वृत्त क्र. 568
सोयाबीन उगवण न झालेल्या क्षेत्रात
आपत्कालीन पीक व्यवस्थापन करावे
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची कासरखेड येथे
शेतीची पाहणी
नांदेड (जिमाका) दि. 23 :- कासारखेडा
येथे खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी
करण्यात आली. पेरणीनंतर पाच ते सहा दिवसांनी काही गावातील बियानांची उगवण होत
नसल्याबाबत शासनाकडे लेखी व वर्तमानपत्रातून तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मौजे कासारखेडा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर
जाऊन प्रत्यक्ष सोयाबीन उगवणीची पाहणी केली. सोयाबीन उगवण कमी होण्याची कारणे
शेतकरी व शास्त्रज्ञांकडून जाणून घेतली.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जिल्हा प्रशासन
शेतकऱ्यांसोबत असून सोयाबीनची उगवण ज्या क्षेत्रामध्ये झालीच नाही अशा शेतावर दुबार पेरणी करावी व अल्प प्रमाणात उगवलेल्या ठिकाणी मूग, उडीद, तूर ,सूर्यफूल अशा पिकांची लागवड करावी, असे आवाहन
केले. शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत सोयाबीनला आपत्कालीन पिकांचा पर्याय निर्माण
करून खरीप हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय कृषी अधिकारी सुखदेव रविकुमार, कृषी विकास
अधिकारी श्री. नादरे, तहसीलदार सारंग चव्हाण, तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील, पंचायत समितीचे
कृषी अधिकारी श्री राऊत ,मंडळ कृषी अधिकारी सतीश सावंत, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक यांचेसह शेतकऱ्यांची मोठ्या
प्रमाणावर उपस्थिती होती.
000000