Sunday, June 10, 2018
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे मंगळवारी आयोजन
मराठी व्याकरण विषयावर
डॉ. आशालता गुट्टे यांचे मार्गदर्शन
नांदेड, दि. 10 :- "उज्ज्वल नांदेड"
या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी
कार्यालय, सेतू समिती, नांदेड मनपा व जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालयाच्यावतीने मंगळवार
12 जून 2018 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम
परिसर नांदेड याठिकाणी
एक दिवसीय स्पर्धा परिक्षा
मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात
आले आहे. डॉ. आशालता
गुट्टे या मराठी
व्याकरण विषयावर सकाळी 10 ते दुपारी
12.30 यावेळात
मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
होणाऱ्या या शिबीरास
प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी
संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख
उपस्थिती राहणार आहे. स्पर्धा
परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा
ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे
यांनी केले आहे.
00000
Subscribe to:
Posts (Atom)
वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...