Friday, August 21, 2020

धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना  

प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज  

नांदेड (जिमाका), दि. 21 :- धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली असून सन 2020-21 या वर्षासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज   केंद्रशासनाच्या  www.scholarships.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रि-मॅट्रि शिष्यवृत्ती नवीन विद्यार्थी    नुतनीकरण  विद्यार्थ्यांचे ऑनलाईन  अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत  आहे. या योजनेचा जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यामिक)  जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

 

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार ही योजना 23 जुलै 2008 च्या शासन निर्णयानुसार सन 2008-09 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही शिष्यवृत्ती योजना मुस्लीम, ख्रिश्चन,शीख, पारसी, बौद्ध व जैन या धार्मिक अल्पसंख्याक इयत्ता पहिली ते दहावी वीच्या शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित माध्यमांच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 

सन 2019-20 या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. अशा विद्यार्थ्यांचे  अर्ज  रीनिवल स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत. तसेच नवीन, इच्छुक  विद्यार्थ्यांचे  अर्ज फ्रेश स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत. याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास शेख रुस्तुम शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड मो.न. ९६८९३५७२१२ यांच्याशी संपर्क साधावा. 

मागीलवर्षी ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वतःच्या शाळेची  नोंदणी केलेली नाही. अशा शाळेची नोंदणी प्रक्रिया विहित मुदतीत तात्काळ करुन घेण्यात यावी. जर एखाद्या शाळेची नोंदणी प्रक्रिया विहित मुदतीत मुख्याध्यापक यांनी  केली नाही. तर त्या शाळेला अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे  प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती साठी NSP २.०  पोर्टल वर अर्ज भरता येतील. परंतु त्या अर्जाची पडताळणी शाळांना करता येणार नाही. त्यामुळे हे अर्ज जिल्हास्तरावर पुढील प्रक्रियेसाठी जाणार नाहीत. त्यामुळे अशा शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या  लाभापासून वंचित राहणार  आहेत. त्यामुळे शाळांच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. 

सन 2020-21 साठी एनएसपी 2.0 पोर्टलवर पुढीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे  प्रवेश शुल्क, शैक्षणिक शुल्क व परिरक्षण भत्त्याची रक्कम अर्जामध्ये विद्यार्थ्यांना भरता येणार नाही. शाळांनी त्यांच्या लॉगीन मध्ये ॲड अपडेट डिटेल्स या मेनू मधून वर्गनिहाय विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्षात आकारण्यात येणाऱ्या शुल्काची माहिती भरावयाची आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जाची शाळास्तरावर पडताळणी होत असताना संबंधित विद्यार्थ्यांच्या शुल्काबाबत भरावयाची माहिती आपोआप अपडेट होईल. जर शाळांनी ॲड अपडेट डिटेल्स या मेनूमध्ये शुल्काची माहिती भरली नसेल, तर शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये फीबाबतच्या रकान्यामध्ये माहिती संस्थावर अर्ज पडताळणी करताना भरावयाची आहे. या रक्कमेबाबत अर्जात नोंद करणे व यात बदल करण्याचा शाळांना पूर्ण अधिकार असेल.

शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेवून याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी आज प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...