात्र स्थानिक रहीवासी असलेल्या महिला उमेदवाराकडून 10 जुलै 2023 पर्यत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने उमेदवारांची अंतिम निवड यादी http://nanded.gov.in  या संकेतस्थळावर तसेच कार्यालयीन नोटीस बोर्डवर 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.


निवड झालेल्या उमेदवारांनी मुळ कागदपत्राची तपासणी 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. http://nanded.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येणार आहे. तरी निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन नागरी नांदेडचे बाल विकास प्रकल्प अधिकारी वि.सि.बोराटे यांनी केले आहे.

00000

 इयत्ता दहावी व बारावी परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ठ

होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 8 :-  फेब्रु-मार्च-2024 च्या इयता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज फॉर्म नं. 17 ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे भरण्यासाठी कळविण्यात आले होते.  विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरण्याचा अंतिम मुदत सोमवार 11 सप्टेंबर 2023 पर्यत आहे.  माध्यमिक शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे शुक्रवार 15 सप्टेंबर 2023 पर्यत जमा करावी, असे लातूर विभागीय मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

 

इयत्ता 10 वीसाठी http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या  विद्यार्थ्यांचीनावनोंदणी करावी. इयत्ता 12 वीसाठी http://form17.mh-hsc-ac.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी. खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसून येत आहे. आपल्या परिसरातील जास्तीत जास्त शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे खाजगी फॉर्म नं. 17 भरुन घेण्यासाठी मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी त्यांच्या स्तरावरुन विविध माध्यमाद्वारे जनजागृती करुन जास्तीत जास्त विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात कसे येतील याबाबत प्रयत्न करावेत, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव यांनी केले आहे.

0000

 मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक

कार्यक्रम सादरीकरणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची 11 सप्टेंबरला निवड


युवकांनी सहभाग घेण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 8 :- मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठनांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात नांदेड शहरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांच्या विद्याथ्यामार्फत सादरीकरण करण्यात येणार आहे. या सादरीकरणात भाग घेण्यासाठी इच्छुक महाविद्यालयांनी सोमवार 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. ललित व प्रयोगजीवी कला संकुलस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठनांदेड येथे उपस्थित राहावेअसे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी केले आहे.

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या सादरीकरणासाठी कला प्रकारकालावधीकलावंत संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

 

§  समुह नृत्य (दहा संच)या कलाप्रकारात सादरीकरणाचा कालावधी मिनीटाचा असून कलावंत संख्या 10 आहे. 

§  एकल नृत्य (दहा संच) या कलाप्रकारासाठी मिनीटे कालावधी असून कलावंत संख्या 1   

     राहील. 

§  युगल नृत्य (दहा संच) या कलाप्रकारासाठी मिनीटे कालावधी असून कलावंत संख्या आहे. 

§  समुह गायन (दहा संच)यासाठी मिनिटांचा कालावधी असून कलावंत संख्या 10 आहे. 

§  सुगम गायन (दहा संच) साठी मिनीटे कालावधी असून  कलावंत संख्या आहे. 

§  एकपात्री  (दहा संच)या कलाप्रकारासाठी मिनीटाचा कालावधी असून कलावंत संख्या आहे.

 

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी महाविद्यालयांनी ललित व प्रयोगजीवी कला संकुलस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील समन्वयक डॉ. अनुराधा पत्की यांचा दूरध्वनी क्रमांक 7057344411 यांच्याशी संपर्क साधावा. यामध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ते मानधन देण्यात येणार आहे असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...