मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
साजरा करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 7 :- मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर 14 ते 28 जानेवारी 2022 या कालावधीत "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" साजरा करण्यात येणार आहे. सध्या कोविड-19 ओमायक्रॉन या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामूळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध पाळून हा पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश आहेत. या पंधरवड्यात जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य आहे, तिथे कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करुन कार्यक्रमाचे आयोजन करावे. अधिनियम 1964 नुसार वर्जित प्रयोजने वगळता शासकीय कामकाज 100 टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. त्रिभाषा सुत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये/सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे.
राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालय, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये आदी सर्व संस्थांनी 14 ते 28 जानेवारी 2022 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करावा. मराठी भाषा
विभागाचे शासन परिपत्रक 22 डिसेंबर 2021
मध्ये नमूद केल्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन करुन कार्यवाहीचा अहवाल शासनास व
जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे
निर्देश संबंधीत विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
00000
No comments:
Post a Comment