Sunday, February 28, 2021

उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर) अंतर्गत

उन्हाळी हंगामातील पाणीपाळीचे वेळापत्रक जाहिर

नांदेड (जिमाका)दि. 28 :- उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे उन्हाळी हंगाम सन 2020-21 मधील पाणीपाळ्यांचे नियोजन पुढीलप्रमाणे जलसंपदा विभागाने जाहिर केले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 23 जानेवारी रोजी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वोनुमते विचार करुन उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीचे नियोजन केल्याप्रमाणे हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

 

इसापूर उजवा व डावा कालव्यातून पाणीपाळ्या चालू होण्याचा संभाव्य दिनांक पुढीलप्रमाणे राहील. उन्हाळी हंगाम 2020-21 साठी पहिली पाणीपाळी उजवा व डावा कलवा इसापूरद्वारे 1 मार्च 2021 रोजी, दुसरी पाणीपाळी 27 मार्च 2021 रोजी, तिसरी  पाणीपाळी 23 एप्रिल 2021 रोजी तर चौथी पाणीपाळी 19 मे 2021 रोजी सोडण्यात येईल. सदर आर्वतनासाठी अटी व शर्तीची पुर्तता आवश्यक आहे.

 

आवर्तन प्रारंभ होण्याच्या व समाप्त होण्याच्या दिनांकामध्ये क्षेत्रीय परिस्थितीनुसार थोडा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रब्बी हंगामीदुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही / मंजूर उपसा / मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी / नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात व विहीत दिनांकापुर्वी संबंधित शाखा कार्यलयात दाखल करावेत. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणा-या व पाणी अर्ज नामंजुर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणा-या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.

 

लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठाराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकरण्यात येतील. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या / अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारीट्रॅक्टर द्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणीवसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही, असे कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी स्पष्ट केले आहे.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 90 व्यक्ती कोरोना बाधित  

       1 हजार 835 अहवालापैकी 1 हजार 721 निगेटिव्ह  

नांदेड (जिमाका) दि. 28 :- रविवार 28 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 90 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 52 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 38 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  50 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 835 अहवालापैकी 1 हजार 721 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 654 एवढी झाली असून यातील 22 हजार 275 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 567 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 17 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 598 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 21, मुदखेड तालुक्यांतर्गत 1, गोकुंदा कोविड रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 12, खाजगी रुग्णालय 9, हदगाव कोविड रुग्णालय 1 असे एकूण 50 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.17 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 38,  बिलोली तालुक्यात 1, देगलूर 1, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 7, उमरी 1, कंधार 1, परभणी 1 असे एकुण 52  बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 21, भोकर तालुक्यात 3, माहूर 4, नांदेड ग्रामीण 2, किनवट 8 असे एकूण 38 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 567 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 61, किनवट कोविड रुग्णालयात 25, मुखेड कोविड रुग्णालय 12, हदगाव कोविड रुग्णालय 5, महसूल कोविड केअर सेंटर 43, देगलूर कोविड रुग्णालय 9, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 252, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 67, खाजगी रुग्णालय 63 आहेत.   

रविवार 28 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 155, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 43 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 31 हजार 67

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 2 हजार 940

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 654

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 275

एकुण मृत्यू संख्या-598                            

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 94.17 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-22

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-567

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-17.    

0000

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...