Thursday, March 26, 2026
नमस्कार नांदेडकर... मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड.
आपल्या #नांदेड शहरात खरच #पेट्रोल चा तुटवडा आहे का ? तर मित्रानो असे काहीही नाही. जर तुम्हाला असा मेसेज कुणी पाठवले असतील तर त्या निव्वळ अफवा आहेत. मग पेट्रोल पंप बंद का होत आहेत ? पंप बंद होण्याचे कारण म्हणजे जो व्यक्ती नियमित मर्यादित पैशांचे पेट्रोल डिझेल खरेदी करतो तो व्यक्ती टँक फुल करून घेतोय. यालाच पॅनिक पर्चेस म्हणतात. यामुळे पंपावर गर्दी होत आहे जी सांभाळण्यासाठी पंपावर पुरेशी यंत्रणा नाही. पोलिस फक्त संरक्षण करू शकतात पण पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या मर्यादा आहेत. पॅनिक पर्चेस मुळे टँकर येईपर्यंत स्टॉक संपतो. #इंधन पुरवठा नियमात बदल पेट्रोल पंपाना पेट्रोल/डिझेल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आता अँडव्हान्स पेमेंट सिस्टिम सुरू केली आहे यामुळे टँकर येण्यासाठी थोडा वेळ लागतोय पूर्वी पेट्रोल/डिझेल टँकर मागवल्यावर 4 दिवसांत पेमेंट केले जायचे सध्या यात बदल झाले आहेत परिणामी टँकर अँडव्हान्स पेमेंट नंतर भरून निघतो. सध्या जिल्ह्यात पेट्रोल/ #डिझेल उपलब्ध आहे का तर मित्रानो नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोल/डिझेल उपलब्ध आहे. फक्त पंपावर ग्राहकांनी पॅनिक खरेदी बंद केली आणि अनावश्यक गर्दी कमी केली तर संपूर्ण जिल्ह्याला अडचण येणार नाही. म्हणून मित्रानो अशा परिस्थितीत आपण आपल्याला साथ देऊया अफवांवर अविश्वास दाखवू या. धन्यवाद...
नमस्कार नांदेडकर... मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड. आपल्या #नांदेड शहरात खरच #पेट्रोल चा तुटवडा आहे का ? तर मित्रानो असे काहीही नाही....
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...
