Friday, January 5, 2024

 वृत्त क्र. 18 

महासंस्कृती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी

जिल्ह्यातील कलावंता समवेत सोमवारी बैठकीचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती इ. बाबी जनसामान्यापर्यत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

 

या महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे तसेच शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम यासह पोवाडा, भारुड, गोंधळगीत इ. सारखे लोककलेतील विविध प्रकार समाविष्ट असणार आहेत. त्याचबरोबर स्थानिक दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या लोककला, संस्कृती, विविध स्थानिक महोत्सव/सण/कार्यक्रम आणि देशभक्ती गीत, कवितांचे कार्यक्रम/व्याख्याने इ. चा समावेश असणार आहे.

 

नांदेड जिल्हास्तरावरील महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन लोकसहभागीय व्हावे यादृष्टीने जिल्ह्यातील विविध सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व जेष्ठ कलावंतासोबत विचारविनिमय करुन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील जेष्ठ लोक कलावंत, रंगकर्मी, दिग्दर्शक, नाटककार, संगीतकार, गायक, वादक, नर्तक, नृत्य दिग्दर्शक, कवी-व्याख्याते, इतिहासतज्ञ यांची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 8 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या कॅबिनेट हॉल येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील विविध सांस्कृतीक क्षेत्रातील नामवंत व जेष्ठ कलावंतानी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

00000

शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 साठी

प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

नांदेड दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाजमाध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2024 असा आहे.


राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in  व  www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

पुरस्कारांची माहिती

अ.क्र

पुरस्काराचे नाव

पारितोषिक

1.

अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)

1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)

2.

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

3.

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

4.

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

5.

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

6.

यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

7.

पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

8.

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

9.

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

10.

समाजमाध्यम पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

11.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

12.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

विभागीय पुरस्कार

13.

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र,

या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

14.

अनंतराव भालेराव पुरस्कार, (छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

15.

आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

16.

नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

17.

शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

18.

ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

19.

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

20.

ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...