Friday, August 21, 2020

 वृत्त क्र. 782  

44 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

151 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 21 :- शुक्रवार 21 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 44 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 151 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 74 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 77 बाधित आले. 

आजच्या एकुण 861 अहवालापैकी  638 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 4 हजार 821 एवढी झाली असून यातील 2 हजार 847 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 771 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 136 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  

गुरुवार 20 ऑगस्ट रोजी वाजेगाव नांदेड येथील 41 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे व शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी कैलासनगर नांदेड येथील 58 वर्षाच्या एका महिलेचा, कंधार तालुक्यातील नवीन मोंढा येथील 56 वर्षाचा एक पुरुष, चिखली खु. नांदेड येथील 66 वर्षाचा एक पुरुष व शक्तीनगर नांदेड येथील 68 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर गुरुद्वारा गेट नं. 4 बडपुरा नांदेड येथील 53 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्य झाला.  

आज बरे झालेल्या 44 कोरोना बाधितांमध्ये आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड सेंटर येथील 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 1, बिलोली कोविड सेंटर 1, कंधार कोविड सेंटर 4, किनवट कोविड सेंटर 2, आयुर्वेदिक शासकीय कोविड रुग्णालय सेंटर 1,  देगलूर कोविड सेंटर 18, पंजाब भवन कोविड सेंटर 2, मुखेड कोविड सेंटर 13, नायगाव कोविड केअर सेंटर 1 असे एकूण 44 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.    

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 18, देगलूर तालुक्यात 17, हदगाव तालुक्यात 5, मुखेड तालुक्यात 18, लातूर 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 12, हिंगोली एक असे एकुण 74 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 27, बिलोली तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 2, मुखेड तालुक्यात 9, मुदखेड तालुक्यात 2, उमरी तालुक्यात 15, अर्धापूर तालुक्यात 3, भोकर तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 9, धर्माबाद तालुक्यात 5, हिंगोली 2 असे एकुण 77 बाधित आढळले.  

जिल्ह्यात 1 हजार 771 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 178, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 851, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 45, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 41, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 37, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 100,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 55, लोहा कोविड केअर सेंटर येथे 54, हदगाव कोविड केअर सेंटर 31, भोकर कोविड केअर सेंटर 18,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 28, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 103, किनवट कोविड केअर सेंटर येथे 10, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 8, मुदखेड कोविड केअर सेटर 24,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 9, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 23, बारड कोविड केअर सेंटर 1, उमरी कोविड केअर सेंटर 20, खाजगी रुग्णालयात 129 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 4, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 227,

घेतलेले स्वॅब- 33 हजार 303,

निगेटिव्ह स्वॅब- 26 हजार 533,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 151,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 821,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 49,

एकूण मृत्यू संख्या- 168,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 847,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 771,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 270, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 136.  

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 वृत्त क्र. 781  

शासकीय मस्त्यबीज केंद्र मनार व करडखेड

येथे मत्स्यबीज विक्रीसाठी उपलब्ध

नांदेड, (जिमाका) दि. 21:- जिल्ह्यातील ज्या शेततळीधारकांना मत्स्यबीज संचयन करावयाचे आहे. त्या शेततळीधारकांनी सप्टेंबर अखेरपर्यत मत्स्यबीज खरेदीसाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) नांदेड यांनी केले आहे.

 शासकीय मत्स्यबीज केंद्र मनार / करडखेड या दोन केंद्रामध्ये मत्स्यबीज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्या शेततळी धारकांना मत्स्यबीज खरेदी करावयाचे आहे, त्यांनी नांदेड सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-252323 व देगलूर तालुक्यातील करडखेड येथील मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी र. रा. बादावार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8329173462 व कंधार तालुक्यातील मनार बारुळ मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी डॉ. सू.स. कोल्हे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9860082482 यांच्याशी संपर्क साधावा, असेही सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 780  

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 21 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना अर्ज स्विकारण्यासाठी मुदतवाढ सोमवार 31 ऑगस्ट 2020 पर्यंत दिली आहे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनीमादीग, मांदीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादीगा व मादगी या 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी 2019-20 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व 2020-21 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी, बारावी, पदवी पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमात विद्यार्थी, विद्यार्थींना सरासरी 60 टक्के किंवा ज्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील अशा गुणवंत विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आली आहेत. 

