Friday, January 7, 2022

 अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा

केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 7  :-  अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2022 रविवार 9 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 ते सायं. 5 या कालावधीत किडस् किंगडम पब्लिक स्‍कूल, गट नं. 100, मालेगावरोड, नांदुसारोड खुरगांव नांदेड  पिनॅकल इंटरनॅशनल स्‍कूल काकांडीतर्फे, साई लॉन पासदगाव नांदेड या दोन परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. 

या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होवू नये म्हणून तसेच परीक्षा ही स्वच्छ व सुसंगत पार पाडणे आवश्यक आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात रविवार 9 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजेपासून सायं. 7 वाजेपर्यतच्‍या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी, कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. वर दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

00000

 जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत  

नांदेड (जिमाका) दि. 7  :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 11 जानेवारी 2022  रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.   

जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 11 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 74 व्यक्ती कोरोना बाधित

तर 8 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 995 अहवालापैकी 74 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 69 तर अँटिजेन तपासणीद्वारे 5 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 756 एवढी झाली असून यातील 87 हजार 898 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 203 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 46, नांदेड ग्रामीण 10, धर्माबाद 1, लोहा 1, माहूर 1, मुदखेड 3, अर्धापूर 1, मणिपूर 1, पुसद 1, लातूर 2, मुंबइ 1, हिंगोली 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे अर्धापूर 2, कंधार 1, मुदखेड 1, नायगाव 1 असे एकूण 74 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 6, खाजगी रुग्णालय 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.   

आज 203 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 27, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 151,  खाजगी रुग्णालय 8 अशा एकुण 203 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती. 

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 3 हजार 47

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 98 हजार 688

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 756

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 898

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-203

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 जयंती, राष्ट्रीय दिनाबाबत जिल्हा प्रशासनाचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 7  :-  राष्ट्र पुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्देशित करण्यात आले. जिल्ह्यातील संबंधित शासकीय कार्यालयांनी या शासन निर्देशांचे अवलोकन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

सन 2022 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक क्र. जपति-2221/प्र.क्र.112/कार्या.29 दि. 31 डिसेंबर 2021 अन्वये दिलेल्या सुचनानुसार सन 2022 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि यासंदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावे. अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत. शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखाने याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्देशीत केले आहे.

000000

 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

साजरा करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 7  :-  मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर 14 ते 28 जानेवारी 2022 या कालावधीत "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" साजरा करण्यात येणार आहे. सध्या कोविड-19 ओमायक्रॉन या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामूळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध पाळून हा पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश आहेत. या पंधरवड्यात जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य आहे, तिथे कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करुन कार्यक्रमाचे आयोजन करावे. अधिनियम 1964 नुसार वर्जित प्रयोजने वगळता शासकीय कामकाज 100 टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. त्रिभाषा सुत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये/सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. 

राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालय, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये आदी सर्व संस्थांनी 14 ते 28 जानेवारी 2022 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करावा. मराठी भाषा विभागाचे शासन परिपत्रक 22 डिसेंबर 2021 मध्ये नमूद केल्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन करुन कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश संबंधीत विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.

00000

 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा  

नांदेड (जिमाका) दि. 7 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.  

 

शनिवार 8 जानेवारी 2022 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 8.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11.30 वा. डोंगरी विकास आराखडा समितीच्या बैठकीस उपस्थिती स्थळ- नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 12 वा. जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 2 वा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.

 

रविवार 9 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वा. नांदेड येथून मोटारीने व्हाया लोहा पालम मार्गे गंगाखेड जि. परभणीकडे प्रयाण. सायंकाळी 4 वाजता गंगाखेड येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वा. नांदेड येथे आगमन.

 

सोमवार 10 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा. महाराष्ट्र ग्रामीण विकास योजनेंतर्गंत घरकुल योजनेच्या शुभारंभासाठी व्हीसीद्वारे उपस्थिती. सायंकाळी 5 वा. नांदेड वाघाळा महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती स्थळ-नांदेड.

 

मंगळवार 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. जिल्हा परिषद नांदेड आयोजित कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- जिल्हा परिषद नांदेड प्रांगण. दुपारी 1 वा. नांदेड येथून मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...