Monday, October 14, 2019


सामान्‍य तसेच दिव्‍यांग मतदाराच्‍या मतदान
जागृतीसाठी पथनाट्याचे सादरीकरण
नांदेड, दि. 14 :- महाराष्ट्री विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2019 अंतर्गत 87- दक्षिण नांदेड विधानसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासंदर्भात निवडणुक आयोगाने दिव्यांग मतदार जनजागृतीवर भर दिला असुन या अभियानाअंतर्गत 'माझं मत माझा स्वाभिमान' या पथनाट्याचे 10 ऑक्टोंबर 2019 रोजी लोहा तालुक्यातील झरी येथे, 11 ऑक्टोबर 2019 रोजी खरबी, बेटसांगवी तसेच शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे संपन्न झालेल्या 86 उत्तर नांदेड विधानसभा मतदार संघामार्फत आयोजीत करण्यात आलेल्या केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षणात 12 ऑक्टोंबर 2019 रोजी शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे संपन्न झालेल्या 87 दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघामार्फत आयोजीत करण्यात आलेल्या केंद्राध्याक्ष मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षणात परीणामकारक सादरीकरण करण्यात आले आहे. दिव्यांग कक्ष प्रमुख डॅा.अशेाक सिद्धेवाड लिखीत प्रा.डॅा.महेश पाटील कारलेकर, प्रा.डॅा. सुग्रीव फड दिग्दर्शीत 'माझं मत माझा स्वाभिमान' या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
या माध्यमातुन सामान्य मतदार दिव्यांग मतदारांचा मतदानात सहभाग वाढावा या दृष्टीने निवडणूक विभाग प्रयत्नयशील आहे. तसेच दिव्यांग मतदारांना मतदानाचे दिवशी पुरविण्यात येणाऱ्या विविध सुविधांबाबत माहिती देण्यात येत आहे. या पथनाट्याचे सादरीकरण दिव्यांग कक्षाचे विद्यार्थी सुरज मंत्री, मारुती कदम, केदार जोशी, चैतन्यी अर्जुने, ऋषीकेश यादव कृष्णायकांत अभंगे यांनी केले आहे. यावेळी संबंधीत गावातील मतदान केंद्रस्तस्तरीय अधिकारी (B.L.O.) ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. बेटसांगवी गावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सहावीच्या वर्गातील विद्यार्थीनीं कु. राणी उमाजी वानखेडे , कु. स्वाती पांडुरंग वानखेडे, कु. साक्षी संभाजी वानखेडे, कु. श्रेया रोहीदास वानखेडे. कु. किरण निवृत्ती वानखेडे, शुभंगी संतोष वानखेडे यांनी ''मतदानाला या हो'' हे पथनाट्य शाळेतर्फे सादर केले.  
यात दिव्यांग मतदारांनी मतदानात जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी 87- दक्षिण नांदेड विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे. तसेच त्यासाठी सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरुण जऱ्हाड, नायब तहसीलदार सौ.उर्मीला कुलकर्णी पीडब्लुडी कक्षातील प्रा डॅा. अशेाक सिद्धेवाड, प्रा. डॅा.. सुग्रीव फड, प्रा.डॅा.महेश पाटील, योगेश प्रमोदराव कुलकर्णी हे प्रयत्नाशील आहेत.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...