जेष्ठता व गुणक्रमांकानुसार 3 ते 5 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमात विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रक, दोन फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादीसह दोन प्रतीत आपले पुर्ण पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथे मुदतीत 9 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. परंतु पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमाचा निकाल लागला नसल्यामूळे या योजनेचे अर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यत स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे असेही आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना  

प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज  

नांदेड (जिमाका), दि. 21 :- धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली असून सन 2020-21 या वर्षासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज   केंद्रशासनाच्या  www.scholarships.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रि-मॅट्रि शिष्यवृत्ती नवीन विद्यार्थी    नुतनीकरण  विद्यार्थ्यांचे ऑनलाईन  अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत  आहे. या योजनेचा जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यामिक)  जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

 

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार ही योजना 23 जुलै 2008 च्या शासन निर्णयानुसार सन 2008-09 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही शिष्यवृत्ती योजना मुस्लीम, ख्रिश्चन,शीख, पारसी, बौद्ध व जैन या धार्मिक अल्पसंख्याक इयत्ता पहिली ते दहावी वीच्या शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित माध्यमांच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 

सन 2019-20 या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. अशा विद्यार्थ्यांचे  अर्ज  रीनिवल स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत. तसेच नवीन, इच्छुक  विद्यार्थ्यांचे  अर्ज फ्रेश स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत. याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास शेख रुस्तुम शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड मो.न. ९६८९३५७२१२ यांच्याशी संपर्क साधावा. 

मागीलवर्षी ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वतःच्या शाळेची  नोंदणी केलेली नाही. अशा शाळेची नोंदणी प्रक्रिया विहित मुदतीत तात्काळ करुन घेण्यात यावी. जर एखाद्या शाळेची नोंदणी प्रक्रिया विहित मुदतीत मुख्याध्यापक यांनी  केली नाही. तर त्या शाळेला अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे  प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती साठी NSP २.०  पोर्टल वर अर्ज भरता येतील. परंतु त्या अर्जाची पडताळणी शाळांना करता येणार नाही. त्यामुळे हे अर्ज जिल्हास्तरावर पुढील प्रक्रियेसाठी जाणार नाहीत. त्यामुळे अशा शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या  लाभापासून वंचित राहणार  आहेत. त्यामुळे शाळांच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. 

सन 2020-21 साठी एनएसपी 2.0 पोर्टलवर पुढीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे  प्रवेश शुल्क, शैक्षणिक शुल्क व परिरक्षण भत्त्याची रक्कम अर्जामध्ये विद्यार्थ्यांना भरता येणार नाही. शाळांनी त्यांच्या लॉगीन मध्ये ॲड अपडेट डिटेल्स या मेनू मधून वर्गनिहाय विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्षात आकारण्यात येणाऱ्या शुल्काची माहिती भरावयाची आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जाची शाळास्तरावर पडताळणी होत असताना संबंधित विद्यार्थ्यांच्या शुल्काबाबत भरावयाची माहिती आपोआप अपडेट होईल. जर शाळांनी ॲड अपडेट डिटेल्स या मेनूमध्ये शुल्काची माहिती भरली नसेल, तर शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये फीबाबतच्या रकान्यामध्ये माहिती संस्थावर अर्ज पडताळणी करताना भरावयाची आहे. या रक्कमेबाबत अर्जात नोंद करणे व यात बदल करण्याचा शाळांना पूर्ण अधिकार असेल.

शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेवून याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी आज प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

00000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...