Wednesday, August 12, 2026

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

शेतकरी बांधवानो, आपले सरकार सेवा केंद्रावरील आधार प्रमाणीकरणाची कार्यपद्धती जाणून घ्या.

 ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या लाभ वितरणास प्रारंभ !

६.२२ लाख पात्र शेतकरी; ₹५,०२८ कोटींचा कर्जमुक्ती लाभ

वृत्त क्रमांक

रॅगिंग प्रतिबंधक कायद्याबाबत विद्यापीठात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

नांदेड, दि. १२ ऑगस्ट : प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष  नरेंद्र के. ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनानुसार आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा, १९९९ च्या अनुषंगाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर तसेच प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे लोक अभिरक्षक श्री. शकील, श्री. मुधोळकर आणि दादासाहेब वैद्य यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा, त्यातील तरतुदी तसेच रॅगिंगविरोधी उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

प्रमुख व्याख्याते म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगचे दुष्परिणाम, कायदेशीर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केले.

00000



 




वृत्त क्रमांक

पीक नोंदणीसाठी सहायकांना सहकार्य करा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

ई-पीक पाहणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची नाळेश्वर व लिंबगाव मंडळातील शिवारात भेट

नांदेड, दि. १२ ऑगस्ट : ई-पीक पाहणी (DCS) हा शासनाचा महत्त्वपूर्ण व प्राधान्यक्रमाचा प्रकल्प असून त्याची १०० टक्के प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा त्रास कमी करून सातबारावरील पिकांची ऑनलाइन नोंद अचूकपणे होण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक नोंदणीसाठी नियुक्त सहायकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

खरीप हंगाम २०२६-२७ पासून डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्यात येत आहे. ११ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर 2026 या कालावधीत ही कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. गट व सर्वे क्रमांकनिहाय प्रत्यक्ष पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून पीक नोंदणी अद्ययावत करण्यात येत आहे. या माहितीचा उपयोग विविध कृषी योजना, पीकविमा, आपत्ती मदत, कृषी सांख्यिकी तसेच ॲग्रीस्टॅकसाठी करण्यात येणार आहे.

ई-पीक नोंदणीचे महत्त्व व आवश्यकतेबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज नाळेश्वर मंडळातील सोमेश्वर आणि लिंबगाव मंडळातील वरखेड शिवाराला भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करून शेतकऱ्यांना या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६३९ सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाचे कर्मचारी, CSC चालक तसेच ग्रामस्तरावर मानधन तत्त्वावर कार्यरत अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

यावेळी तहसीलदार विपीन पाटील, मंडळ अधिकारी शिवानंद स्वामी, मधुकर फुलवळे, ग्राम महसूल अधिकारी गजानन वळगे, महेश जोशी, मारोती कदम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना

ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या लॉगिनमधून गावांचे काम वाटप अर्थात टास्क अलोकेशन तातडीने पूर्ण करावे. टास्क अलोकेशन करताना गावाच्या नकाशानुसार प्रत्यक्ष पाहणी करून सहायकास सोयीचे होईल, याची खात्री करूनच गटांचे वाटप करावे.

सहायकांनी स्थळभेटीपूर्वी मोबाईल ॲप रेंज असलेल्या ठिकाणी रिफ्रेश अथवा अपडेट करून त्यानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

00000





वृत्त क्रमांक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शासकीय वैद्यकीय रुग्णालय वजिराबाद

मार्गावर 13 ते 15 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश  लागू

नांदेड दि. 12 ऑगस्ट :- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार 15 ऑगस्ट रोजी शासकीय ध्वजारोहण समारंभ सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीकोनातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-जिल्हाधिकारी कार्यालय-महात्मा गांधी यांचा पुतळा ते तहसिल कार्यालय नांदेड, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय तथा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय वजिराबाद नांदेड या मार्गावर 13 ऑगस्ट रोजीचे सकाळी 9 वाजेपासून ते 15 ऑगस्ट 2026 च्या  24.00  वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चा, रॅली, सत्यागृह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे. 

या मार्गावर शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी या काळात उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चा, रॅली, सत्यागृह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे. संबंधीतावर नोटीस बजावुन त्यांचे म्हणने ऐकुन घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहीता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे.

00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकरी बांधवानो, आपले सरकार सेवा केंद्रावरील आधार प्रमाणीकरणाची कार्यपद्धती जाणून घ्य...