Wednesday, January 24, 2024

 अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये

- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

            मुंबई दि. २४ : शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिले.

            राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी शासनाने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. या दूध अनुदानाबाबत मंत्री श्री. विखे पाटील यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीत आढावा घेतला.

            या बैठकीस पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, आयुक्त प्रशांत मोहोड, सहा निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) शहाजी पाटील यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.

जनावरांचे टॅगिंग  होणे महत्त्वाचे

            शासनाने जाहीर केलेले दूध अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यास मिळण्यासाठी त्यांच्या जनावरांचे  टॅगिंग होणे महत्त्वाचे आहे. पशुधनाचे टॅगिंग व्हावे, यासाठीचे यंत्रणेने  हे काम अचूकरित्या पूर्ण केल्यास सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यास अनुदानाचा लाभ मिळेल, असेही मंत्री श्री. विखे - पाटील यांनी सांगितले.

०००००



 वृत्त क्र. 74

 

युवकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी संकल्प करू या

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 

· जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार देऊन सन्मान

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- देशाचा आशावाद आणि लोकशाहीचा पुरस्कर्ता म्हणून आपण युवकांकडे पाहतो. लोकशाहीला भक्कम करण्याची प्रक्रिया ही निवडणुकांसाठी होणाऱ्या अधिकाधिक मतदानातून होत जाते. देशातील युवकांची संख्या लक्षात घेता निवडणुकीच्या मतदानात त्यांच्या सहभागाला खूप महत्त्व आहे. युवकांची नावे मतदार यादीत अधिकाधिक प्रमाणात यावीत यासाठी आपण संकल्प करून त्यावर अधिक भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

 

चर्चगेट, मुंबई येथील जयहिंद महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे बोलत होते. या कार्यक्रमास मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपनगरचे डॉ. राजेंद्र भोसले, जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दाभोळकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक वाडिया, निवडणूक सदिच्छा दूत प्रणित हाटे, चित्रपट समीक्षक डॉ. संतोष पाठारे, लेखिका डॉ. निर्मोही फडके, दिग्दर्शक प्रकाश कुंटे, अभिनेता विकास पाटील उपस्थित होते.

 

मतदारांचे नियोजनबध्द शिक्षण व निवडणुकीतील त्यांचा महत्वपूर्ण ठरणारा सहभाग याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना छत्रपती संभाजीनगर विभागातुन उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार आज बहाल करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या समवेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगिता चव्हाण, लोहा विभागाचे मतदान नोंदणी अधिकारी शरद मंडलिक उपस्थित होते.

 

मतदानाबद्दल ज्यांनी साक्षरता वाढविण्याचे काम केले, मतदार जनजागृतीचे काम केले अशा स्वयंसेवी संस्था, महाविद्यालय, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी यांचा निवडणूक आयोगामार्फत गौरव करण्यात आला. राज्य निवडणूक आयोग, मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जयहिंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

00000



 वृत्त क्र. 73

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे

सदस्य प्रा. डॉ. गोविंद हरिबा काळे यांचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 24:- राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.डॉ.गोविंद हरिबा काळे आयोगाच्या कामकाजासाठी शुक्रवार 26 जानेवारी 2024 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार 26 जानेवारी 2024 रोजी सायं. 5 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासमवेत मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महसूल विभागातील जमिन अधिग्रहणाविषयी बैठक व सर्वेक्षणाचा ते आढावा घेतील.

0000

 वृत्त क्र. 72

ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी

भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे सामुहिक वाचन

नांदेड (जिमाका) दि. 24:-भारतीय संविधानाची माहिती सर्वाना व्हावी. तसेच भारतीय राज्य घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मुलतत्वे समाज मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय नागरिकांना होणे आवश्यक आहे. यासाठी 26 जानेवारी 2020 पासून दरवर्षी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिकेचे सामुहिक वाचन करावे असे शासन परिपत्रक निर्गमित आहे. त्यानुसार सर्व विभाग प्रमुखांनी ध्वजारोहन कार्यक्रमापूर्वी भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे सामुहिक वाचन करावे, असे निर्देश आहेत.

