निवृत्ती वेधनधारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे
नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोव्हिड 19 च्या साथीच्या पार्श्वभुमीवर निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचे हयातप्रमाणपत्र सादर करण्याच्या कालावधीमध्ये वाढ केली आहे. राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना 1 नोव्हेंबर ते 31 डिसेबर 2020 या कालावधीमध्ये हयात प्रमाणपत्रे त्याच्या बँकेमार्फत अथवा ऑनलाइन जीवन प्रमाण प्रणालीमार्फत कोषागाराला सादर करावेत असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
हयात प्रमाणपत्राच्या यादया निवृत्तीवेतनधारक
ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतात. त्या बँकशाखेला पाठविण्यात आल्या आहेत. तरी
जिल्हयातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी संसर्ग टाळण्यासाठी सर्व काळजी
घेऊन बॅकेत पाठविलेल्या जीवनप्रमाणपत्रावरील आपल्या नावासमोर बॅक मॅनेजरच्या समक्ष
स्वाक्षरी करुन आपले हयात प्रमाणपत्र सादर करावेत अथवा यासाठी जीवनप्रमाण या संगणक
प्रणालीचा वापर करुन आपले आधारकार्ड प्रणालीवर आधारित हयात प्रमाणपत्र ऑनलाइन
कोषागारास सादर करावे. निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या कोषागार कार्यालयाच्या
नोंदीनुसार जिल्हयातील बँकेच्या शाखेतच हयात प्रमाणपत्र सादर करावे. इतर बॅकेतील
हयात प्रमाणपत्रे स्वीकारली जाणार नाहीत असे कोषागार अधिकारी नांदेड कळवितात.
0000
No comments:
Post a Comment