Monday, October 14, 2019


फार्मसी कॉलेज, श्यामनगर येथील युवा मतदारांनी घेतली
मतदार जनजागृती मतदानाची प्रतिज्ञा...
          नांदेड, दि. 14 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत युवा मतदारांचा सहभाग वाढविण्‍यासाठी 86  नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्‍वीप कक्षाचे माध्‍यमातून दिनांक 14 ऑक्‍टोबर 2019 रोजी फार्मसी कॉलेज, बाबानगर, नांदेड येथे युवा मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्‍यात आला. या कार्यक्रमांस फार्मसी कॉलेजमध्‍ये पदवी पदविका अभ्‍यासक्रम शिकणारे विद्यार्थी विद्यार्थीनी युवा मतदार मोठया प्रमाणावर उपस्थित होते. तसेच प्राचार्य डॉ.जी.आर.शेंदारकर, प्राचार्य डॉ.घेवारे महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. या प्रसंगी युवा मतदारांचा मतदान सहभाग त्‍याचे महत्‍व श्री प्रसाद शिरपूरकर यांनी सांगीतले. यांनतर सर्व ?पस्‍थीतांना मतदान करण्‍याची प्रतिज्ञा श्रीमती कविता जोशी यांनी दिली. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींनी यावेळी मतदान करण्याचे मतदार जागृती करण्‍याचा मानस कार्यक्रमानंतर बोलून दाखवला.
 सदर कार्यक्रमास यशस्‍वी करण्‍यासाठी कार्यक्रमाचे नियेाजन स्विप कक्षातील रुस्‍तुम आडे, श्रीमती अनघा जोशी, गणेश रायेवार, संजय वाकोडे, यांनी केले.
0000
यशवंत नगर येथे विविध कार्यक्रमांचे माध्‍यमातून महिला मतदार जनजागृती
86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघचे स्विप कक्षाचा उपक्रम
          नांदेड, दि. 14 :- 86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक 2019 करिता महिला मतदारांची मतदान टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी स्‍वीप कक्षाचे माध्‍यमातून दिनांक 13 ऑक्‍टोबर 2019 रोजी यशवंतनगर येथे महिला मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्‍यात आला. या कार्यक्रमांतर्गत ?पस्‍थीत महिलांनी मतदान जनजागृती संबंधी भारूड, गीत, . सादर केले. त्‍यामध्‍ये डॉ.उज्‍वला सदावर्ते सहका-यांनी सादर केलेल्‍या मतदान जनजागृती नाटीकेस मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच सर्व उपस्थित महिलांनी प्रलोभनांना बळी पडता निर्भयपणे मतदान करण्‍याची शपथ घेतली मतदान जनजागृती संदेशपर पत्रक वितरीत केले. यानंतर सर्व सहभागी महिलांनी परिसरात मतदार जनजागृती रॅली काढली. या कार्यक्रमात महिलांनी स्‍वयं स्‍फुर्तीने सहभाग घेतला. 
सदर कार्यक्रमास यशस्‍वी करण्‍यासाठी श्रीमती कविता जोशी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे नियेाजन 86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघ स्विप कक्षातील रुस्‍तुम आडे, गणेश रायेवार, प्रसाद शिरपूरकर, श्री वाकोडे यांनी केले.

0000 

सावित्रीबाई फुले हायस्‍कुलच्‍या विद्यार्थीनींनी काढली
मतदार जनजागृती रांगोळी
          नांदेड, दि. 14 :- विधानसभा निवडणूक 2019 करिता मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी स्‍वीप कक्षाद्वारे विविध उपक्रमांचे माध्‍यमातून जनजागृती करण्‍यात येत आहे. यातून प्रेरणा घेत दिनांक 14 ऑक्‍टोबर 2019 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वाराचे प्रांगणात सावित्रीबाई फुले हायस्‍कुलच्‍या विद्यार्थीनींच्‍या गटाने मतदार जनजागृती रांगोळी काढली. या रांगोळीद्वारे जेष्‍ठ नागरिक, दिव्‍यांग, युवक यांचेसह सर्व मतदारांना मतदान करण्‍याचा संदेश दिला. जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी रांगोळी काढलेल्‍या विद्यार्थीनीं कलाशिक्षक यांचे पुष्‍पगुच्‍छ देवून अभिनंदन केले. तसेच विद्यार्थीनींची विचारपूस करुन त्‍यांना खाऊ देवून त्‍यांना प्रोत्‍साहन दिले. यावेळी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित नागरिकांनी उपक्रमात सहभाग नोंदवीला.
सदर उपक्रमातील रांगोळी सादरीकरण सावित्रीबाई हायस्‍कूल, बाबानगर, नांदेड येथील कलाशिक्षीका श्रीमती कविता जोशी यांचे मार्गदर्शनाखाली सहभागी विद्यार्थीनींनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन 86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघातील स्विप कक्षामार्फत करण्‍यात आले होते. यासाठी स्विप कक्षातील गणेश रायेवार, प्रसाद शिरपूरकर यांनी केले.

0000













  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...