0000

 वृत्त क्र. 71

ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार

उमेदवारांसाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत प्रशिक्षण

नांदेड (जिमाका) दि. 24:- राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षित व्यक्तीची कृत्रिम रेतने व अनुषंगिक कार्य करण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छूक उमेदवारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचेकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे  उपायुक्त डॉ. बी.यु.बोधनकर यांनी केले आहे.

राज्यातील गायी-म्हशीमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढण्यासाठी व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी तसेच दुग्ध उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढ होण्यासाठी ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेराजगारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम तीन महिने कालावधीचा आहे. यात 1 महिना क्लासरूम ट्रेनिंग व 2 महिने प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा समावेश आहे. क्लासरुम ट्रेनिंग पशुवैद्यकीय महाविद्यालयात तर प्रॅक्टीकल ट्रेनिंग जिल्ह्यातील पशवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय याठिकाणी घेण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षण घेण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदार हा किमान 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध होईल. नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 200 उमेदवारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे, असे पशुसंवर्धन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 70

प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती

नांदेड (जिमाका) दि. 24:- प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानतर्गत "हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव अभियान" राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत 23 जानेवारी 202रोजी बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे "हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव अभियान" राबविण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक  विदयार्थी यांना रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यात येवून त्यांना माहिती पत्रके  माहिती पुस्तिकाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी सांस्कृतिक संवर्धन मंडळ सगरोळीचे अध्यक्ष देशमुखप्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामतउप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊतबिलोलीचे पोलीस निरीक्षक सोडारेसहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसेप्राथमिक आरोग्य केंद्र सगरोळी येथील वैद्यकीय अधिकारी पांडूरंग पावडे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमास 100 नागरिक, 50 विदयार्थी, 45 वाहनचालक उपस्थित होते. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयतर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ सुमारे 130 वाहनधारकांनी  नागरिकांनी घेतला. या नेत्र तपासणी शिबिरासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन कुलकर्णी यांनी तपासणी केली.

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत उपस्थित असलेल्या नागरिकांची प्रश्न मंजुषा घेण्यात येवून यामध्ये विजेत्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यावेळी सगरोळी येथील नागरिकांना हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव अभियानाचीची शपथ देण्यात  ली. यावेळी हिरो  बजाज कंपनीच्या वाहन वितरकांच्या मार्फत दुचाकी चालवितांना घ्यावयाची काळजीबाबत माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक किशोर भोसले  सहायक मोटार वाहन निरीक्षक संजय भोसले यांनी परिश्रम घेतले. 

0000


                                                      

 वृत्त क्र. 69

रस्ता सुरक्षा अभियानातर्गंत नायगाव येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न


नांदेड (जिमाका) दि. 24:- प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 15 जानेवारी  ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहेत्यानुंषगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय  कै.गणपतराव पाटील बहुउध्देशिय सेवा भावी संस्थामांजरम यांच्या संयुक्त विद्यमाने नायगांव येथे नुकतेच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित नागरिकांची नेत् तपासणी करण्यात आली. तसेच उपस्थित नागरिकांना फुटपाथ नसलेल्या ठिकाणी उजव्या बाजुने चालावेअपघात होऊन नये म्हणून घ्यावयाची काळजीअपघात झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली. नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या हेल्मेटयुक्त अपघात मुक्त गाव अभियानाची माहिती देण्यात येवून हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यात आली.

यावेळी कै.गणपतराव पाटील बहुउध्देशिय सेवा भावी संस्थामांजरम चे अध्यक्ष श्रीपाद शिंदे पाटी उपस्थित होते. हा कार्यक्रम शस्वी करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक श्रीमती रेणुका राठोडविजयसिंह राठोड  सहायक मोटार वाहन निरीक्षक धीरज गवळी यांनी परिश्रम घेतले.

0000  


       

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...