Tuesday, September 8, 2020

 

283 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

332 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 8 :- मंगळवार 8 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 283 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 332 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 89 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 243 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 523 अहवालापैकी  1 हजार 137 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 9  हजार 578 एवढी झाली असून यातील  6  हजार 117 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 66.15 टक्के एवढे झाले आहे. एकुण 3 हजार 129 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 36 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  

या अहवालात शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी सावरमाळ मुखेड येथील 62 वर्षाच्या एका महिलेचा मुखेड कोविड केंअर सेंटर येथे, सोमवार 7 सप्टेंबर रोजी पेठवडज कंधार येथील 62 वर्षाचा एका पुरुषाचा, गोकुळनगर नांदेड येथील 77 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, गोपाळचावडी नांदेड येथील 23 वर्षाची एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 276 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 2, मुखेड कोविड केंअर सेंटर 12, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 2, खाजगी रुग्णालयातून 3, कंधार कोविड केंअर सेंटर 1, बिलोली कोविड केंअर सेंटर 1, नायगाव कोविड केंअर सेंटर 11, औरंगाबाद येथे संदर्भीत केलेले 12, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 11, मुदखेड कोविड केंअर सेंटर 8, पंजाब भवन कोविड केंअर सेंटर नांदेड 162, किनवट कोविड केंअर सेंटर 6, हदगाव कोविड केंअर सेंटर 3, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 10, लोहा कोविड केंअर सेंटर 38, हैदराबाद येथे संदर्भीत केले 1 असे 283 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 44, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर 2, हिमायतनगर 1, किनवट 23, लोहा 1, उमरी 1, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 7, हदगाव 1, मुखेड 1, नायगाव 1, कंधार 3, परभणी 1, निजामाबाद 1 असे एकुण 89 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 104, बिलोली तालुक्यात 21,  देगलूर 2, किनवट 11, नायगाव 22, मुखेड 20, धर्माबाद 7, परभणी 2, नांदेड ग्रामीण 14, मुदखेड 14, लोहा 3, कंधार 10, हदगाव 4, माहूर 3, उमरी 4, यवतमाळ 2  असे  एकुण 243 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 129 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 266, एनआरआय व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 1 हजार 352, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 83, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 94, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 78, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 122,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 61, लोहा कोविड केअर सेंटर येथे 111, हदगाव कोविड केअर सेंटर 83, भोकर कोविड केअर सेंटर 33,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 54,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 115, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 44, मुदखेड कोविड केअर सेटर 31,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 76, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 49, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 53, उमरी कोविड केअर सेंटर 52, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 346 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 7, निजामाबाद येथे 2 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 4 बाधित, लातूर येथे 1 बाधित  संदर्भित झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 57 हजार 985,

निगेटिव्ह स्वॅब- 46 हजार 49,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 332,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 9 हजार 578,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 21,

एकूण मृत्यू संख्या- 276,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 6 हजार 117,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 129,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 588, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 36.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...