जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात
वाचन प्रेरणा दिनानिमीत्त कार्यक्रम
नांदेड, दि. 14 :- भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ.ए.पी.ज.अब्दूल कलाम यांच्या जन्म्दिन 15 ऑक्टोंबर हा "वाचन प्रेरणा दिन"म्हणून साजरा करण्यात येत असून त्यानिमीत्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने ग्रंथप्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन धर्मदाय उपआयुक्त किशोर मसने यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर हे राहाणार आहेत. याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठातील माहितीशास्त्रज्ञ रणजीत धर्मापुरीकर यांचे }आधुनिक युगातील वाचनांच्या संधी( याविषयावर वाचकांना माहिती देणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यीक डॉ.जगदिश कदम तसेच नांदेड जिल्हा ग्रंथालयाचे सचिव राजेंद्र हंबीरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बहुददेशीय सांस्कृतिक संकुल, श्री गुरु गोंविदसिंघजी स्टेडीयम परिसर नांदेड येथे सायं 4.30 वाजता सुरु होणार असून नागरिकांने मोठया संख्यने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा
तसेच जिल्हयातील सर्व शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांनी ग्रंथ भेट,चर्चासत्र,व्याख्यान, ग्रंथप्रदर्शन,वाचन दिन, अध्यपान दिन साजरा करणे इत्यादी वाचनाची आवड विदयार्थी, वाचकात रुजविण्याच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे अहवान जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment