Monday, November 2, 2020

 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

दि. 1 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी

 विभागात आचारसंहिता लागू 

औरंगाबाद, दि. 2 (विमाका) -  मा. भारत निवडणूक आयोगाने 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. निवडणुकीसाठी मतदान हे मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी तर मतमोजणी गुरुवार, दि. 3 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून औरंगाबाद विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत  श्री. केंद्रेकर यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार आहेदि. 12 नोव्हेंबर 2020 रोजी नामनिर्देंशन पत्र भरण्याची अंतिम तारीख राहील. दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईलदि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक असेल. दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत मतदान होईलमतमोजणी  ही दि. 3 डिसेंबर 2020 रोजी होईल. दि. 7 डिसेंबर 2020 रोजी निवडणुक प्रक्रीया संपेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जाणार आहे.  मतदारांसह निवडणूक प्रक्रीयेतील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क अनिवार्य राहणार असून मतदान केद्रांवर सुरक्षित अंतर राखणे,  थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, आरोग्य कर्मचाऱ्यांची  उपलब्धता असणार आहे. प्रत्येक जिल्हयासाठी नोडल आरोग्य अधिकारी  नियुक्त केला जाणार आहे. अशी माहिती श्री. केंद्रेकर यांनी दिली.

****

 

लॉकडाऊन कालावधीत संपुष्टात आलेल्या

मोटार वाहन विषयक दस्तऐवजांचा

वैधता कालावधी वाढवून मिळणार


नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामूळे लॉकडाऊनच्या कालावधीत संपष्टात आलेल्या परवान्यांचे नुतनीकरण, मंजूरपत्र, बदली वाहन, इरादापत्राची वैधता वाढवून देण्या येणार आहे. यामध्ये केंद्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदवाढ दिली आहे. त्यानुसार राज्य परिवहन प्राधिकरणाने मुद्याची नोंद घेऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत संपुष्टात आलेल्या मोटार वाहन विषयक दस्तऐवजांची वैधता केंद्र शासनाने 1 फेब्रुवारी 2020 पासून 31 डिसेंबर 20220 पर्यंतच्या कालावधीसाठी वाढविला आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलजावणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे. 

ऑटोरिक्षा यांची वयोमर्यादा निश्चीत करणे 

ऑटोरिक्षाची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून गणनेचा दिनांक व मुंबई व्यतिरिक्त क्षेत्रांमध्ये ऑटोरिक्षांकरिता सुधारित वयोमर्यादा वर्षं पुढीलप्रमाणे राहील. गणनेचा दिनांक 1 ऑगस्ट 2021 पर्यंत 20 वर्षे.  1 ऑगस्ट 2022 पर्यंत 18 वर्षे. 1 ऑगस्ट 2023 पर्यंत 16 वर्षे.  1 ऑगस्ट 2024 पर्यंत 15 वर्षे ही सुधारित वयोमर्यादा राहिल. 

मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 113 चा भंग करून सकल भार क्षमतेपेक्षा (जी.व्ही.डब्ल्यू.) अतिरिक्त वजनाच्या मालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांना परवानाधारकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 86 अंतर्गत विभागीय कार्यवाही करण्यात येईल. 

यात गुन्ह्यांचे स्वरूप- सकल भार क्षमतेपेक्षा (जी.व्ही. डब्ल्यू.) अतिरिक्त वजनाच्या मालाची वाहतूक करणे, मोटार वाहन प्रकार-हलकी मालवाहू वाहनासाठी अतिरिक्त भार 5000 कि.ग्रा. पर्यंत पहिल्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 10 दिवसासाठी परवाना निलंबन, निलंबनाऐवजी सहमत शुल्क 5 हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाईत 20 दिवसासाठी निलंबन, निलंबनाऐवजी ऐवजी सहमत शुल्क  10 हजार रुपये राहील. तिसऱ्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 30 दिवसासाठी परवाना निलंबन, निलंबनाऐवजी सहमत शुल्क 15 हजार रुपये राहील. 5001 कि.ग्रा. पेक्षा जास्त अतिरिक्त भारसाठी 10 दिवसासाठी परवाना निलंबननिलंबनाऐवजी सहमत शुल्क रु. 7 हजार व 20 दिवसासाठी 14 हजार रुपये तर 30 दिवसासाठी 21 हजार रुपये राहील. 

मध्यम मालवाहू वाहनासाठी 5000 कि.ग्रा. पर्यंत 10 दिवसासाठी निलंबनाऐवजी सहमत शुल्क 10 हजार, 20 दिवसासाठी 20 हजार रुपये तर 30 दिवसासाठी 30 हजार रुपये राहील. 5001 कि.ग्रा. पेक्षा जास्त 10 दिवसासाठी 15 हजार रुपये तर 20 दिवसासाठी 30 हजार, 30 दिवसासाठी 45 हजार रुपये राहील. 

जड मालवाहू वाहनासाठी 5000 कि.ग्रा. पर्यंत 10 दिवसासाठी निलंबनाऐवजी सहमत शुल्क 20 हजार 20 दिवसासाठी 40 हजार 30 दिवसासाठी 60 हजार राहील. 5001 कि.ग्रा. पेक्षा जास्त पर्यंत 10 दिवसासाठी निलंबनाऐवजी सहमत शुल्क 25 हजार रुपये तर 20 दिवसासाठी 50 हजार रुपये तर 30 दिवसासाठी 75 हजार रुपये राहील. 

राज्यात जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी स्वादिष्ट, सुंगधित तंबाखू, स्वादिष्ट सुपारी, अपमिश्रके युक्त उत्पादित चघळण्यासाठी तंबाखू, खर्रा, मावा, गुटखा, पानमसाला  इतर तत्सम पदार्थ वाहतूक करणा-या वाहनांवर परवान्यावर मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 86 नुसार विभागीय कारवाई करण्यात येईल व सदर वाहन जप्त करुन ढील कारवाईसाठी पोलीस विभागाकडे देण्यात येणार आहे, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

59 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

29 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- सोमवार 2 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 59 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 29 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 15 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 14 बाधित आले. 

आजच्या एकुण 468 अहवालापैकी  434 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 19 हजार 203 एवढी झाली असून यातील  18  हजार 38 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 494 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 31 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालानुसार एका बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी रामनगर हदगाव येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 515 एवढी आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 6, उमरी तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, औरंगाबाद येथे संदर्भीत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, माहूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 7, बिलोली कोविड केअर सेंटर व गृहविलगीकरण 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 1, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5, खाजगी रुग्णालय 8, किनवट कोविड रुग्णालय व गृहविलगीकरण 1, हैद्राबाद येथे संदर्भीत 2  असे  59 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.33 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 13, हिंगोली 1, किनवट तालुक्यात 1 असे एकुण 15 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 12, परभणी 1, मुखेड तालुक्यात 1 असे एकूण 14 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 494 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 35, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 141, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 15, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 26, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 23, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 9, बारड अंतर्गत गृह विलगीकरण 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, मांडवी अंतर्गत गृह विलगीकरण 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 13, नायगाव तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 7, खाजगी रुग्णालय 46, आहेत.  

सोमवार 2 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 98, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 78 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 15 हजार 367

निगेटिव्ह स्वॅब- 92 हजार 378

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 203

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 38

एकूण मृत्यू संख्या- 515

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.33 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 414

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 494

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 31. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...