Thursday, March 1, 2018


सैन्य दलात अधिकारी पदाची संधी
नांदेड दि. 1 :-  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आला आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकारी यांचेकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्पेशल एंट्रीद्वारे सैन्य दलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना सशस्त्र सैन्य दलाकडून एसएसबी परिक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे अशा उमेदवारांना सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र विभागीय आयुक्त कार्यालय परिसर नाशिकरोड नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी 13 ते 22 मार्च 2018 एकुण दहा दिवस असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची, प्रशिक्षणाची व भोजनाची सोय विनामुल्य करण्यात आली आहे.
इच्छूक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी 12 मार्च 2018 रोजी सकाळी 10.30 वा. छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे पात्र उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतीसह मुलाखतीस उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 0253-2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत संपर्क साधावा.
एसएसबी प्रवेश वर्गासाठी पुढील प्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (युपीएससी) उत्तीर्ण असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी (सी) प्रमाणपत्र अे / बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावे. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. या प्रशिक्षण वर्गाचा जास्तीतजास्त पात्र तरुण-तरुणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड नाशिक यांनी केले आहे.
000000


भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ ;
शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यात अर्ज करता येणार
            नांदेड दि. 1 :- सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्यावतीने  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले होते. परंतू आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय पुणे यांच्या निर्देशान्वये या योजनेच्या कार्यपध्दतीपुढील प्रमाणे बदल करण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत सन 2017-18 साठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची मुदत दिनांक 15 मार्च 2018 पर्यत वाठविण्यात आली आहे. पुर्वी दिलेल्या सुचनेनुसार विद्यार्थ्याने त्यांच्या हिवाशी जिल्हया(विद्यार्थी जिल्हा) या योजनेसाठी अर्ज करावयाचा होता. त्यात बदल करण्यात आला असु विद्यार्थी ज्या जिल्ह्या शिक्षण घेत आहे. (कॉलेज जिल्हा) त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त यांचेकडे अर्ज करता येतील. हा बदल 31 डिसेंबर 2017 पुर्वी प्राप्त झालेल्या अर्जांसाठी लागू राहणार नाही. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी यापुर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी अर्ज करु नये, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
000000


   स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे दोन दिवस आयोजन ;
ताणतणाव, अर्थसंकल्प, पर्यावरण विषयांवर मार्गदर्शन  
नांदेड, दि. 1 :- उज्ज्वल नांदेड मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने सोमवार 5 मार्च 6 मार्च 18 रोजी डॉशंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर नांदेड येथे दोन दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार 5 मार्च रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न    होणा-या  या शिबिरा डॅा. नंदकुमार मुलमुले हे ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयावर तर पुणे येथील प्रा. अभिजित राठोड हे राजकोषीय धोरण, वित्तीय अर्थसंकल्प 2018  या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
मंगळवार 6 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत पुणे येथील डॉ. तुषार घोरपडे हे पर्यावरण परिस्थिती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणा आहे. या मार्गदर्शनशिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...